आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बाबासाहेबांनी दिलेल्या औषधांमुळे सुधारली त्यांच्या मित्राची प्रकृती


 

अद्वितीय बुद्धिमत्ता, त्याआधारे घेतलेले अति उच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक दर्जाची विद्वत्ता, क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, शिस्तबद्धता, संघटनकौशल्य ही अशी अनेक गुणवैशिष्टय़े बाबासाहेबांची आपण पाहिली आहेत. पुस्तकातून वाचली आहेत. त्यांचे असे काही अनेक पैलू आहेत त्यात ते किती पारंगत होते, याची आपणास कल्पना येईल.

बाबासाहेब धन्वंतरी म्हणून देखील त्यावेळी प्रसिध्द होते. आजारी व्यक्तीला कोणता आजार झाला आहे? त्याचे कारण काय? हे त्यावर कोणता रामबाण उपाय असेल?याची माहिती ते आजारी व्यक्तीला देत असत.

new google

बाबासाहेब

बाबासाहेबांचे मित्र बळवंतराव वराळे हे आजारी असल्याचे बाबासाहेबांना कळाले. त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या मित्राला आपल्या दिल्ली येथील राहत्या घरी पत्र लिहून बोलावून घेतले. बाबासाहेबांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे मित्र दिल्ली येथील हार्डी अॉव्हेन्यू मधील एक नंबर बंगल्यात गेले. त्यावेळी बाबासाहेब आपल्या दिल्लीतील मित्रांसोबत बागेत गप्पा मारत ओल्या शेंगा खात बसले होते. बळवंत या मित्राच्या प्रकृतीची चौकशी सविस्तर पणे बाबासाहेबांनी केली. वराळे यांनी आपल्याला जेवण जात नाही व शौचालय साफ होत नसल्याचे बाबासाहेबांना सांगितले.

एखाद्या धन्वंतरी ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी मित्राच्या प्रकृतीचे निदान केले आणि म्हणाले शौचाला होत नाही या भीतीने तो जास्त खात नाहीस व जास्त खात नाहीस म्हणून तुला शौचाला साफ होत नाही. अशा प्रकारचे दुष्टचक्र तुझ्यामध्ये निर्माण झाले आहे. माझे वडील आम्हा सर्वांसाठी एक औषध नेहमी देत असत.

तेच औषध तू सुरू कर म्हणजे बरे वाटेल. नंतर बाबासाहेबांनी ताबडतोब तेथे आलेल्या मंडळींपैकी धमिन नावाच्या एका व्यक्तीला आठ आण्याची सोनामुखी आणावयास सांगितले. सोनामुखी आणल्यावर समोरच खलबत्यावर त्यांची बारीक पूड केली. ती पूड वस्त्रगाळ  करून मित्राच्या स्वाधीन केली. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याबरोबर ती पूड रोज घेण्यास सांगितले.

 

माईसाहेबांचा होता विरोध

बळवंत यांनी रोज तो उपाय करण्यास सुरूवात केली. अवघ्या पंधरा दिवसांतच बळवंत यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास सुरूवात झाली, पण दुसरीकडे माईसाहेबांचा असले औषध घेण्यास पूर्ण विरोध होता. आधुनिक पध्दतीची कितीतरी औषधे उपलब्ध असताना बाबासाहेब हा देशी पाला का घेतात? याचेच आश्चर्य वाटत असे. बाबासाहेबांनी दिलेल्या औषधांमुळे मित्र बळवंत यांची प्रकृती सुधारली. कोणते पदार्थ खावे म्हणजे  प्रकृती सुधारते, याची माहिती बाबासाहेब आपल्या मित्राला देत होते.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

संजू सॅमसनचे शतक गेले वाया: शेवटच्या चेंडूवर किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवला 4 धावांनी विजय 

अफूचा व्यापार करणारा हा व्यापारी भारताचा सगळ्यात श्रिमंत माणुस बनला होता…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here