आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतातील या 5 चमत्कारी मंदिरांचे रहस्य कोणालाही सोडवता आलेले नाहीये..!


भारत धार्मिक आस्थांवर विश्वास ठेवणारा देश आहे.

येथे मंदिरांमध्ये सकाळ होताच भजन गायले जाते. कोणताही विशेष पर्वावर मंदिरांना सजवले जाते. तसेच या मंदिराच्या बाबतीत काही प्राचीन कथा सुद्धा आहेत. अशाच पाच मंदिराविषयी जाणुन तुम्ही हैराण व्हाल. या मंदिरा विषयी खूप रहस्य आहेत, जे अजून कुणालाही सुटली नाहीत.

१. ज्वालाजी मंदिर :

मंदिर

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यामध्ये असणारी दुर्गा मातेचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराविषयी म्हटले जाते की यामध्ये एक वाला सतत जळत राहते. ज्यामुळे या मंदिराला ज्वालाजी चे मंदिर असे म्हटले जाते. या ज्वाला विषयी म्हटले जाते अनादी काळापासून ही जळत आली आहे आणि जळत राहील. या ज्वाला मधून निळ्या लहरी निघतात जे एक रहस्य आहे.

new google

२. लेपाक्षी मंदिर

आंध्र प्रदेशामध्ये स्थित लेपाक्षी मंदिर एक वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये एक लटकता खांब आहे जो जमिनीवर टेकलेला नाही. तसेच इथे एक असा दगड आहे ज्यावर पायाचे चिन्ह आहेत. लोकांच्या म्हणण्यानुसार हे माता स्थितीचे पदचिन्ह आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी ते ओले असतात. त्यांना कितीही कोरडा करण्याचा प्रयत्न केला तरी ते ओलेच असतात. हे एक रहस्यच आहे की यामध्ये कुठून पाणी येते अजून कळले नाही.

३. अचलेश्वर महादेव मंदिर

राजस्थान मधील धौलपूर मध्ये स्थित अचलेश्वर महादेव मंदिराची वेगळीच कृपा आहे ‌. अचलेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग दिवसातून तीन वेळेस आपला रंग बदलते. सकाळी लाल , दुपारी केसरिया तर सायंकाळी सावळा रंग असतो शिवलिंगाचा . या मंदिराचे विशेषता अजून एक आहे की आतापर्यंत शिवलिंगाचा शेवटच्या टोकापर्यंत कोणी पोहोचू शकले नाही.

मंदिर

४. शिवगंगे मंदिर

 

कर्नाटक पासून जवळपास 55 किलोमीटर दूर भगवान शिवाचे शिवगंगे मंदिर एका छोट्याशा पहाडावर आहे. या मंदिराविषयी म्हटले जाते की येथील पूर्ण पहाड शिवलिंगा सारखा दिसतो. येथील मंदिरा विषयी म्हटले जाते की शिवलिंगावर जर लोणी चढवले तर ते लोणी या प्रमाणे बदलते. आजही हे मंदिर एक रहस्य बनले आहेत.

५. विरुपाक्ष मंदिर

कर्नाटक मधील हम्पी मध्ये स्थित विरुपाक्ष मंदिर एक रहस्य आहे. असं म्हणतात या मंदिराला काही स्तंभ आहेत ज्यामधून संगीत निघते. या स्तंभांना म्युझिकल पिलर्स म्हणून ओळखल्या जाते. एकदा इंग्रजांनी हे रहस्य जाणून घेण्यासाठी स्तंभाला कापले परंतु हैराणीची गोष्ट म्हणजे या स्तंभामध्ये काहीही निघाली नाही मध्ये फक्त रिकामी पोकळी होती

हे रहस्य गेल्या कित्येक वर्षापासून न सुटलेलं कोड बनले आहेत. ज्यांना सोडवणे आजूनही कोणाला शक्य झाले नाहीये.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here