आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या मंदिरामध्ये भगवान शंकर आणि विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते….!


 

लिंगराज मंदिर उड़ीसा ची राजधानी भुवनेश्वर मध्ये स्थित आहे. हे हिन्दू धर्माच्या प्रमुख आणि प्राचीनतम धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या मंदिराशी लाखों भक्तांची आस्था जोडली आहे.

या मंदिराशी खुप साऱ्या मान्यता आणि पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. लिंगराज मंदिर ची प्रसिद्धि आणि महत्व यामुळे दरवर्षी लाखों श्रद्धालु येथे भगवान शंकर आणि विष्णु चे हरिहर स्वरुपाच्या दर्शनासाठी आकर्षित होतात.
हे मंदीर फक्त धार्मिक रित्या महत्त्वाचे नाही तर आपल्या अद्भुत बनावटीमुळे खुप प्रसिद्ध आहे. हे उड़ीसा राज्यातील प्रमुख आर्कषणांपैकी एक आहे.

लिंगराज मंदिर

भगवान शिव चे हरिहर स्वरुपाला समर्पित लिंगराज मंदिराला सोमवंशी सम्राज्य चे राजा जाजति केशती द्धार बनवण्यात आले.या मंदिराची सगळ्यात मोठी खासियत हि आहे कि या मंदिरात फक्त हिन्दू धर्माचे लोक दर्शन करू शकतात, अन्य धर्माच्या लोकांना या मंदिरामध्ये प्रवेश नाही. इथे शिवरात्रि च्या दिवशी विशेष उत्सव होत असतो, ज्यामध्ये लाखों श्रद्धालु येतात.चला तर बघुया भुवनेश्वर च्या या प्राचीनतम लिंगराज मंदिराच्या निर्माण, इतिहास, वास्तुकला आणि यासोबत जोडलेल्या पौराणिक कथा आणि उत्सवांबद्दल.

लिंगराज मंदिराचे निर्माण आणि याचा इतिहास.

भारताच्या सगळ्यात प्राचीनतम मंदिरांपैकी लिंगराज मंदिर च्या वर्तमान स्वरुपाला जवळपास ११ वे शतक (१०९० पासून ११०४ मध्ये) बनवण्यात आले.

काही इतिहासकार आणि विद्दानांच्या मते मंदिर ६ व्या शतकाच्या नंतर आस्तित्वात आले होते कारण ७ व्या शतकाच्या संस्कृत लेखांमध्ये या मंदिराचे वर्णन आढळते.

तसेच महान इतिहासकार फग्युर्सनच्या म्हणण्यानुसार या मंदिराचे निर्माण काम ललाट इंदु केशरी ने ६१५ पासून ६५७ ईसवी च्या मध्ये केले . यानंतर जगमोहन (प्रार्थना कक्ष) आणि मुख्य मंदिर आणि मंदिराचे टावर चे निर्माण ११ व्या शतकामध्ये केले होते. लिंगराज मंदिराच्या भोग-मंडप चे निर्माण १२ व्या शतकामध्ये केले गेले.

इतिहासकारांच्या मते सोमवंशी सम्राज्याचे शासक पहिल्या जाजातीने जेंव्हा आपली राजधानी राजस्थानच्या जयपुर पासुन उड़ीसा प्रांत च्या भुवनेश्वर मध्ये स्थानांतरित केली, तेंव्हा त्यांनी जवळपास ११ व्या शतकामध्ये या मंदिराचे निर्माण कार्य केले.

हे भारतातील असे एकमेव मंदिर आहे, जिथे भगवान शंकर आणि भगवान विष्णु दोघांचेही रूप या मंदिरात वसतात.

लिंगराज मंदिराशी जोडलेली लोकप्रिय पौराणिक कथा.

आपले धार्मिक महत्व आणि अद्भुत कारीगिरी साठी प्रसिध्द लिंगराज मंदिराशी खुप मान्यता आणि पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. एक प्रसिद्ध पौराणिक कथेच्या अनुसार, भगवान शिवाची अर्धांगिनी देवी माता पार्वती ने लिट्टी आणि वसा नावाच्या दोन महापापी राक्षसांचा वध भुवनेश्वर चर्या याच स्थानी केला.

