आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आंबेडकरांनी मडिगलगेकर यांच्याकडून घेतले होते मूर्तिकलेचे धडे मूर्तिकलेची आवड जपत स्वत: बनवली होती बुद्धमूर्ती


एखादा नवा विषय शिकण्याचे बाबासाहेब आंबेडकरांनी मनावर घेतले तर ते पूर्णपणे आपले सर्व लक्ष त्यावरच केंद्रीत करीत असत. आपल्या आयुष्याच्या शेवटी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न ते करत असायचे. १९५० साली बाबासाहेबांनी निपाणीचे शिल्पकार आर. बी. मडिगलगेकर यांच्याकडून मूर्तिकला व शिल्पकलेचे ज्ञान घेतले हाेते. बाबासाहेब, मडिगलगेकर यांच्या कलेवर जाम खूश होते. त्यांच्याकडून बरेच काही त्यांना शिकता आले.

आंबेडकर

मडिगलगेकर जेव्हा मूर्ती घडवत असत त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर  त्यांच्यासमोर एका खुर्चीवर बसून सर्व प्रकारची माहिती घेत. कलेबद्दलची कमालीची रसिकता त्यांच्यात होती. एखादा बाबासाहेबांनी मडिगलगेकर यांना बुद्धाची मूर्ती कशी तयार करायची हे शिकवण्यास सांगितले होते. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून मडिगलगेकर यांनी निपाणीहून आणलेला चिखल लेप सोबत घेतला.

त्यातला काही चिखल बाबासाहेबांना देऊन त्याचा गोळा तयार करण्यास सांगितले व तो चिखलाचा गोळा दोन्ही हातांच्या ओंजळीत धरुन त्याला दाबावयास सांगितले. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे केले.

आंबेडकर

बापू म्हणाले, “बाबासाहेब आपण दोन्ही अंगठ्याने दाबल्यामुळे ज्या खचा तयार झाल्या आहेत त्या डोळ्यांच्या खाचा असे समजावे. त्या खाचेच्या वरच्या बाजुला भुवया तयार कराव्यात. त्याच्यावरील भाग कपाळाचा म्हणून समजावा. नंतर खाचेच्या खालच्या भागा वर गाल व दोन्ही शेजारी खालच्या बाजूस तोंडाची आकृती तयार करावी. बापूच्या या सर्व सांगण्यावरून ज्ञान आत्मसात करून घेतले. नंतर भगवान बुद्धाची मूर्ती तयार करण्यात ते गुंतून गेले.

काही दिवसांनी भगवान बुद्धांची सुंदर मूर्ती बाबासाहेबांनी स्वत: तयार केली. भगवान बुद्धांविषयी बाबासाहेबांना फार आकर्षण होते. त्यांच्या अंत:करणात भगवान बुद्धांविषयी रात्रंदिवस जे चिंतन चालत असे त्यालाच मूर्तीस्वरुपात त्यांनी आकारबद्ध केले. कितीतरी पुतळे ते स्वतः बनवून घेणार होते.

औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाच्या समोरील बागेत हे सर्व पुतळे त्यांना बसवायचे होते, पण बाबासाहेबांची हीच इच्छा अपूर्णच राहिली. पुतळे भावपूर्ण आणि सुंदर असावेत असा बाबासाहेबांचा कटाक्ष होता. शिल्पकलेत ते चांगलेच रममाण होत आणि कलेतील नेमकी सौंदर्यस्थळे ते जाणत असत.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here