आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

लोहारु रियासत वाचवण्यासाठी एक कुत्रा मुघलांच्या सैन्याशी लढला होता…!


भारताच्या इतिहासामध्ये विर योध्दयांसोबत त्यांच्या घोड्यांचेही वर्णन वाचायला मिळते. आपल्याला माहित आहे इतिहासामध्ये खुप विर घोडे होउन गेले ज्यांनी युध्दामध्ये भाग घेतला कित्येकांनी विर मरण स्विकारले. या सगळ्यांमध्ये आपल्याला आठवतो तो मेवाडचे राजा महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक तसेच राणी लक्ष्मीबाई यांचा घोडा बादल. या दोघांनाही विर मरण आले होते.

आपण कधी इमानदार कुत्र्याबद्दल ऐकले आहे ज्याने २८ सैनिकांना मारले होते. जयंताने औरंगजेबाच्या सैन्याची फजिती केली होती. चला तर आज तुम्हाला मुघल शासकांच्या काळातील एका कुत्र्याबद्दल सांगणार आहोत जे ऐकुन तुम्हालाही अभामान वाटेल .

कुत्रा

मुघलांना धुळ चारणारा वफादार कुत्रा

हा किस्सा आहे लोहारू रियासत मधील सरदार बक्तावर सिंह याच्या वफादार कुत्र्याच्या. जयंताने युद्धाच्या मैदानामध्ये २८ सैनिकांना ठार मारले. आणि कित्येक जणांना असे चावला कि ते युध्द करु शकले नाहीत. हि गोष्ट आहे १६ व्या शतकातील जेंव्हा भारतावर मुघल साम्राज्याची सत्ता होती. तेंव्हा भारतावर औरंगजेबाचे साम्राज्य होते. त्याने हिंदुस्तान मधील सगळ्याच रियासतींवर कब्जा केला होता.

औरंगजेबाच्या सैन्याशी लढणारा इनामदार कुत्रा.

औरंगजेबाने हरियाणा आणि राजस्थान मधील सगळ्या रियासतींवर कब्जा केला होता पण अजुनही लोहारू रियासत बाकी होती. जि होती ठाकुर मदनसिंह यांची. हि रियासत शेखावत राजपुतांचा हिस्सा होती. लोहारू किल्ला  म्हणजे लोहारगड चे निर्माण १५७० मध्ये ठाकुर अर्जुन सिंह यांनी केले. तत्कालीन लोहारू रियासत मध्ये ५२ गाव येत होते तिला बावनी रियासत असे म्हणत.

२८ सैनिकांना मारले होते.

जेंव्हा १६७० – ७१ मध्ये जेव्हा औरंगजेबाने हि रियासत घेण्याचे ठरवले तेंव्हा तिथे ठाकुर मदनसिंह राजा होता. आणि त्यांचे दोन मुलं होते महासिंह आणि नौराबाजी. परंतु ठाकुर मदनसिंह यांचा एक वफादार सरदार होता बक्तावर सिंह . यांच्या जवळ एक वफादार कुत्रा होता त्याचे शरिर खुप मोठे होते आणि त्याच्या अंगावर खुप केस होते. तो ठाकुर मदनसिंह आणि बक्तावर सिंह यांना थोड्या वेळासाठीही सोडत नसे.

कुत्रा

लोहारु रियासत वाचवण्यासाठी.

सन १६७१ मध्ये लोहारु रियासत खुप श्रिमंत होती आणि औरंगजेब येथील राजस्व मिळवु पाहत होता. यासाठी त्यांनी ठाकुरांना प्रस्ताव पाठविला कि त्यांनी राजकोशाचा काही भाग द्यावा जेणेकरून तो त्या रियासतीची सुरक्षा करेल. परंतु ठाकुर स्वाभिमानी होता. त्याला कुणाची गुलामी करणे आवडणारे नव्हते. त्याने औरंगजेबाला आम्ही आमच्या रियासतीची सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहेत असे उत्तर पाठवले. यामुळे नाराज होऊन औरंगजेबाने येथिल गवर्नर अलफु खान यास हल्ला करण्यासाठी पाठवले.

अलफु खानने लगेच किल्ल्यावर आक्रमण केले. त्यांची माहिती ठाकुरांना होण्याआधी त्याच्या सैनिकांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केला होता. ठाकुरांनी लगेच युध्दासाठी सैनिकांना बोलावले आणि त्याच्या दोन मुलांसोबत भारतावर सिंह यांना युध्दासाठी पाठवले. बक्तावर सिंह यांच्यासोबत त्यांचा वफादार कुत्रा होता. हे बघुन मुघल सैनिक त्यांचा उपहास उडवु लागले कि ठाकुरांकडे सैन्य नसल्यामुळे कुत्र्याला युध्दासाठी आणले.

आपल्या मालकाला वाचवण्यासाठी कुत्रा युद्धात उतरला.

ठाकुरांचे सैन्य आणि मुघल सैन्य यांच्यात युध्द सुरु झाले. ठाकुर मदनसिंह यांचे दोन्ही पुत्र शहिद झाले पण बक्तावर सिंह पुर्ण बहाद्दुरीने लढत होते. त्याच्यासोबत त्याचा कुत्र्याची लढत होता. जो सैनिक भारतावर सिंह यांच्या तलवारीने घायाळ झाला तर याचे नरडे फोडुन हा त्याला ठार मारत असे. असे करून त्याने २८ सैनिक मारले आणि कित्येक जखमी केले.

युध्दाच्या मैदानात विरगती प्राप्त झाला कुत्रा.

कुत्र्याचे धाडस बघुन मुघल सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बक्तावर सिंह यांच्यावर वार झाले आणि ते शहिद झाले. आपल्या मालकाला मेलेले बघुन कुत्रा मुघल सैनिकांवर तुटुन पडला पण एका मुघल सैनीकाने त्यांचे मुंडके धडावेगळे केले. परंतु तोपर्यंत औरंगजेबाची सेना हारली होती आणि अलफु खान मैदान सोडून पळाला होता.

युध्द जिंकल्याच्या नंतर मदनसिंह यांनी आपला वफादार बक्तावर सिंह आणी त्यांचा कुत्रा यांच्या स्मरणार्थ समाधी बांधली. नंतर या समाधी पासुन थोड्याच अंतरावर बक्तावर सिंह यांची पत्नी चितेवर सती गेली, तिच्यासाठी एक सती मंदीर बांधण्यात आले जे आजही आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

संजू सॅमसनचे शतक गेले वाया: शेवटच्या चेंडूवर किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवला 4 धावांनी विजय 

अफूचा व्यापार करणारा हा व्यापारी भारताचा सगळ्यात श्रिमंत माणुस बनला होता…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here