आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

पाकशास्त्रातही तरबेज असलेल्या बाबासाहेबांना स्वयंपाक तयार करून मित्रांना खाऊ घालण्याने विलक्षण आनंद व्हायचा..


 

बाबासाहेबांना स्वादिष्ट स्वयंपाक तयार करण्याची कला अवगत होती. वाचून जरा आश्चर्य वाटेल. पण होय हे खरे आहे. त्यांनी ही कला लहानपणापासून जोपासली होती. माता भिमाईच्या निर्वाणानंतर त्यांच्या आत्याला आणि बहिणीला स्वयंपाकात ते मदत करत होते. स्वत:चा स्वयंपाक स्वत करणे यामध्ये त्यांना कोणताही कमीपणा वाटत नव्हता.

बाबासाहेब

बाबासाहेबांनी तयार केलेल्या जेवणाचा आस्वाद त्यांचे मित्र मनमुरादपणे घेत होते. स्वत: स्वयंपाक तयार करून दुसर्‍यांना जेवू घालण्यात बाबासाहेबांना विलक्षण आनंद होत होता. आग्रहाने जेवण घालणे हा बाबासाहेबांचा मनाचा एक धर्म होता. म्हणूनच ते कोणत्याही पंंक्तीत, हॉटेलमध्ये जेवण घेत असताना प्रेमळपणाने चौकशी करत असत. काय हवंय काय नको ते पाहून त्याप्रमाणे जेवायला आग्रहाने वाढत.

बाबासाहेब पाकशास्त्रात किती तरबेज होते हे पाहण्यासाठी एक किस्सा आपण पाहूयात. तो असा होता की, बाबासाहेब आणि त्यांचे मित्र श्रीकृष्ण तसेच माईसाहेब हे दिल्ली येथील अखोला येथे गेले होते. त्या प्रवासात भोजनाचे सर्व साहित्य म्हणजेच कोंबडीचे चिकन, तांदूळ, मसाला, तूप वगैरे सोबत घेतले होते. अखोला येथे गेल्यावर बाबासाहेबांनी स्वत: स्वयंपाक केला. त्यात नोकराची मदतही घेतली. कोंबडीचं कालवण, सुके मटण, बिर्याणी, वांगी अन् बटाट्याची भाजी असे पदार्थ बाबासाहेबांनी स्वत: तयार केले होते.

 

बाबासाहेब माईसाहेबांना म्हणाले…

स्वयंपाक तयार करत असताना बाबासाहेबांचे ते चित्र पाहण्यासारखे होते. स्वतः केलेल्या स्वयंपाकाची चव विचारण्यासाठी मित्राच्या हातावर कालवणाचे काही थेंब अोतत आणि कसे झाले आहे हे विजयी मुद्रेने ते विचारायचे. माईसाहेब  जवळच बसून हे सारे कुतूहलाने पाहत होत्या. बाबासाहेब त्यांना म्हणत पहा तुम्हा स्त्रियांनादेखील असा स्वयंपाक करता येतो की नाही याबद्दल शंका वाटते. त्यांच्या या आठवणीचा किस्सा बळवंत वराळे लिखित ‘डॉ आंबेडकरांचा सांगती’ या पुस्तकात अधोरेखित करण्यात आला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here