आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जर हे श्राप नसते तर काही वेगळीच असली असती महाभारताची कहानी.


 

महाभारताची कहाणी तशी तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण काय आपल्याला माहित आहे की महाभारतातील प्रत्येक पात्र कोणत्या ना कोणत्या श्रापाने वेढलेले होते. जर हे श्राप नसले असते तर महाभारताची कहानी काही वेगळीच असती. बघितलं तर कळेल की हिंदू धर्म ग्रंथांमध्ये खूप साऱ्या श्रापांचे वर्णन आढळते. आणि प्रत्येक श्रापांमागे मागे काही न काही कहाणी आहे. चला तर बघूया महाभारतातील काही प्रसिद्ध श्रापांची कहाणी.

दानवीर कर्ण की मौत का कारण बने थे यह दो श्राप … | D5 Channel Hindi

new google

१. राजा पांडूला ऋषी किंदमचा श्राप .

महाभारताच्या अनुसार एकदा राजा पांडू शिकार करायला वनामध्ये गेले. इथे त्यांनी हरणाच्या जोडप्याला मैथुन करताना बघितले आणि त्याच्यावर बाण सोडला यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वास्तवात ते हरण आणि हरिनी ऋषी किंदम आणि त्यांची पत्नी होते. तेव्हा ऋषी किंदम यांनी राजा पांडूला श्राप दिला की तो जर एखाद्या स्त्री बरोबर संभोग करेल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. याच शापामुळे राजा पांडू यांचा त्यांची पत्नीमाद्री सोबत संभोग करते वेळेस मृत्यू झाला.

२. यमराजला मांण्डव ऋषीचा शाप

महाभारतानुसार मांण्डव ऋषी होते. राजाने चुकून त्यांना सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. सुळावर चढवून सुद्धा खूप दिवस त्यांचे प्राण नाही गेले यामुळे राजाने आपली चूक कबूल करून त्यांची माफी मागून त्यांना सोडून दिले.तेव्हा ऋषी यमराज पाशी गेले आणि त्याला विचारले मी माझ्या जीवनात असं कोणता अपराध केला होता ज्यामुळे मला अशी शिक्षा मिळाली.

तेव्हा यमराज यांनी सांगितले की तुम्ही बारा वर्षाचे असताना तुम्ही एका प्राण्याच्या शेपटी मध्ये काटा टोचला होता त्याचीच ही शिक्षा होती. त्यावर ऋषींनी यमराजाला म्हणाले बारा वर्षांमध्ये धर्म आणि अधर्म यामधला फरक कळत नाही तरीही तुम्ही मला शिक्षा दिली. त्यामुळे ऋषीने यमराजाला शाप दिला तुमचा जन्म शूद्र योनीमध्ये दासीपुत्र म्हणून होईल.

महाभारतामधील विदुर हेच दासीपुत्र आहेत.

३.कद्रुचा आपल्या पुत्रांना श्राप

महाभारत

महाभारताच्या अनुसार ऋषी कष्याप यांच्या दोन पत्नी होत्या कद्रु व विनता. कद्रु सापांची माता होती आणि विनता गरुडांची . एकदा कद्रु आणि विनता यांनी पांढऱ्या रंगाचा घोडा पाहून एक शर्त लावली. विनता म्हणाली घोडा पूर्णपणे पांढरा आहे आणि कद्रु म्हणाली घोड्याची शेपूट थोडीशी काळी आहे. कद्रू ने आपली गोष्ट खरी ठरवण्यासाठी आपल्या सर्प मुलांना सांगितले तुम्ही सूक्ष्म रूप धारण करून घोड्याच्या शेपटीला चिपका काही सापांनी ही गोष्ट ऐकली नाही त्यामुळे कद्रुने आपल्या पुत्रांना श्राप दिला की ते जन्मजय यांच्या सर्पयज्ञ मध्ये भस्म होतील.

४. उर्वशीचा अर्जुनाला शाप.

अर्जुन जेंव्हा युद्धाच्या तयारीसाठी दिव्यास्त्र मिळवण्यासाठी स्वर्गात गेला तेव्हा उर्वशी नावाची अप्सरा त्याच्या प्रेमामध्ये पडली. परंतु अर्जुन उर्वशीला म्हणाला तू माझ्या मातेसमान आहेस हे ऐकून उर्वशी रागाने म्हणाली तू  पण नपुंसक माणसासारखे बोलत आहेस. मी तुला श्राप देते शाप देते तू नपुंसक होशील आणि स्त्रियांमध्ये नर्तकीचे काम करशील. ही गोष्ट जेव्हा अर्जुनाने इंद्राला सांगितली तेव्हा इंद्रदेव म्हणाले हा शाप अज्ञात वासा मध्ये तुझी मदत करेल आणि तुला कोणी ओळखू शकणार नाही

५ . परशुरामाचा कर्णाला शाप

महाभारताचा अनुसार सूर्यपुत्र कर्ण परशुराम यांचे शिष्य होते. कर्णाने आपला परिचय परशुरामांना एक सूतपुत्र आहे असा दिला होता. जेव्हा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते तेव्हा कर्णाला एका जंगली किड्याने चावा घेतला. आपल्या गुरूची झोप मोडू नये म्हणून कारणाने ते सहन केले. झोप मोडल्यानंतर परशुरामांनी हे बघितले आणि त्यांना कळले की कर्ण सूतपुत्र नसून एक क्षत्रिय आहे. तेव्हा क्रोधित होऊन परशुरामाने कर्णाला शाप दिला कि मी दिलेल्या विद्येचा तुला जेव्हा सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हा विसर पडेल.

ह्या काही आणि अश्या अनेक शापामुळे महाभारताचे युद्ध पांडव जिंकले अन्यथा कर्ण एकटाच हे युद्ध कौरवांना जिंकून देऊ शकला असता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here