आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

इतिहास रचणा-या देशाच्या महान विरांगना रजिया सुलतान यांचा जिवन परिचय


 

रजिया सुलतान इतिहासामधील सर्वांत शक्तिशाली महिला होती, जिने पहिली महिला शासक बनुन फक्त इतिहासच रचला नव्हता तर दिल्लीच्या गादीवर साल १२३६ ते १२४० एक न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष आणि साहसी शासक म्हणून काम केले.

रजिया सुलतान ने आपल्या राज्यात खुप विकास कामे केली आणि शिक्षणाला महत्त्व दिले. तिच्या मध्ये एका महान शासकाचे सर्व गुण होते. तिच्या सैन्य कुशलतेवर अमिर तुर्की सुलतान जळत होते. रुढीवादी मुस्लिम समाजाचीही आलोचना तिला सहन करावी लागली. कारण हे होते कि त्यावेळी मुस्लिम स्त्रिया बुरखा घालून घरात राहत आणि रजिया पुरुषांचा पोशाख घालून राज्य चालवत असे.

new google

रजिया सुलतान

रजिया सुलतानचा जन्म , शिक्षण आणि परिवार

रजिया सुलतान चा जन्म दिल्लीचा सुलतान शम शुद्दीन इल्तुतमीश यांच्या घरी १२३६ मध्ये झाला. रजिया सुलतान ला तिनं भाऊ आणि ती एकटी होती. परंतु या तिघांमध्ये रजियाच फक्त कर्तृत्ववान होती. तिचे वडिल शम शुद्दीन इल्तुतमीश यांनी तिची प्रतिभा लहानपणीच ओळखली होती. त्यांनी तिला सैन्य प्रशिक्षण दिले तसेच एक सक्षम शासक बनण्यास योग्य बनवले.

दिल्लीची सल्तनत आणि पहिल्या मुस्लिम महिला शासकाच्या रुपात रजिया सुलतान.

रजियाचे वडिल शम शुद्दीन इल्तुतमीश यांनी तिचे सैन्य प्रशिक्षण बघुन अगोदरच तिला उत्तराधिकारी म्हणून घोषित करुन इतिहास रचला होता. परंतु दिल्लीच्या गादीवर बसण रजिया साठी एवढं सोपं नव्हतं . सन १२३६ मध्ये तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुस्लिम समुदायाने तिला शासक म्हणुन स्विकार करण्यास नकार दिला आणि तिचा भाऊ रखुद्दीन फिरोज ला दिल्लीच्या गादीवर बसवल.

परंतु रखुद्दीन फिरोज एक मुर्ख आणि असक्षम शासक निघाला. त्यानंतर रजियाच्या आईला गादी सोपवण्यात आली पण काही दिवसांनी त्याचा खुन करण्यात आला. यानंतर १० अक्टोंबर १२३६ ला रजिया सुलतान बनली आणि तिने पहिली महिला शासक बनुण इतिहास रचला. रजिया सुलतान ने आपल्या विवेकशील बुध्दीने राज्य सांभाळले.

रजिया सुलतानचे महत्त्वपुर्ण काम आणि उपलब्धता

तिने आपल्या कुशल सैन्य नेतृत्वाखाली दिल्लीला सुरक्षीत ठेवले. कानुन व्यवस्था योग्य केली, शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालय सुरू केली. राज्यामध्ये पाण्याची व्यवस्था केली, सडकांचे जाळे निर्माण केले. याव्यतिरिक्त त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी काम केले.

रजिया सुलतान ची प्रेम कहाणी आणि विवाह

रजिया सुलतान आणि गुलाम जमालुद्दीन याकुत यांचे प्रेम कहाणीचे किस्से आजही इतिहासामध्ये ऐकायला मिळतात. त्यांची प्रेमकहाणी इतिहासातील सगळ्यात चर्चित आणि बेमिसाल होती. रजिया सुलतान ला आपला सलाहकार याकुत सोबत प्रेम झाले होते . दोघांचे प्रेम लवकरच वाढत चालले होते, यानंतर सगळ्याच मुस्लिम शासकांनी याला विरोध केला.

तसेच भटिंडाचे गवर्नर राज्यपाल इख्तुनिअर अल्तुनीया हाही रजियाच्या सुंदरतेच्या जाळ्यात अडकला होता. तिला मिळवण्यासाठी त्याने दिल्लीवर हल्ला केला आणि रजिया सुलतानचा प्रेमी याकुतला ठार मारले. यानंतर रजियाला आपले राज्य वाचवण्यासाठी अल्तुनीया सोबत लग्न केल्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळे तिने त्यांच्यासोबत लग्न केले पण शेवटपर्यंत तिने याकुतवरच प्रेम केले.

 

यानंतर दिल्लीमध्ये विद्रोह झाला आणि रजियाचा भाऊ मैजुद्दीन बेहराम शाह हा दिल्लीचा शासक बनला. त्याविरुद्ध रजियाने आपल्या पति सोबत युध्द केले परंतु या युध्दात ति पराभूत झाली. ते दोघेही पळुन जात असताना जाट शासकांनी रजिया ला मारले.

रजिया सुलतान

रजिया सुलतान च्या पतनाचे मुख्य कारण

रजिया एक प्रजाहितदक्ष शासक होती. परंतु तिच्या राज्यामध्ये काही मोठे मोठे सुभेदार आणि व्यवसायी होते जे आपली मनमानी करुन जनतेचा छळ करीत होते. परंतु रजिया सुलतान च्या काळात अमिरांवर नियंत्रण ठेवण्यात आले, यामुळे त्यांना मनमानी करता येत नव्हती. यामुळे हा वर्ग रजिया सुलतान वर नाराज होता.

रजियाचे महिला असणे

रजिया सुलतान च्या पतनाचे कारण तिचे महिला असणे हेही सांगितले जाते. ति एक महान योध्दा होती आणि कुशल प्रशासक होती परंतु बाकिच्या मुस्लिम सुलतानांना तिच्या प्रभावाखाली राहणे मान्य नव्हते. त्यांना तो त्यांचा अपमान वाटत असे . कारण त्या काळात महिला फक्त घरापर्यंत मर्यादित होत्या.

रजियाचे पुरुषासारखे राहणे

रजिया सुलतान पहिली महिला होती जि षुरुंषासारखा पोशाख घालत होती. हे मुस्लिम समाजाच्या परंपरेविरुध्द होत. एवढंच नाही तर तिने पुरुषांसारखी शिकार करणे, युद्ध करणे हे काही कट्टर मुस्लिम लोकांना पटत नव्हत. यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाच्या आलोचनेला सामोरे जावे लागे. हेही रजिया सुलतानच्या पतनाचे मुख्य कारण असु शकते.

 याकूत सोबत रजिया सुलतान चे संबंध

रजिया सुलतान च्या पतनाचे कारण तिचे याकूत सोबतचे प्रेम संबंध ही सांगितले जाते. त्यांचे अफ्रिकन गुलामासोबत प्रेम प्रकरण त्यांच्या पतनाचे कारण ठरले. रजिया सुलतानच्या साहस आणि विरतेची कहाणी भारतीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवली आहे. ति दिल्लीच्या तख्तावर राज्य करणारी पहिली महिला होती, जिच्यावर सर्व भारतीयांना गर्व आहे .

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here