आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

राजस्थान रॉयल्सला धक्का:’हा’ चॅम्पियन खेळाडू दुखापतीमुळे झाला आयपीएलमधून बाहेर


 

डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमातून बाहेर पडला आहे. मंगळवारी त्याच्या फ्रँचायझीने सांगितले की, सोमवारी पंजाब किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बोटाला दुखापती झाली आहे. ते म्हणाले, “तपासणीनंतर असे आढळले की, त्याच्या बोटाला फ्रॅक्चर आहे, ज्यामुळे तो दुर्दैवाने आयपीएलच्या सध्याच्या मोसमातून बाहेर पडला.”

 

ते म्हणाले, ‘राजस्थान रॉयल्समधील प्रत्येकजण त्याला रॉयल्स कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य मानतो. तो लवकरच बरा व्हावा हीच आमची इच्छा आहे. आम्हाला आनंद आहे की बेनला आपले बहुमूल्य सहकार्य देण्यासाठी संघाबरोबर  राहण्याची त्याची इच्छा आहे. आम्ही त्याच्या शक्य त्या पर्यायांचा आढावा घेऊ. यापूर्वी ब्रिटिश माध्यमात आलेल्या अहवालात त्याच्या हातात फ्रॅक्चर असल्याचे म्हटले होते.

राजस्थान रॉयल्स

ब्रिटिश वृत्तपत्र इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, स्टोक्सला वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा झेल पकडताना डाव्या हाताला दुखापत झाली. वृत्तपत्राच्या माहितीनुसार, ‘सामन्यात यापूर्वी झेल घेण्याची संधी गमावल्यानंतर स्टोक्सने लांबून धावत पुन्हा झेल घेतला आणि वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना माघारी धाडले. यानंतर त्याला सहकार्‍यांसमवेत साजरे करताना अस्वस्थ वाटले.  दुखापतीमुळे या सामन्यात स्टोक्सने अवघ्या एका षटकाची गोलंदाजी केली.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

संजू सॅमसनचे शतक गेले वाया: शेवटच्या चेंडूवर किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवला 4 धावांनी विजय 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here