आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===


अफूचा व्यापार करणारा व्यापारी कसा बनला भारताचा सगळ्यात श्रिमंत माणुस?

कोण होती ति व्यक्ती जी कधी सगळ्यात श्रिमंत होती? ज्याने दारुच्या रिकाम्या बॉटल विकुन आपला व्यवसाय सुरू केला होता. नंतर तोच माणूस एक बिझनेस आयडल बनला. बिझनेस मधुन मिळणारा पैसा त्याने मोकळ्या मनाने मोकळ्या हाताने जनतेला दिला.

 

ती व्यक्ती दुसरी कुणी नसुन जगातील प्रसिध्द व्यक्ती जमशेदजी जीजीभॉय आहे. इतिहासकारांच्या मते जीजीभॉय यांचा जन्म गुजरातमधील नवसारी मध्ये झाला. परंतु विशिष्ट कारणाने त्यांनी आपले जन्मस्थान मुंबई सांगितले. एवढंच नाही तर त्यांनी आपले नाव जमशेद पासून जमशेदजी बनवले. कारण तेही इतर गुजराती व्यापाऱ्यांसारखे वाटावे.

अफू

त्यांच्या यशामागे निसंदेह पारसी समाजाचे धन आणि सहयोग आहे. पण हेही सत्य आहे की त्यांनी स्वताला बदलून एका विशिष्ट पद्धतीचे बनवले.

त्यांचे लहानपणीचे दिवस खुपचं दुःखद होते. त्यांचे वय १६ वर्षे होण्याअगोदर त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले होते. जीजीभॉय पारसी पंडित होते परंतु त्यांचे वडिल कपडे शिवण्याचे काम करत. त्यांच्या मृत्युनंतर  जीजीभॉय मुंबईत आपल्या मामाकडे आले. जिथे त्यांनी दारुच्या रिकाम्या बॉटल घेण्याचे आणि विकण्याचे काम सुरू केले. म्हणुन लोक त्यांना बाटलीवाला म्हणु लागले.

२० वर्ष वय असताना त्यांचे लग्न मामाची मुलगी अबाबाई सोबत झाले  जी त्यांच्याहुन दहा वर्षे लहान होती. याच परिवारासोबत त्यांनी पाच वेळा चायनाची यात्रा केली.

या यात्रेच्या दरम्यान खुप लोकांसोबत त्यांची ओळख झाली यातीलच एक आहेत डॉक्टर विलीयम जार्डन.

झाले असे की, आपल्या चौथ्या चिन यात्रेच्या दरम्यान जमशेदजी जीजीभॉय यांना फ्रेंच सैनिकांनी अटक केली. हि गोष्ट तेंव्हाची आहे जेंव्हा ब्रिटिश सैनिक आणि फ्रेंच सैनिकांमध्ये युध्द सुरु होते.

त्यावेळी जीजीभॉय एका ब्रिटीश जहाजावर होते ज्याचे नाव होते ब्रुन्सविक. फ्रेंच सैनिकांचा ब्रुन्सविकशी सामना झाला. खरतर ब्रुन्सविक हि एक व्यापारी नौका होती. त्यावर विशेष चालक दल किंवा कर्मचारी नव्हते.

त्यामध्ये असलेल्या बहुतांश व्यापाऱ्यांना बंदी बनवुन दक्षिण आफ्रिकेकडे नेण्यात आले. आणि तिथे त्यांना मुक्त करण्यात आले. अवघड हे होते कि तेथुन वापस येण्यासाठी काही रस्ता नव्हता. परंतु तरीही जीजीभॉय यांनी तेथुन वापस येण्याचे ठरवले. त्यांना वापस येण्यासाठी चार महिने लागले परंतु या चार महिन्यांनंतर त्यांचे जिवन पुर्णपणे बदलले.

प्रसिद्ध इतिहासकार जेस्सी पॅलेस्टिया लिहीतात ब्रुन्सविक वर जमशेदजी यांची एका तरुण डॉक्टर विलीयम सोबत मैत्री झाली. जो इस्ट इंडिया कंपनीत कामाला होता. येथुन त्याचे काम संपले होते. यामुळे त्याने आयात निर्यात गृह उभे करण्याचे ठरवले. जे आजही चीनमधील गौंगझहु येथे आहे.

हे आयात निर्यात गृह छोट्या मोठ्या कंपन्यांनी मिळुन बनले आहे. आज या गृहाची उलाढाल ४० खरब डॉलर आहे.
त्यावेळी अफूचा व्यापार ब्रिटिश लोकांना खुप लाभदायक ठरत होता. यामुळे चिनी लोकांना अफिमचे व्यसन लागले.
ब्रिटिश चायना मधुन चहाची खरेदी करत. यासाठी त्यांना रक्कम मोजावी लागे. रक्कम म्हणुन ते चांदीचा वापर करत. परंतु हा व्यापार ब्रिटीशांना परवडत नव्हता कारण यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागला. याला पर्याय म्हणून ब्रिटीशांनी चिनला चहाच्या बदल्यात अफूची देवाणघेवाण केली.

भारत हा एक ब्रिटीशांचा एक निवेशक देश होता आणि येथुन त्यांना मोठ्या प्रमाणात अफू मिळत असे. या अफूची मोठ्या प्रमाणावर आयात निर्यात हि जॉर्डन च्या गृहातुन होत असे.

जमशेदजी यांनी आपल्या अफूच्या आयात निर्यात फर्मची सुरुवात केली. हा फर्म त्यांनी सगळ्या जातीच्या लोकांना सोबत घेऊन केला. त्यांच्यामधील एक होते मोतीचंद अमिचंद जे  जैन समाजाचे होते. त्यांचा अफू उत्पादक शेतकऱ्यांसोबत चांगला संबंध होता. दुसरे होते महंमद अली रोगे जे कोकणी मुसलमान होते. ते जहाजाचे कॅप्टन होते.

अफू

खुप फायद्याचा राहिला अफूचा व्यापार

आपल्या वयाच्या ४० वर्षांपर्यंत जमशेदजी यांनी दोन करोड रुपये कमावले होते. हिंदुस्तान मधील सगळ्यात श्रिमंत लोकांमध्ये यांचे नाव घेतले जाऊ लागले. परंतु जीजीभाई यांचे ध्येय वेगळेच होते. जेंव्हा त्यांचा मुलगा कुरतेसजी मोठा झाला तेंव्हा त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतल्यास सुरूवात केली. लोकांच्या नजरेत आपले रुप चांगले राहावे यासाठी त्यांनी ड्रग्सचा व्यवसाय बंद केला.

१८५५ मध्ये त्यांचा व्यापार सर्वत्र पसरला होता. त्यावेळी त्यांनी २४ करोड रुपये दान केले. त्याच्या चैरीटीची निशाणी मुंबईतील जे.जे.हॉस्पिटल, जे.जे.कॉलेज, पुण्यातील वाॅटर सप्लायर आजही आहेत.

त्यांच्या अशा खुप साऱ्या सामाजिक कार्यांसाठी विक्टोरीया राणीने सन १८५७ मध्ये First Baronet of India या पुरस्काराने सन्मानित केले. हा ‘ सर ‘ या उपाधिच्या बरोबरीचा पुरस्कार होता. जमशेदजी जीजीभॉय यांच्या चैरीटी बघुन अनेक पारसी लोकांना ४०० शैक्षणिक आणि मेडिकल संस्थांना चैरीटी देण्यास सुरुवात केली.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

संजू सॅमसनचे शतक गेले वाया: शेवटच्या चेंडूवर किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवला 4 धावांनी विजय 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here