आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरच्या जागी ‘या’ अष्टपैलू  खेळाडूला निवडले


 

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यापूर्वी मोठी घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने नियमित कर्णधार श्रेयस अय्यर याच्या एेवजी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अनिरुद्ध जोशी संघात सामील होणार असल्याचे फ्रँचायझीने सांगितले.

दिल्ली कॅपिटल्स

त्याचबरोबर कोरोना विषाणूची लागण झालेल्या अष्टपैलू अक्षर पटेलच्या अल्प मुदतीसाठी बदली खेळडूचीही घोषणा करण्यात आली आहे. अक्षर पटेलच्या जागी शम्स मुल्लानी काही काळ दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होतील. अनिरुद्ध जोशी यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघात होता. पण तो अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करू शकलेला नाही. 33 वर्षीय अनिरुद्ध जोशी गोलंदाजी करणारा अष्टपैलू आहे. श्रेयस अय्यरच्या जागी रिषभ पंत यावेळी दिल्लीचे नेतृत्व करीत आहेत.

 

दुसरीकडे, अक्षरच्या जागी थोड्या काळासाठी सामील झालेल्या शम्स मुलानीला आतापर्यंत मुंबईच्या होम टीमसाठी स्पर्धात्मक क्रिकेट खेळता आले आहे.  त्याला आयपीएलमध्ये प्रथमच संधी मिळाली. पण अक्षर पटेल सावरल्यानंतर तो संघातून बाहेर पडणार असल्याने तो मर्यादित काळासाठी संघाबरोबर राहील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here