आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हजारो बेघरांवर मोफत उपचार करून ‘अभिजीत’ भिक्षेकऱ्यांचे फॅमिली डॉक्टर बनलेत…!


 

रुग्णालयाचे बिल न भरल्यामुळे उपचार न करणारे काही डॉक्टर किंवा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार देणाऱ्या संतापजनक घटना आपण ऐकल्या आणि पाहिल्या असतीलच. मात्र दुसरीकडे असे एक डॉक्टर आहेत जे रस्त्यावरील हजारो भिक्षेकऱ्यांना मोफत वैद्यकीय उपचार देऊन बरे केले. केवळ मोफत उपचार देऊन ते थांबले नाही तर त्यांना आर्थिक मदत करुन बेघरांच्या आयुष्यात स्वावलंबनाची पहाट देखील आणली आहे. ही कहाणी आहे ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ अशी ओळख असलेल्या डॉ. अभिजित सोनवणे यांची.

डॉक्टर

अभिजित सोनवणे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातल्या म्हसवड गावचे रहिवासी. पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातून १९९९ साली वैद्यकीय शिक्षण घेतले. डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर ते खडकवासला येथील अगळबें गावात जाऊन सुरुवात केली. पण पोटा पाण्या इतके देखील कमाई होईना. दुसरीकडे आंतरजातीय विवाह केल्यामुळे अभिजीत आणि मनीषा यांच्या घरचे लोकही दुरावले होते. त्यामुळं मदतीला कोणी येईना. पैशाअभावी परिस्थिती बिकट झाली. महागडे शिक्षण घेऊनही हवा तेवढा पैसा व्यवसायात मिळेना.

दिवसाला शंभर रुपये कामविणे मुश्किल होऊन बसले. मनात आत्महत्येसारखा विचार घोळू लागला. निराशेच्या गर्तेत अचानक एके दिवशी विचार करत मंदिराजवळ बसले. तेथेच मंदिराबाहेर बसलेल्या एका वृद्ध आजी आजोबांनी आपुलकीने अभिजित यांची चौकशी करुन समुपदेशन केले.  त्यांची परिस्थिती पाहून ते वृद्ध दाम्पत्याचे मनही हेलावून गेले. त्याचं वृद्ध दाम्पत्यांनी अभिजित यांना त्यांच्याकडे असलेले जेवण दिले. भीक्षेतून आलेले पैसेही डॉक्टरांच्या स्वाधीन केले. यावर काही दिवस त्यांनी काढले.

याच दरम्यान त्यांना एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. चांगल्या पगारामुळे त्यांचे राहणीमान देखील सुधारले. अमेरिकेत हेल्थ सेमिनारमध्ये कंपनीतर्फे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते गेले. न्यूयॉर्क सिटी मधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली. त्याच वेळी त्यांना त्यांच्या पडत्या काळात मदतीस आलेल्या त्या वृद्ध आजी आजोबांची आठवण आली. त्यांनी केलेली मदत स्मृती पटालातून जाईनाशी झाली.

अभिजित भारतात आल्यावर ज्यांच्या आशीर्वादाने आणि मदतीमुळे आपण मोठे झालो त्या वृद्ध आजी आजोबांचा शोध घेऊ लागले.  पण ते आजी आजोबा त्या मंदिरात त्यांना दिसलेच नाही. यामुळे अभिजित यांचे मन हेलावून गेले. संकटकालीन परिस्थितीत केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी या रस्त्यावरच्या भिक्षेकऱ्यांची रुग्णसेवा करण्याची इच्छा पत्नी मनीषास बोलावून दाखवली. त्यांनंतर पुण्यातल्या दवाखान्याची जबाबदारी पत्नीकडे सोपावली. स्वत:च्या सोहम ट्रस्टच्या माध्यमातून अभिजित १५ अॉगस्ट २०१५ रोजी भिक्षेकऱ्यांची तंदुरुस्ती मोहीम हाती घेतली.

डॉक्टर

पाच वर्षांपासून मोफत सेवा

शहरातील मंदिर, रस्तोरस्ती गल्लोगल्ली पालथी घालून आजारी भिक्षेकरू शोधून त्यांच्यावर उपचार करू लागले. पण हे लोक जन्मजात भिक्षेकरु नव्हते, ते परिस्थितीमुळे रस्त्यावर आले होते. या भिक्षेकरूना एका जागी बसल्यामुळे हाडांची आणि कित्येक दिवसांपासून अंघोळ केल्यामुळे त्वचेचे आजार दिसले तर काही बीपी आणि शुगर ने ग्रासलेले दिसले. अभिजित या लोकांवर मोफत उपचार करू लागले. आजार बरा झाला की हे लोक अोळख पाळख नसलेल्या अभिजित यांच्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवून देवता समजून आशीर्वाद देऊ लागले. गेल्या ५ वर्षापासून मोफत उपचार केल्यानं अभिजित आणि भिक्षेकरी यांच्यात आज मायेचे एक नात निर्माण झाले.

 

भिक्षेकरी करतात भिक्षेकऱ्यांनाच मदत

अभिजीत यांनी केवळ वैद्यकीय उपचार देऊन सोडले नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी भांडवल मिळवून दिले. भांडवलात खोट आल्याने सखाराम  रस्त्यावर आले.  मोठ्या दुकानातून त्यांना रुमालाचे गट्टे विकत घेऊन दिले. अाज तो चौकात रुमाल विकताना दिसतोय.

रखमाला नावाच्या आजीला फुलांचा व्यवसाय करण्यासाठी मदत केली. आज हेच भिक्षेकरी इतर भिक्षेकर्यांना स्वावलंबी करण्यासाठी आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा बाजूला काढून त्यांना देतात. आज ६१ लोक भीक न मागता स्वावलंबनाने जीवन जगत आहेत. रूग्णसेवेबरोबरच समाजसेवेचे व्रत धारण केलेले डॉक्टर अभिजित सोनवणे हे अपवाद ठरले आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here