आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सीकर ची संतोष देवी जैविक शेतीपासून कमावत आहे १५लाख रुपये महिना


 

राजस्थान मधील जमिनीवर शेती करण्याबाबत म्हटले जाते कि हि जमीन सुपीक नाही. आणि जर बंजर जमिनीवर शेती करायच म्हणल तर ते पहाड चढल्यासारख होईल. मित्रांनो अशा जमिनीवर जर तुम्हाला सफरचंद आणि डाळिंबाची शेती करण्यास सांगितले तर तुम्ही ते शक्य नाही असंच म्हणाल. परंतु मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका महिलेबद्दल सांगणार आहोत जिने ह्या गोष्टी चुकीच्या सिध्द केल्या.

संतोष देवी

राजस्थान मधील सिकरच्या संतोष देवी खदेड यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या पिढीगत बंजर जमिनीला सुपीक बनवले आणि सफरचंद आणि डाळिंबाची जैविक पध्दतीने शेती करुन आज महिन्याला २५ लाख रुपये नफा कमावत आहेत. चला तर बघुया कसे संतोष देवी ने बंजर जमीनीवर सोनं पिकवल.

बंजर जमिनीला बनवले सुपीक

सिकर जिल्ह्यातील संतोष देवी आपल्या १.२५ एकर जमिनीवर शेती करतात. आपल्या या बंजर जमिनीवर सुरुवातीला डाळिंबाची शेती करुन आज त्या यापासून १५ लाख रुपये नफा कमावत आहेत. परंतु मित्रांनो संतोष देवी चा प्रवास एवढा सोपा नव्हता. वर्षांपासून बंजर पडलेल्या या जमिनीला आपल्या पतिच्या सहाय्याने सुपीक बनवले. आज याच बंजर जमिनीपासून संतोष देवी खुप लोकांचे पोट भरत आहे.

संतोष देवीच्या या प्रवासाची सुरुवात झालती जिद्द आणि आत्मसन्मान राखण्यासाठी कारण संतोष देवी ला लोक टोमणे मारत असत कि यांचा परिवार तर देराच्या पैशांवर चालतो. बस येथुनच सुरू झाली संतोष देवी यांची कहाणी.

लहानपणापासून होती शेती कामाची आवड

बंजर जमिनीला आपल्या मेहनतीने सुपीक बनवणाऱ्या संतोष देवी यांचा जन्म झुंझुनू जिल्ह्यात झाला. संतोष देवी चे वडिल दिल्ली पोलीस मध्ये नौकरी करत होते. संतोष देवी चे शिक्षण गावातच झाले. वयाच्या १२ व्या वर्षी यांनी शेतातील सगळे काम शिकले. वय १५ वर्षे असताना त्यांचे लग्न सिकरचे निवासी राम खदेड यांच्या सोबत झाले. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची जास्त आवड नव्हती पण कृषीविभागान त्यांना ‘ कृषी वैज्ञानिक ‘ म्हणुन सन्मानित केले.

शेतीपासून सगळं बदलण्याची तयारी
आणि संतोष देवी यांचा सुरुवातीचा संघर्ष

संतोष देवी यांचे लग्न एका शेतकरी कुटुंबात झाले होते. यामुळे त्या शेतीची कामे करत. त्यांचा बहिणीचा विवाह त्यांच्या दिराशी झाला. शेतामध्ये रसायने वापरून जमिन बंजर झाली होती. अशातच त्यांच्या घराचे विभाजन झाले आणि राम खदेड यांच्या वर घराची जिम्मेदारी आली. यासाठी त्यांनी होमगार्ड ची नोकरी केली आणि सोबत शेती करण्याचे ठरवले . पण शेतीसाठी त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नव्हती. यासाठी त्यांनी म्हैस विकुन सिंचनाची व्यवस्था केली. राम यांच्या मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी डाळिंबाची शेती करण्यास सुरुवात केली.

 असे मिळाले पहिले यश…

संतोष देवी

संतोष देवी यांनी सांगितले की त्यांनी लहानपणी आपल्या गावात करण्यात येणाऱ्या जैविक शेतीपासून खुप काही शिकले होते. त्याचा प्रयोग ति इथे करत होती. रामकरण सुध्दा होमगार्डची ड्युटी पुर्ण झाल्यानंतर शेतात संतोष देवी सोबत काम करत.  जैविक शेतीपासून पुर्ण तिनं वर्षांनंतर ३ लाखांचा नफा झाला.

डाळिंबाची शेती करणाऱ्या संतोष देवी यांनी आपल्या शेतात सफरचंदचे झाड लाऊन सर्वांना आश्र्चर्यचकित केले. जे त्यांना भेट म्हणुन हिमाचल मधुन आलैल्या कृषी वैज्ञानिक हरमनजित कौर यांनी दिले होते आणि येथुनच त्यांच्या सफरचंदाच्या शेतीला सुरुवात झाली.

मुलीच्या लग्नात दिले ५५१ रोपटे

संतोष देवी यांच्या परिवारामध्ये २ मुली आणि १ मुलगा आहे. हे तिघेही बिएस्सी अॅग्रिकल्चरल चे शिक्षण घेतात. आपल्या शिक्षणासोबतच फ्रि वेळेत हे शेतीमध्येही मदत करतात. साल २०१७ मध्ये जेंव्हा त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले तेंव्हा त्यांनी लग्नात आलेल्या सगळ्या नातेवाईकांना डाळिंबाची ५५१ रोपटी भेट म्हणुन दिली.

साल २०१६ मध्ये नविन तंत्रज्ञाना साठी मिळाला ‘ कृषी मंत्र पुरस्कार ‘

आपल्या मेहनतीने यश मिळवलेल्या संतोष देवी यांना जैविक शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वापरल्यामुळे राजस्थान सरकारने ‘कृषी मंत्र पुरस्कार’ प्रदान केला आणि सोबतच १ लाख रुपयांची राशी दिली. आज जैविक शेतीसाठी संतोष देवी खुप लोकांना प्रोत्साहित करते. त्यांच्याकडे २०-२५ लोक शेतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. ज्यांची व्यवस्था संतोष देवी स्वतः करतात.

२०१९ मध्ये विकले १५००० रोपटे

संतोष देवी सांगतात २०१९ मध्ये त्यांनी १५००० रोपटी मार्केट मध्ये विकली. यापासून त्यांना जवळपास १५ लाख रुपये नफा झाला.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 हेही वाचा: संजू सॅमसनचे शतक गेले वाया: शेवटच्या चेंडूवर किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवला 4 धावांनी विजय 

अफूचा व्यापार करणारा हा व्यापारी भारताचा सगळ्यात श्रिमंत माणुस बनला होता…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here