आणि या युद्धानंतर जेंव्हा देवी पार्वतीला तहान लागली, तेंव्हा भगवान शिव इथे अवतरित झाले आणि सगळ्या नद्यांच्या योगदानातुन बिंदू सरस झील चे निर्माण काम केले जेकी बिन्दुसागर सरोवर नावाने ओळखले जाते. या सरोवराच्या जवळच लिंगराज चे अद्भभुत आणि विशालकाय मंदिर स्थित आहे.

लिंगराज मंदिर मध्ये महाशिवरात्रीला विशेष उत्सव.

भारताच्या या प्रसिद्द मंदिरामध्ये हिन्दुंच्या पवित्र सणांना मोठ्या जल्लोषात साजरे केले जाते.सणांच्या काळात भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या मंदिरापासून निघणारी रथ यात्रा, चंदन यात्रा आणि महाशिवरात्रि चे पर्व खुपच हर्षोल्लासाने साजरे केले जाते .

भगवान हरिहरांना समर्पित या मंदिरा मध्ये फाल्गुन महीन्याच्या महाशिवरात्रीला उत्सव साजरा केला जातो. या दिवशी या मंदिरामध्ये प्रतिष्ठित शिव प्रतिमेला विशेष प्रकारे सजवल्या जाते.

महाशिवरात्रीच्या दिवशी लिंगराजला धतूरा, बेलपत्र, भांग चढवल्या जाते. या दिवशी भक्तगन पूर्ण दिवस उपवास करतात आणि भगवान शंकर चा रुद्राभिषेक करतात. या दिवशी सगळे भक्त भगवान शिवाची साधाना करतात. शिवरात्रीचा मुख्य उत्सव रात्री होतो, परंतु भक्तजन लिंगराज मंदिर च्या शिखरावर महादीप ला प्रज्जवलित केल्यानंतर आपले व्रत सोडतात.

महाशिवरात्री शिवाय भगवान शंकराच्या या प्रसिद्ध मंदिरामध्ये चंदन समारोह आणि चंदन यात्रा चा उत्सव खुप धामधुमीत करतात. चंदन समारोह या मंदिरामध्ये जवळपास २२ दिवस चालणारा महापर्व आहे . आपल्या अद्भुत कारागिरी साठी भारतामध्ये प्रसिद्ध या लिंगराज मंदिर मध्ये अष्टमी च्या दिवशी निघणारी रथयात्रा इथे खुप प्रसिद्ध आहे . या रथयात्रे दरम्यान मंदिरातील देवी-देवतातांना संदर रथाणध्ये बसवुन रामेश्वर च्या देवला मंदिराला नेण्यात येते. यावेळी लिंगराज मंदिराचे आर्कषण दोन पट वाढते.

लिंगराज मंदिर

लिंगराज मंदिरामध्ये जाण्यासाठी नियम.

भगवान विष्णु आणि भगवान शिवाला सर्मपित लिंगराज मंदिरामध्ये ज्याप्रकारे गैर हिंदुंना प्रवेश बंदी आहे तसेच खुप साऱ्या नियमांचे पालन करावे लागते. लिंगराज मंदिरामध्ये कैमरा, मोबाइल आणि चमड़े ची बेल्ट, बैग सारख्या खुप साऱ्या वस्तु नेण्यास बंदी आहे .

या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी करण्यावर बंदी आहे. मंदिरामध्ये जाणाऱ्या भक्तांना मंदिरामधील सेवकांपासुन दुर राहण्यास सांगितले जाते कारण ते भक्तांपासुन पैसे उकळतात.

लिंगराज मंदिराचे दर्शन आणि बिन्दु सरोवरामध्ये स्नान करण्याचे महत्व:

लिंगराज मंदिर मध्ये ज्या भक्तांना येऊन भगवान शिव यांचा रुद्राभिषेक करायचा असेल तर त्यासाठी, टिकीट खरेदी  करावे लागते. मंदिरातील प्रतिष्ठित लिंगराज चे दर्शनासोबत बिन्दु सरोवर मध्ये स्नान करण्याबाबत काही मान्यता आहेत या सरोवर मध्ये स्नान केल्यावर भक्तांच्या शारीरिक आणि मानसिक बीमारी दुर होतात.

लिंगराज मंदिर मध्ये दर्शनासाठी कसे पोहचावे.

लिंगराज मंदिर मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. येथे वायु, रेल्वे आणि सड़क तिन्ही मार्गाने पोहचता येते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here