आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘हिटमॅन’ रोहित शर्माचे दोन नवे विक्रम: महेंद्रसिंग धोनीला टाकले पाठीमागे


 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 9 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा मुंबई इंडियन्सकडून 13 धावांनी पराभव झाला. 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा डाव 19.4 षटकांत 137 धावांत गडगडला. दरम्यान, सर्वोत्कृष्ट लयीत असलेला कर्णधार रोहित शर्माने दोन मोठी विक्रम नोंदविली आहेत.

आयपीएलच्या इतिहासात भारतीय फलंदाजामधील सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत रोहितने महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. यासह त्याने टी -20 मध्ये कर्णधार म्हणून 4 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. काल रोहितने 25 चेंडूत 32 धावांच्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. सातव्या षटकात विजय शंकरने त्याला बाद केले

रोहित शर्मा

आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत 206 सामन्यांत 216 षटकार ठोकले असून, रोहितने 217 षटकार ठोकत धोनीला पाठीमागे टाकले. यासह रोहितने या सामन्यात 28 धावा करत टी -20 मध्ये कर्णधार म्हणून आपल्या 4 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वात संघाने सलग दोन मोसमात ट्रॉफी जिंकली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here