आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दीपक चाहर ची चालली जादू; चेन्नई सुपरकिंग्जचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर एकतर्फी विजय


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाजीचा क्रम सीएसकेच्या गोलंदाजांसमोर पत्त्यांप्रमाणे कोसळला गेला आणि संघ 20 षटकांत केवळ 8 बाद 106 धावा करू शकला. संघासाठी युवा फलंदाज शाहरुख खानने सर्वाधिक 47 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने मोईन अली (47) आणि फाफ डुप्लीसीच्या नाबाद खेळीच्या नाबाद 107 धावांचे लक्ष्य केवळ 15.3 षटकांत चार गडी गमावून पूर्ण केले.

107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने केवळ 24 धावांवर ऋतुराज गायकवाडची विकेट गमावली. सलग दुसर्‍या सामन्यात फलंदाजीत ऋतुराज निराशा केली आणि 16 चेंडूंचा सामना करून अवघ्या 5 धावा करता आला. यानंतर मोईन अली आणि फाफ डुप्लसी यांनी दुसर्‍या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली आणि जवळपास सीएसकेचा विजय निश्चित केला. 31 चेंडूत 31 धावा काढून मोईन अली मुरुगन अश्विनच्या चेंडूवर बाद झाल‍ा. यानंतर मोहम्मद शमीने सुरेश रैना (8) आणि अंबाती रायुडू यांना दोन चेंडूंमध्ये खाते न उघडता बाद केले. अंतिम सामन्यात सॅम करन आणि फाफ ही जोडी नाबाद राहत सामना जिंकून दिला.

दीपक चाहर

तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णया योग्य ठरवत पॉवरप्लेमध्ये 26 धावा देऊन चार बळी घेतले. यात दीपक चहरने महत्त्वाची भूमिका बजावली. ज्याने पहिल्याच षटकात मयंक अग्रवालला (0) क्लिन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतरही त्याने दबाव कायम ठेवला आणि त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ दोन चौकार दिले. फॉर्ममध्ये असलेल्या पंजाबचा कर्णधार केएल राहुल (5) चोरटी धावा घेण्याच्या प्रयत्नात शॉर्ट कव्हरवर उभे असलेल्या रवींद्र जडेजाच्या शानदार थ्रोने बाद झाला. त्यानंतर जाडेजाने पाचव्या षटकात डाईव्ह करत शानदार झेल पकडला आणि ख्रिस गेलचा 10 धावांवर डाव संपविला ती चाहरची दुसरा विकेटे ठरली.

निकोलस पूरन दुसर्‍यांदा बाद झाला. त्याने चाहरच्या शॉर्ट चेंडूवर शार्दुल ठाकूरच्या हातून झेलबाद झाला. दीपक हूडा (10) सातव्या षटकात फाफ डुप्लेसिसला सहज झेल देऊन बाद झाला आणि तो चाहरचा चौथा विकेट होता. आता संघाची धावसंख्या पाच गडी राखून 26 अशी झाली. शाहरुख खान आणि झाय रिचर्डसन (15) यांनी सहाव्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मुरुगन अश्विन (06) याने शाहरुख खानसह 30 धावांची भागीदारी करुन पंजाबला या धावसंख्येपर्यंत पोचण्यास मदत केली. पंजाबकडून शाहरुख खानने 47 धावा केल्या आणि शेवटच्या षटकात सॅम करनने त्याला बाद केले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here