आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हाजी मस्तान : बिना हत्याराचे मुंबई वर विस वर्षे राज्य करणारा डॉन

हि कहाणी आहे बिहार मधील एका व्यक्तिची जो जिवंत पणी स्वताला देव समजत होता. आपल्या शहरातील दुकानांमध्ये आपली फोटो लावत असे. जो आपल्यासमोर कुणाचेही काही चालु देत नसे. त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला सरळ मृत्यु दिला जात असे तेही मिसाल बनवुन. किडनैपिंग, मर्डर आणि फिरौती यांसारख्या अपराधाचे दुसरे नाव झाला होता मोहम्मद शहाबुद्दीन.

डॉन

शहाबुद्दीन चे बॅकग्राऊंड

मोहम्मद शहाबुद्दीन चा जन्म १० मे १९६७ मध्ये बिहार मधील सिवान जिल्ह्यातील प्रतापपुर येथील संपन्न परिवारात झाला. प्राथमिक शिक्षण तिथेच झाले आणि नंतर भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी, मुजफ्फरपुर येथुन झाले. त्यांच्याकडे पॉलिटिकल सायन्स मध्ये पिएचडी डिग्री आहे. त्यांच्या बायकोचे नाव हिना शहाब आहे. त्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलगा ओसाम इंग्लंडमध्ये लॉ चे शिक्षण घेत आहे.

राजकीय करियर ची सुरुवात

शहाबुद्दीन चे नाव तेंव्हा चर्चेत आले जेंव्हा तो लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली जनत दलाच्या युथ विंग मध्ये आला . राजनिती मध्ये त्यांचे सितारे बुलंदी वर होते. त्याची ताकद आणि दबंगगिरी बघुन पार्टीने त्याला विधानसभेचे तिकीट दिले. १९९० मध्ये शहाबुद्दीन जनता दलाच्या तिकीटावर जिरादेई विधानसभा जिंकुन पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचला. तेंव्हा त्याचे वय होते फक्त २३ वर्षे. १९९५ मध्ये पुन्हा एकदा शहाबुद्दीन निवडुन आला. यावेळी त्याचे वजन आणखी वाढले होते.

शहाबुद्दीनची राजनितीक ताकद बघुन पार्टीने त्याला लोकसभेचे तिकीट दिले आणि १९९६ मध्ये तो सिवान लोकसभा मतदारसंघातून निवडून आला.

१९९७ मध्ये जनता दलाचे गठन झाले लालू यादव यांचे सरकार बनले आणि यामुळे शहाबुद्दीन यांचे वजन वाढले.

जेएनयू छात्र संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ चंदु यांच्या हत्येमागे हात.

मार्च १९९७ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे छात्र संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांना सिवान मध्ये गोळ्या घालून छळणी केले होते जेंव्हा ते भाकपा मेळ्याची एक सभा घेत होते. ह्या हल्ल्यामध्ये खुप लोक सहभागी होते, शहाबुद्दीन चा जवळचा रुस्तूम मियाला या प्रकरणात सजा झाली आहे.

आता सिवान मध्ये सुरू होतो जनता दरबार आणि एक समांतर सरकार

आतापर्यंत शहाबुद्दीन चे वेगळे नामकरण झाले होते. जनता त्याला ‘ साहेब ‘ या नावाने ओळखत होती. लोकांच्या सामाजिक जिवनावर त्याचा प्रभाव वाढत होता. जसं जसे सत्तेचे संरक्षण त्यास मिळत होते तशी त्याची ताकद वाढत गेली. सिवान मध्ये त्याचा स्वतंत्र दरबार लागत होता. यामध्ये लोकांचे घरगुती तंटे, सामाजिक वाद, तसेच जमिनीचे वाद येथे सोडवल्या जात असत. डॉक्टरांची फिस फक्त ५० रुपये करा असा हुकूमच त्याने सोडला होता. त्याच्या जनतेच्या कामामुळे लोक त्याला साहेब म्हणत असत.

डॉन

तेजाब कांड, शहाबुद्दीन चा रूतबा आणि गिरफ्तारी.

हि गोष्ट आहे १६ ऑगस्ट २००४ ची. बिहारमधील सिवान जिल्ह्यातील चंद्रेश्वर प्रसाद उर्फ चंदा बाबु जे पेशाने एक व्यावसायिक आहेत आपली मुलगी आणि चार मुलांसोबत राहत असत. चंदा बाबु यांची एक किराणा आणि परचुन ची दुकान होती. दुकानावर त्या दिवशी त्यांचे दोन मुल गिरीश आणि सतिश बसले होते. काही बदमाश तिथे आले आणि त्यांनी सतिशला २ लाख रुपयांची रंगदारी मागीतली. सतिशने देण्यास नकार दिला तेंव्हा त्यांनी त्यास मारहाण केली. यामुळे सतिशने घरुन तेजाब आणुन त्यांच्या अंगावर टाकले. नंतर शहाबुद्दीन च्या गुंडांनी त्या दोघांना तेजाबने अंघोळ घालून मारुन टाकले.

त्याची  हिम्मत एवढी वाढली की नंतर याने २००१ मध्ये सगळ्यांसमोर पोलीस अधिकाऱ्याला थापड मारली. तेंव्हा पोलिसांना  जाग आली. पोलिसांनी  एक दल बनवून त्याला पकडण्यासाठी पाठवले. यामध्ये झालेल्या गोळीबारात दोन पोलीस मिळुन एकुण आठ लोक मरण पावले. शहाबुद्दीन आणि त्याच्या लोकांनी पोलीस जिपला आग लावली आणि पसार झाले.

नंतर २००५ मध्ये सिवानचे डि एम सि.के.अनिल आणि एसपी रत्न संजय यांनी एक योजना बनवुन शहाबुद्दीन ला गुप्तपणे उचलले. त्याच्या घरावर रेड मारण्यात आली. त्यामध्ये अशे हत्यार सापडले जे फक्त आर्मी कडेच असतात. यावर सुप्रीम कोर्टाने विचारले असता त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. जन्म ठेपेची शिक्षा झाली. त्याची रवानगी दिल्लीत तिहाड जेलमध्ये करण्यात आली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरच्या जागी ‘या’ अष्टपैलू  खेळाडूला निवडलय….! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here