आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ख्रिस मॉरीसच्या धडाकेबाज खेळीने राजस्थान रॉयल्सचा ‘दबंग’ दिल्लीवर ३ गडी राखून विजय


 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या सातव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सशी सामना झाला. राजस्थान रॉयल्सने रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केला. 148 धावांचे लक्ष्य राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकांत 7 गडी गमावून पार केले. राजस्थानकडून अखेरच्या दोन षटकांत ख्रिस मॉरिसने तुफानी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 18 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी खेळली. मॉरिसने षटकार खेचत राजस्थानला मोसमातील पहिला विजय मिळवून दिला.

ख्रिस मॉरीस

राजस्थानकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 62 धावा केल्या.  राजस्थानने 10 व्या षटकात 42 धावांत 5 गडी गमावले होते.  त्यानंतर मिलरने राजस्थानचा डाव हाताळला. त्याने 40 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दिल्ली कॅपिटल्ससाठी कंगिसो रबाडाने दोन गडी बाद केले. ख्रिस वोक्स 2 आणि अवेश खानने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तत्पूर्वी, जयदेव उनादकटच्या धारदार गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने दिल्लीला आठ बाद 147 धावांवर रोखले. उनादकटने चार षटकांत 15 धावा देऊन तीन गडी बाद केले. त्यांच्याशिवाय मुस्तफिजुर रहमानने 29  धावा देऊन दोन बळी घेतले.

दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने धावबाद होण्यापूर्वी 51 धावा केल्या. त्यांच्याखेरीज टॉम करनने 21 आणि ललित यादवने 20 धावा केल्या. दिल्लीच्या डावात एकही षटकार लागला नाही, यावरून रॉयलच्या अचूक गोलंदाजीचा अंदाज मिळू शकतो.  रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि त्यांच्या गोलंदाजांनी त्यांच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी कसलीही कसर सोडली नाही.

डावाच्या दुसर्‍या षटकात उनादकटने रॉयल्सला चांगली सुरुवात दिली. पृथ्वी शॉला धीम्या चेंडूवर 2 धावांवर डेव्हिड मिलरच्या साथीने झेलबाद केले. सलामीवीर शिखर धवनने (9) चेतन सकारियाला चौकार लगावला पण उनादकटच्या चेंडूवर त्याचा उत्कृष्ट झेल विकेटकीपर सॅमसनने घेतला. पंतने उनादकटवर चौकारासह खाते उघडले.

उनादकटने पुढच्याच षटकात अजिंक्य रहाणेला (08) आपल्याच चेंडूवर झेलबाद केले आणि दिल्लीने सहा षटकांत तीन बाद 36 धावा झाल्या.  पुढच्या षटकात मुस्तफिजूरने खातेही उघडू न देता मार्कस स्टोईनिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवून दिल्लीला चौथा धक्का दिला.

ख्रिस मॉरीस

त्यानंतर रिषभ पंत आणि आयपीएलमध्ये पदार्पण करणारा  ललित यादव यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. यादवने आयपीएलच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिसला दोन चौकार ठोकत खाते उघडले. पंतने राहुल तेवतियाचे चार चौकार ठोकले.  पंतने मुस्ताफिजुला चौकार मारुन 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  परागच्या पुढच्या षटकात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो गोलंदाजाकडून अचूक थ्रोमुळे बाद झाला.

 

त्याने 32 बॉलच्या डावात 9 चौकार ठोकले.  दिल्लीच्या 100 धावा 15 व्या षटकात आल्या. पण ख्रिस मॉरिसच्या त्याच षटकात तेवतियाने  मिडऑनमधून धावत येत यादवचा  (20) झेल घेतला. टॉम करन (21) आणि ख्रिस वोक्स (नाबाद 15) यांनी अंतिम षटकांत काही आकर्षक फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 147 धावांवर नेली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here