आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम करतोय विराट कोहलीचा पाठलाग; मोडलेत ‘हे’ तीन विक्रम

पाकिस्तान संघाचा कर्णधार आणि उजव्या हाताचा फलंदाज बाबर आजमने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे बाबरने 2017 पासून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान असलेल्या विराट चे पहिले स्थान बळकावले.

आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणारा बाबर पाकिस्तानचा चौथा फलंदाज आहे. गेली काही वर्षे पाकिस्तानकडून खेळत बाबर सर्वच प्रकारात चांगली कामगिरी करत होता. याआधी 1983 मध्ये झहीर अब्बास, 1988 मध्ये जावेद मियांद आणि 2003 मध्ये मोहम्मद युसूफ यांनी आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते.

बाबर आझम

रन मशीन आणि रेकॉर्ड ब्रेकर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम मोडण्यासाठी नेहमीच ओळखला जातो.  कोहली सध्या क्रिकेट विश्वाचा सूर्य आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली ला मागे टाकत बाबरचे पुढे येणे हे पुन्हा एकदा भारतीय फलंदाज आणि पाकिस्तानी फलंदाजाची तुलना करण्याचे कारण बनले आहे.

टी -20 मध्ये सर्वात जलद हजार धावा

 

बाबर आझमने नोव्हेंबर 2018 मध्ये टी -20 मध्ये सर्वात वेगवान 1,000 धावांचा विक्रम विराट कोहलीचा विक्रम मोडला.  विराटने टी -20 मध्ये 1000 धावा करण्यासाठी 27 डावांचा सामना केला, तर बाबरने 26 डावात हे स्थान मिळवले.  मात्र, तो जास्त दिवस अव्वल क्रमांकावर राहू शकला नाही आणि इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मिलानने त्याचा विक्रम मोडला.  मिलानने केवळ 24 डावांमध्ये सर्वात वेगवान 1,000 धावा केल्या.

सर्वात जलद 13 वनडे शतके

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या 103 धावांच्या शानदार खेळीमुळे पाकिस्तानचा फलंदाज बाबरने वनडेमध्ये सर्वात वेगवान 13 शतके ठोकली आहेत. बाबरने हे काम फक्त 76 डावांमध्ये केले. त्याने हाशिम आमला आणि विराट कोहलीचे विक्रम मोडले. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिमने 83 डावात ही कामगिरी बजावली तर विराट कोहलीने  86 डावात हा कारनामा केला.

वनडेमध्ये 3000 धावा

2019 च्या आयसीसी विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शानदार खेळी करत सर्वात वेगाने तीन हजार धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला. बाबरने हे 68 डावात पूर्ण केले. त्याआधी विराट कोहलीने 75 डावात हे स्थान गाठले होते. एकदिवसीय सामन्यात वेगवान 3 हजार धावांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमला अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. हे स्थान मिळविण्यासाठी आमलाने केवळ 57 डावांचा सामना केला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here