आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

टीम इंडियाचा ‘लंबू’ इशांत शर्माला झालंय तरी काय? प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केला खुलासा


 

भारतीय कसोटी संघातला अनुभवी आणि प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसून येत नाही. लाल चेंडूंने धारदार गोलंदाजी करणारा टीम इंडियाचा हा लंबू यंदा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग याने इशांत शर्मा बाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाने दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांत त्याच‍ा अंतिम ११ जणांमध्ये समावेश नव्हता. दिल्ली कॅपिटल्सला त्याची कमतरता भासत नसली तरी फॅन्स मात्र त्याची गोलंदाजी पाहण्यासाठी मिस करत आहेत. इशांत जखमी असल्याचे पॉन्टिंगने उघड केले.

इशांत शर्मा

तो म्हणाला, “इशांत च्या टाचेला दुखापत झाली आहे. यामुळे, त्याला चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध टीमच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळता आले नाही. यामुळे युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. विशेष बाब अशी आहे की, आवेश खान सध्या धारधार गोलंदाजी करत असून इशांत शर्माची कमतरता तो भासू देत नाहीत.”

गुरूवारी राजस्थान रॉयल्स विरूध्द झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव झाला या सामन्यानंतर प्रशिक्षक रिकी पॉन्टींगने ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, “पहिल्या सामन्याबद्दल सांगायचे तर, इशांत शर्माला टाचेला दुखापत झाली आहे आणि आम्ही त्यावर काम करत आहोत.” आयपीएलच्या लिलावापूर्वी इशांतला दिल्ली संघाने कायम ठेवले होते.”

दुसरीकडे, दोन सामन्यात पाच विकेट घेऊन अवेश खान रिकी पाँटिंग आवडता झाला आहे. पंटर म्हणतो,” त्याने संधीचा पुरेपूर फायदा घेतला. गेल्या काही वर्षांपासून तो संघाचा भाग आहे, पण त्याला संधीवमिळत नव्हती. आपल्याकडे त्याच्यासारखा भारतीय वेगवान गोलंदाज आणि त्यानंतर ख्रिस वोक्स, एनिच नॉर्टजे, कंगिसो रबाडा आणि टॉम करन सारखे गोलंदाज असल्यास आपले वेगवान गोलंदाजी अाक्रमण खूप मजबूत आहे.”

गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्ससाठी तो एकमेव सामना खेळला. दरम्यान इशांतला त्याच्या पोटातील स्नायूला दुखापत झाली, त्यानंतर तो युएई मधील आयपीएलमधून बाहेर पडला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here