आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

भिक्षा मागणाऱ्या अनाथ मुलांच्या सेवेसाठी या जोडप्याने आपलं आयुष्य वाहिलंय…!

 

कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रातल्या अनेक शेतकर्‍यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. शेतकरी कुटुंब प्रमुखांनी आत्महत्या केल्याने कित्येक घरे उद्धवस्त झाली आहेत. या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना प्रार्थना बालग्रामच्या माध्यमातून भावनिक आणि मानसिक आधार देण्याचे काम सोलापूर शहरातलं एक दाम्पत्य करतंय. अनु प्रसाद मोहिते असं या दाम्पत्याचे नाव आहे.

new google

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग गावाजवळील ईर्लेवाडी हे प्रसादचं मूळ गाव. मुळात प्रसाद हा आत्महत्याग्रस्त कुटुंबातला. वडिलांच्या निधनानंतर आईच्या पदराखाली वाढलेला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुढे शहरात स्थायिक झाला. त्यावेळी शहरात असंख्य निराधार मुलं शिक्षण सोडून पोटासाठी भटकंती करताना दिसली. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात यावं यासाठी काहीतरी करावे, असा विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला. सामाजिक कार्यात काम करत असताना प्रसाद आणि अनुची ओळख झाली. ते दोघेही एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत होते. सामाजिक जाणीवेतूनच त्यांनी समाज कार्याला सुरुवात केली.

भिक्षा मागणाऱ्या स्थलांतरित, बेघर अश्या मुलांना एकत्र करून त्यांना शिक्षण देण्यासाठी शहरातील पालांवर वंचितांची शाळा २०१६ साली सुरू केली. समाजकार्याच्या विचाराने झपाटलेल्या या दोघांनी पुढे जाऊन अांतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर समाजाची सेवा करण्याची शपथ दोघांनी घेतली. दोघांची जात वेगळी असल्यामुळे त्यांना प्रचंड विरोध झाला. हा विरोध मोडीत काढून त्यांनी आंतरजातीय विवाह केला. स्वत:चे लग्न त्यांनी थाटामाटात न करता सामुदायिक विवाह सोहळ्यात आपल्या सात जन्माच्या रेशीमगाठी बांधल्या. लग्नाला लागणार खर्च त्यांच्याच शाळेतील अनाथ पाच मुलींच्या नावे मुदत ठेव करून ठेवली.

लग्नताच त्यांनी अवयवदान तसेच देहादनाचा संकल्प करत एक सामाजिक संदेश दिला. मोहिते दाम्पत्य प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, निराधार, भिक्षा मागणारे अश्या कित्येक मुलांना शिक्षण, संस्कार व आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी भाड्याच्या जागेत प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प सुरू केला आहे. हे काम करत असताना दुर्दैवाने त्यांना चांगल्या पगाराची नोकरी गमवावी लागली. प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी स्वत:ची जमीन विकली. सोनं मोडले. नोकरीनंतर हार न मानता अनु ने मेस चालवत तर प्रसाद रिक्षा चालवून प्रकल्पाची उभारणी करत आहेत.

पुरस्काराची रक्कम प्रकल्प उभारणीवर खर्च

लग्नानंतर त्यांना एक गोंडस मुलगी झाली होती. परंतु दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. यातून सावरत त्यांनी त्या चिमुकलीच देहदान केलं. पुढे ते रस्त्यावर राहणारे बेघर वृध्द लोकांच्या आरोग्यावर काम करू लागले. आजारी असलेल्या वृद्ध लोकांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार केले. आतापर्यंत 35 बेघर रुग्णांना जीवनदान देण्याचे महान कार्य केलं आहे. अशा बेघर लोकांना कायमचा निवारा मिळावा यासाठी ते मोरवरंची येथे वृद्धाश्रम सुरू करत आहेत. सामाजिक कार्याची दखल म्हणून विविध संस्थांनी दिलेल्या पुरस्काराची रक्कम ते या वृद्धाश्रम उभारणीसाठी खर्च करत आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here