आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कमाल: रोमांचक सामन्यात हैदराबाद 13 धावांनी पराभूत


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 9 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा मुंबई इंडियन्सकडून 13 धावांनी पराभव झाला. 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा डाव 19.4 षटकांत 137 धावांत गडगडला. मुंबईकडून राहुल चहर आणि ट्रेंट बाऊल्ट यांनी तीन गडी बाद केले. हैदराबादकडून बेअरस्टोने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय असून यासह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत तर सनरायजर्स हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव आहे.

मुंबई इंडियन्स

तत्पूर्वी, रोहित शर्माची धमाकेदार सुरुवात आणि शेवटच्या षटकात कायरन पोलार्डच्या आक्रमक खेळीच्या जोरावर
मुंबई इंडियन्सने शनिवारी इंडियन प्रीमियर लीग सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 150 धावा केल्या. रोहितने क्विंटन डिकॉकबरोबर पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी करुन संघाला आक्रमक सुरुवात केली, पण बाद झाल्यानंतर मुंबईचे फलंदाज आक्रमक खेळू शकले नाहीत.

पोलार्डने भुवनेश्वर कुमारच्या डावाच्या शेवटच्या दोन चेंडूंमध्ये षटकार ठोकला आणि 150 धावांची धावसंख्या उभारली. त्याने 22 चेंडूत डावात तीन षटकार आणि एका चौकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या.

सलग दोन सामने गमावलेल्या सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात चार बदल केले. विराट सिंग, अभिषेक शर्मा, खलील अहमद आणि मुजीब उर रहमान या तरुण खेळाडूंवर विश्वास दाखवत संधी दिली. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर रोहित आणि क्विंटन डिकॉक यांनी मुंबईला वेगवान सुरुवात करुन दिली.

 

भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत डिकॉकने त्याचा इरादा स्पष्ट केला. तिसर्‍या षटकात रोहितने मुजीब उर रेहमानच्या सलग दोन चेंडूत चौकार आणि षटकार ठोकले. पुढच्या षटकात त्याने भुवनेश्वरला एक षटकारही लगावला. पॉवरप्लेमध्ये 53 धावा काढून मुंबईने शानदार सुरुवात केली.

मुंबई इंडियन्स

सातव्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या विजय शंकरने रोहितच्या विकेटने सनरायझर्स हैदराबादला पहिले यश दिले. रोहितने 25 चेंडूत 32 धावांच्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. शंकरच्या पुढच्या षटकात सूर्यकुमार यादवने षटकार ठोकला, पण पुढच्याच चेंडूवर त्याला बाद केले. यानंतर सनरायझर्सच्या गोलंदाजांनी डिकॉक आणि ईशान किशनला आक्रमकपणे खेळू दिले नाही. दरम्यान, शंकरच्या तिसर्‍या षटकात, रशिद खानने डिकॉकचा कठीण झेल टिपला.

धावा वेगवान करण्याचा प्रयत्न करीत असताना डिकॉक मात्र 14 षटकांत मुजीब रहमानच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने पाच चौकारांच्या मदतीने 39 चेंडूत 40 धावा केल्या. 9 ते 16 व्या षटकापर्यंत मुंबईचा संघ फक्त एकच चौकार मारु शकला. पोलार्डने 17 व्या षटकात मुजीबच्या पहिल्या चेंडूवर 105 मीटर लांबीचे षटकार ठोकला. सध्याच्या मोसमातील हा सर्वात लांब षटकार होता.

26 चेंडूंनंतर मुंबईचा हा पहिला चौकार होता. त्याच षटकात मात्र ईशान किशनला यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टोकडून झेलबाद झाला. 21 चेंडूंच्या डावात तो केवळ 12 धावा करू शकला. विजय शंकरने पोलार्डचा 19 व्या षटकांत खलीलच्या चेंडूवर सहज झेल सोडला. पण हार्दिकने (07) पुढच्याच चेंडूवर विराटला झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. पोलार्डने अखेरच्या दोन चेंडूंमध्ये षटकार ठोकत करत संघाची धावसंख्या 150 धावांवर नेली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here