आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मुगल बादशाह अकबर ची बायको ‘नादिरा’ च होती सलीम ची ‘अनारकली’

“ठिक आहे प्रेम जिवन बर्बाद करते पण हे, काय कमी आहे मेल्यानंतरही दुनिया आठवण काढते.” फिल्मी जगतातील सगळ्यात यादगार फिल्म मुगल-ए-आजम चा हा डायलॉग आज ही लोकांच्या मनाला उत्साहित करतो. जेंव्हा ही दास्तान-ए-इश्क म्हणजेच प्रेमाची मिसाल दीली जाते तेंव्हा शाहजहां-मुमताज, सलीम-अनारकली चे नाव पहिल्यांदा येते. तसेच जलालुद्दीन अकबर सगळ्यात क्रूर पित्याच्या रुपात नेहमी  कोसल्या जाते.

अनारकली

आजही हिंदुस्तानच्या मातीमध्ये अनारकलीला गाडल्याची सुगंध आहे. अनारकली ला मुगल बादशाह अकबर आणि सलीम   प्रेम प्रकरणासाठी ओळखल्या जाते परंतु आजपर्यंत लोक अनारकलीच्या जीवनातील  रहस्याला समजु शकले नाहीत. साधारणपणे लोकांना एवढेच माहित आहे की अनारकली, सलीम सोबत प्रेम करत होती तर अकबराची कनीज़ होती. परंतु आपल्याला सांगतो की अनारकली आणि सलीम यांच्यामध्ये अजुन एक संबंध होता जो आज तुम्हाला सांगणार आहोत.

new google

अकबरची पत्नी होती अनारकली.

 

इतिहासकारांनी सलीम-अनारकली च्या संबंधांवर वर रिसर्च केला तर त्यांना कळले की अनारकली चे खरे नाव नादिरा बेगम होते. लोक तिला शर्फुन्निसा हि म्हणत होते. नादिरा ईरान हुन लाहौर पर्यंत व्यापाऱ्यांच्या एका टोळी सोबत आली होती . नादिरा म्हणजे अनारकली एवढी सुंदर होती की तिच्या सुंदरतेच्या गप्पा पुर्ण लाहौर मध्ये होत्या. जेंव्हा हि गोष्ट जलालुद्दीन अकबर ला कळाली तेंव्हा त्याने अपनल्या दरबारात नादिराला सादर करण्याचा हुकुम दिला.

अनारकली

नादिरा बेगम एक गुलाम होती जी राजाचा हुकुम टाळु शकत नव्हती. यामुळे ती अकबर च्या दरबार मध्ये पांढरा पोशाख घालून सादर झाली. पाढऱ्या पोशाखामध्ये ती एखाद्या अप्सरेहुन कमी वाटत नव्हती. तिचे गुलाबी गाल बघुन अकबर ने तिला ‘अनारकली’ नावाने सन्मानले आणि तेंव्हापासून नादिरा बेगम आनरकली बनली. बादशाह अकबराने नादिर बेगम ला आपली बायको बनवले. अकबराला आपल्या सगळ्या बायकांमध्ये अनारकली जास्त आवडतं असे.

सलीम-अनारकली च्या मध्ये संबंध होता माय – लेकरांचा.

ब्रिटिश टूरिस्ट फिंच ने १६११ मध्ये हिंदुस्तान चे भ्रमण करते वेळी अनारकली आणि सलीम च्या संबंधांना अनैतिक म्हटले. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले सलीम आणि अनारकली च्या मध्ये संबंध आहे माय लेकरांचा. पण मुगल बादशाह अकबर ने अनारकली सोबत विवाह केला तेंव्हा सलीम देशाच्या बाहेर होता. जेंव्हा तो १४ वर्षांनंतर महालात वापस आला तेंव्हा त्याच्या स्वागतासाठी मुजरा करण्यात आला आणि यामध्ये अनारकली सहभागी होती  सलीम अनारकली कडे आकर्षित झाला आणि अनारकलीला ही सलीम आवडला.

अनारकली आणि सलीमला एकसोबत पाहिले होते.

जेंव्हा अनारकली-सलीमच्या प्रेम प्रकरणाबद्दल अकबराला कळले तेंव्हा अनारकलीला सलीम पासून दूर राहण्याची चेतावनी दिली. तसेच फिन्च च्या मते, एकदा अकबराने आपली पत्नी नादिरा बेगमला पर्द्याच्या पाठीमागुन सलीम सोबत हासताना बघितले आणि त्याचा विश्र्वास बसला कि याप्रकरणात अनारकली ही दोषी आहे  तेंव्हा अकबराने आपली पत्नी नादिरा बेगम ला लाहोरच्या महालातील भिंतीमध्ये गाडण्याचा आदेश दिला.

पाकिस्तान मध्ये आहे अनारकली चा मकबरा

अकबरच्या निधनानंतर त्याचा मुलगा सलीम म्हणजे जहांगीरने राजगद्दी सांभाळली. परंतु तरीही तो आपले पहिले प्रेम विसरला नाही. ज्या महलामध्ये अनारकलीला गाडले होते त्या महालाला त्याने अनारकली मकबरा घोषित केले .हा मकबरा आज पाकिस्तान च्या पंजाब सिविल सेक्रेटरिएट जवळ स्थित आहे. ज्याला अनारकलीचा मकबरा म्हणतात.

तर मित्रांनो इतिहासकारांच्या अनुसार हि होती सलीम-अनारकली ची कहानी.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here