आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कॉलेजमधील लेक्चर बुडवून खेळायचा क्रिकेट; आज विराट कोहलीदेखील झालाय ‘त्याचा’ फॅन


शाहबाज अहमद आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा स्टार खेळ‍ाडू म्हणून उदयास आला आहे. शाहबाजने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने कर्णधार विराट कोहलीशिवाय टीम मॅनेजमेंटचा विश्वास जिंकला आहे. बुधवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी बजावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शाहबाजच्या दमदार फिरकी गोलंदाजीच्या जीवावर आरसीबीने कमी धावांच्या सामन्यात हैदराबाद संघाला चारीमुंड्या चीत करत आयपीएलमधील सलग दुसरा विजय नोंदविला. शाहबाज अहमदच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यार टाकलेला हा प्रकाशझोत.

क्रिकेट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार्‍या शाहबाज अहमदने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धारदार गोलंदाजी केली, त्यामुळे विरोधी संघाने सामना गमावला. शाहबाज अहमदने 2 षटकांत 7 धावा देऊन 3 बळी घेतले. हैदराबादच्या डावाच्या 17 व्या षटकात शाहबाजने तिन्ही विकेट घेतल्या आणि येथून सामना बंगळुरुकडे वळला. तत्पूर्वी त्याने 10 चेंडूंत 14 धावा केल्या.

सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने शाहबाज अहमदचे खूप कौतुक केले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर आरसीबीने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत पहिले स्थान मिळविले. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतर शाहबाज अहमदचा परिवार देखील आपल्या मुलाची कामगिरी पाहून खूपच आनंदित झाले आहेत.

शाहबाज अहमदचे वडील हरियाणामधील मेवात जिल्ह्यातील सिकरावा या छोट्याशा गावातले आहेत. आपल्या मुलाला त्यांना इंजिनिअर करायचे होते, पण क्रिकेटपटू बनण्याच्या इच्छेने त्याला आयपीएलसारख्या मोठ्या टप्प्याकडे खेचले.

मुलांच्या शिक्षणासाठी वडिलांनी सोडले गाव

शाहबाज अहमदचे वडील नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून हथीन येथे राहात होते. त्यांना वाटायचे की, आपला मुलगा शाहबाज हा इंजिनिअर व्हावा, पण मुलाला क्रिकेटचा शौक होता. त्याने क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. शाहबाजचे आजोबा क्रिकेट खेळायचे. त्यांच्यापासूनच शाहबाजला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली.

बहीण आहे डॉक्टर

त्यांचे गाव मेवात जिल्ह्यात शिक्षणासाठी प्रसिध्द होता. या गावातील बहुतांश लोक इंजिनीअर आणि डॉक्टरर्स आहेत.
शाहबाजची छोटी बहीण फरहीन ही डॉक्टर आहे. फरिदाबाद येथील सरकारी दवाखाना बादशहा खान येथे ट्रेनिंग घेत आहे. बारावीनंतर शाहबाजने देखील फरिदाबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला होता. क्रिकेटची आवड जपत त्याने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

कॉलेजचे लेक्चर बुडवून खेळायचा क्रिकेट

क्रिकेट

शाहबाज अहमदचे वडील म्हणतात की, महाविद्यालयीन काळात त्यांचा मुलगा क्रिकेट खेळण्याच्या नादात क्लासला दांडी मारायचा. म्हणून त्यांनी शाहबाजला क्रिकेटमध्ये करिअर करण्याची संधी दिली आणि त्यानंतर त्याने गुडगावच्या टिहरी येथील क्रिकेट अकादमीमध्ये जाण्यास सुरवात केली. प्रशिक्षक मन्सूर अली यांनी तेथे त्याला प्रशिक्षण दिले. तथापि, शाहबाजनेही अभ्यास चालू ठेवला आणि अभियांत्रिकी पूर्ण केली. तथापि, क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने आतापर्यंत पदवी घेण्यासाठी विद्यापीठात जाणे शक्य झाले नाही.

मित्रांमुळे झाला क्रिकेटपटू

शाहबाज अहमद आज ज्या ठिकाणी पोहोचला अाहे, त्यात त्याच्या मित्राने खूप मोठी भूमिका बजावली आहे. त्याचा मित्र प्रमोद चंडिला त्याच्याबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी बंगालला घेऊन गेला. चंदीला बंगालमध्ये क्लब क्रिकेटही खेळत असे. घरगुती क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे शाहबाज अहमदची 2018-19 मध्ये बंगाल रणजी संघात निवड झाली. त्यानंतर त्याची 2019-20 मध्ये भारत ‘अ’ संघात निवड झाली. पुढे 2020च्या आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शाहबाजला 20 लाखात विकत घेतले.

अष्टपैलू खेळाडू

शाहबाज अहमदच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल सांगायचे तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपला जलवा दाखवून दिला आहे, जिथे त्याने 13 सामन्यांत 32.88 च्या सरासरीने 559 धावा केल्या आहेत. त्याचवेळी गोलंदाजीत त्याने 2.60 च्या सरासरीने 37 बळी घेतले आहेत. शाहबाजने लिस्ट ए क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे जिथे त्याने 21 सामन्यांत 39.5 च्या सरासरीने 435 धावा केल्या आहेत. गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर त्याने 4.46 च्या इकॉनॉमी रेटने 18 विकेट घेतल्या आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here