आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘हिटमॅन’ रोहित शर्माने वॉर्नर आणि धवनला पाठीमागे टाकत केला हा नवा विक्रम

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या अाहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराटने 193 सामन्यांमध्ये 39.13 च्या सरासरीने एकूण 5911 धावा केल्या आहेत.  आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नरला मागे ठेवून अव्वल -3 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. रोहितने मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि त्याद्वारे वॉर्नर व धवन या दोघांनाही सर्वाधिक धावांमध्ये मागे टाकले.

 

वॉर्नरच्या खात्यात 5257 तर शिखर धवनच्या आयपीएलमध्ये 5282 धावा आहेत. रोहितच्या खात्यात आता 5292 आयपीएल धावा आहेत. त्यापेक्षा सुरेश रैना आणि विराट कोहली पुढे आहेत. रैनाच्या खात्यात 5422 आयपीएल धावा आहेत. रोहितने केकेआरविरुद्ध 32 चेंडूत 43 धावा फटकावल्या आणि यावेळी तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. रोहितने दुसर्‍या विकेटसाठी सूर्यकुमार यादवबरोबर 76 धावांची भागीदारी केली.

रोहित शर्मा

केकेआरने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम 20 षटकांत 152 धावांवर बाद झाली. आंद्रे रसेलने पाच विकेट्स घेतल्या, तर सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सकडून 56 धावा केल्या. प्रत्युत्तराच्या रूपात केकेआर 20 षटकांत सात गडी राखून 142 धावा करू शकला आणि सामना दहा धावांनी गमावला. मुंबई इंडियन्सकडून राहुल चहरने चार गडी बाद केले आणि त्याला सामनावीर म्हणून घोषित केले.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: संजू सॅमसनचे शतक गेले वाया: शेवटच्या चेंडूवर किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवला 4 धावांनी विजय 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here