आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कसा एक कॉमेडियन बनला देशाचा पंतप्रधान बनला?


 

सत्तेच्या शिर्ष स्थानी पोहचणे असेही अवघड काम आहे. आणी याहुनही अवघड आहे त्या पदावर टिकुन राहणे. मग ते राजेशाही असो वा लोकशाही. राजेशाही मध्ये तर फक्त राजघराण्यातील व्यक्तिच या पदावर जाउ शकते परंतु लोकशाही मध्ये जनतेची मर्जी असल्याशिवाय या पदावर पोहोचु शकत नाही.

कॉमेडियन

परंतु का हे सामान्य माणसासाठी सोपे आहे ? साधारणपणे हेच पाहिले जाते की सामान्य माणसाला सत्तेची वाट सोपी नाही. भारतासारख्या सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या देशामध्ये एका सामान्य माणसाला उच्च पदावर पोहचणे फार अवघड आहे.

जास्त सांसद तेच असतात ज्यांच्या घरचे पूर्वीपासूनच राजकारणात आहेत. तर उच्च पदाचे काय बोलावे?

हा ही गोष्ट वेगळी आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोणतेही पारिवारिक राजकीय अस्तित्व नव्हते, एका साधारण कुटुंबातून राजकारणामध्ये आले. असं म्हणतात की ते लहानपणी रेल्वेमध्ये चहा विकत होते. त्या हिशोबाने पाहिली तर आज एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान आहे. परंतु पंतप्रधान पदापर्यंत चा त्यांचा प्रवास काही अचानक नाही झाला.ते खूप काळापासून राजकारणात होते. पंधरा वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.

नायक सारख्या सिनेमांमध्ये आपण पाहिले आहे की कसा एक सामान्य माणूस एका दिवसासाठी मुख्यमंत्री होतो. पण तो सिनेमा आहे वास्तव नाही.

वास्तव जीवनामध्ये काय हे घडणे शक्य आहे? काय कोणी अचानक कोणताही राजकीय अनुभव नसताना सर्वोच्च पदापर्यंत पोहोचून नेतृत्व करू शकेल ?

भारतामध्ये हे होऊ शकते की नाही माहित परंतु अशातच युक्रेन मध्ये हा चमत्कार घडला आहे. ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत.

युक्रेनमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये हास्य अभिनेता वोलोदीमीर जेलेंस्की ने वर्तमान राष्ट्रपति पेट्रो पोरोशिको ला हरवले.
युक्रेनमध्ये बदल घडवण्याच्या वाद्यांवर वोलोदीमीर यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. परंतु ही गोष्ट अजून ठरलेले नाही की नेता म्हणून ते काय करतील. याला सत्ता प्रस्थापित लोकांना मोठा धोका माणल्या जात आहे. परंतु असे काय झाले होते की एक हास्य अभिनेता राष्ट्रपती बनला.

असं म्हटलं जाते की लोक युद्ध आणि सामाजिक अन्याय यामुळे नाराज होते. एवढंच नाही तर एक हास्य अभिनेता 73 टक्के मतदान घेऊन निवडून आला, लोकांना त्याच्याकडून बदलाची अपेक्षा आहे.

वयाच्या 41 व्या वर्षी राष्ट्रपती बनणाऱ्या जेलेन्स्की यांनी स्पष्टपणे एक नारा दिला होता, “वादा नाही माफी नाही.”
राजकीय भूमिका म्हटली तर जे लेंस की फक्त एका टीव्ही शोमध्ये राष्ट्रपतीची भूमिका साकारलेली आहेत.

पूर्व राष्ट्रपतींना देऊ शकतात कॅबिनेटमध्ये जागा.

साधारणपणे राजकारणामध्ये हे पाहिले जाते की विरोधकांना पुढे येऊ द्यायचं नाही. परंतु जिंकल्यानंतर पत्रकारांना बोलताना जे लेंस की यांनी सांगितले अधिकारीकरित्या त्यांनी राष्ट्रपती पदाचा कारभार अजून सांभाळलेला नाही. ते युरोपातील गरीब देशांच्या यादीत असणाऱ्या युक्रेन ला बदलणार आहेत.

जेव्हा त्यांना विचारण्यात आली जुनी सरकार आणि पूर्व राष्ट्रपती यांचे तुमच्या कार्यकाळात काय काम असेल तर त्यांनी सांगितले की हे जनतेला विचारून ठरवण्यात येईल कॅबिनेटमध्ये त्यांना एखादी जागा ही मिळू शकते.

कोण आहेत वोलोदीमीर जेलेंस्की ?

स्थानिय मीडिया जेलेन्स की यांना युक्रेनचा डोनाल्ड ट्रम्प असा करार देते. त्यांचा जन्म यहुदी वैज्ञानिक परिवारामध्ये झाला. वोलदीमीर युक्रेनमध्ये खूप काळापासून चालणाऱ्या टीव्ही सिरीज सर्वेट ऑफ द पीपल मध्ये प्रमुख रोल निभावणारे ॲक्टर होते. या सीरिजमध्ये चुकून त्यांचा रोल राष्ट्रपतींचा होऊन जातो.

पंतप्रधान

नंतर जेलेन्स की ने आपल्या टीव्ही शो च्या नावाने राजनीतिक पार्टी जॉईन केली. परंतु त्यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नव्हता.

दुनिया भरातल्या नेत्यांनी दिलेल्या शुभकामना.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे नेता यांनी त्यांना जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. युरोपीय संघ परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड आणि युरोपीय आयोगाचे प्रमुख जीन क्लाऊड यांनीसुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या.

या ऐतिहासिक वेळी ते आपल्या देशवासीयांना म्हणाले, ” मी कधी तुम्हाला लज्जित नाही करणार. माझा कार्यकाळ झाल्यानंतर सगळ्या देशांना सांगीन आमच्याकडे बघा सगळं काही शक्य आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here