आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या 5 गोलंदाजांनी आपल्या आंतरराष्ट्रीय करियर मध्ये एकही नो बॉल टाकला नाहीये…!


 

क्रिकेट हा एक टिम गेम म्हणुन ओळखला जातो. जिथे फक्त बॅटिंग चांगलं होन पुरेसं नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की बल्लेबाजांनी खुप मोठा स्कोर केला तर तुमचे काम झाले तर तुमची हार निश्चित आहे. यासाठी बॅटिंग सोबत गोलंदाजी आणि फिल्डिंग योग्य असण गरजेच आहे.

 नो बॉल

कारण जर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी योग्य काम नाही केले तर मोठा स्कोर असुनही तुमची हार होते. असे खुप सारे उदाहरण येथे आहेत.

नो बॉल, वाइड बॉल च्या रुपात गोलंदाजांची चुक विरोधकांना एक रन आणि एक बॉल जास्त मिळतो . आणि
नो बॉल असेल तर एक फ्रि हिटही मिळतो.

क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशेही काही गोलंदाज होउन गेले आहेत ज्यांनी आपल्या पुर्ण करियर मध्ये एकही नो बॉल नाही टाकला. आणि गर्वाची गोष्ट हि आहे या लिस्टमध्ये एक भारतीय गोलंदाज हि आहे.

१ . कपिल देव

कप्तान असताना कपिल देवने १९८३ मध्ये भारताला पहिला वर्ल्डकप जिंकवला. कपिलदेव राइट हैंड बॅट्समन आणि राइट हैंड बॉलर असणारा एक आॅलराउंडर खेळाडू होता. त्यांनी आपले वनडे आणी टेस्ट करियर १९७८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध सुरू केले आणि शेवटचा टेस्ट सामना १९९४ मध्ये न्युझिलंड विरुद्ध खेळला आणि शेवटचा वनडे मैच वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला. त्यांच्या नावावर खुप रेकॉर्ड आहेत.

ज्यामध्ये त्यांची उपलब्धी हि आहे कि आपल्या १३१ टेस्ट आणि २२५ वनडे मध्ये त्यांनी एकहि नो बॉल नाही टाकला. एकदा सुनिल गावसकर यांनी सांगितले  होते की, कपिलदेवने कधी प्रॅक्टिस मैचमध्येही नो बॉल नाही टाकला.

२ . डेनिस लिली

आस्ट्रेलियाचा प्रमुख  तेज गोलंदाज डेनिस लिली आपल्या काळातले महान गोलंदाज होते. ते एक राइट हैंण्ड फलंदाज आणि डावखुरे गोलंदाज होते. त्यांनी आपल्या ७० टेस्ट आणि ६३ वनडे करियर मध्ये डेनिस लिली यांनी एकही नो बॉल नाही टाकला.

नो बॉल

३ . इमरान खान

पाकिस्तान चे सध्याचे पंतप्रधान आणि पुर्व क्रिकेटर हमेशा काही न काही कारणांमुळे नेहमी चर्चेत राहतात. इमरान एक आॅलराउंडर खेळाडू होते जे राइट हैंड बॅट्समन आणि राइट हैनड बॉलर होते. या खेळाडुने एकुण ८८ टेस्ट आणि १७५ वनडे मैंच मध्ये ३७२ आणि १८२ विकेट घेतल्या. त्यांनी आपल्या पुर्ण करियर मध्ये एकही नो बॉल नाही टाकला.

४ . इयान बॉथम

इंग्लंडचे महान ऑलराउंडर म्हणुन इयान बॉथम यांना ओळखल्या जाते‌. आपल्या १६ वर्षाच्या क्रिकेट करियरमध्ये इयान बॉथम यांनी एकही नो बॉल नाही टाकला. क्रिकेट मधून निवृत्त झाल्यानंतर ते आता कॉमेन्ट्री करतात. २४ ऑगस्ट १९९२ ला पाकिस्तान सोबत त्यांनी शेवटचा वनडे मैच खेळला.

५ . लांन्स गिब्ज

वेस्ट इंडिज चे लांसलॉट रिचर्ड गिब्ज टेस्ट क्रिकेटमध्ये एक चांगले स्पिन गोलंदाज म्हणून ओळखला जायचे. त्यांचा इकॉनॉमि रेट चांगला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये ३०० विकेट घेणारे ते पहिले स्पिन गोलंदाज होते. ते राइट हैंड बॅट्समन आणि राइट हैंड आॉफ स्पिनर होते. त्यांनी आपल्या ७९ टेस्टमध्ये ३०९ विकेट घेतल्या. त्यांनी आपल्या पुर्ण क्रिकेटच्या करियर मध्ये एकही नो बॉल नाही टाकला.

असे हे पाच गोलंदाज ज्यांच्या डिक्शनरी मध्ये नो बॉल हा शब्द नव्हता . आणि आपल्या याच कुशलतेने त्यांनी आपल्या टिमला खुप वेळा जिंकुन दिले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here