आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सामन्यानंतर शाहरुख खानने महेंद्रसिंग धोनीकडून घेतला गुरुमंत्र


महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला असला तरी त्याचा अाजही रुतबा कायम आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अनेकदा युवा खेळाडूंना क्रिकेटमधील बारकावे सांगत असतो. आयपीएलच्या काळात, महेंद्रसिंग धोनीकडून क्रिकेटच्या युक्त्या शिकण्यासाठी युवा खेळाडूंनी त्याला वेढले असल्याचे बर्‍याचदा पाहिले गेले आहे.

शाहरुख खान

आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना झाल्यानंतरही असेच काहीसे दिसून आले. सामन्यानंतर पंजाबचा युवा फलंदाज शाहरुख खानने महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. या युवा खेळाडूने धोनीकडून टिप्स घेतल्या. दोघांत रात्री उशीरापर्यंत संवाद सुरू होता. दोघांचा संवाद सुरू असतानाचे फोटो त्यानंतर प्रचंड व्हायरल झाले.

शाहरुख खानने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 36 चेंडूत 47 धावा काढून साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. आयपीएलपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे ने देखील या खेळाडूंचे कौतुक करत त्याच्यामध्ये कायरन पोलार्डची झलक दिसत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर प्रत्येकाला हेच पाहायचे होते की भारताला नवीन फिनिशर मिळाला आहे की नाही?

शुक्रवारी रात्री आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाब किंग्जची स्थिती नाजूक होती. केएल राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल सारखे दिग्गज फलंदाज स्वस्तात पॅवेलियनमध्ये माघारी परतले होते. आठ षटकामध्ये 27 धावात पाच विकेट गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या शाहरुखने संघाला 100 धावापर्यंत नेले. मात्र, या सामन्यात त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

शाहरुख खान

36 चेंडूत 47 धावा ठोकणारा शाहरुख 20 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.  सामन्यानंतर त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘माझी भूमिका लोअर ऑर्डरमध्ये फिनिशर्सची आहे, परंतु प्रत्येक सामन्यात आपण क्रीजवर येताच जलद धावांची अपेक्षा करू शकत नाही. कारण अशीपण परिस्थिती येते तेव्हा आपल्याला जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता असते.’

25 वर्षीय फलंदाज म्हणाला, ‘मला फिनिशर मानले जाते.  मी एक चांगला फलंदाज आहे.  मी तमिळनाडूसाठी दोन वर्षांपासून अव्वल क्रमावर फलंदाजी करत आहे. माझ्याकडे कोणत्याही क्रमाकावर फलंदाजी करण्याची आणि संघास कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता आहे. अव्वल खेळाडूंच्या उपस्थितीत खेळण्यापासून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळतात.  यामुळे फलंदाजी निश्चितच सुधारेल. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.’

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:’हिटमॅन’ रोहित शर्माचे दोन नवे विक्रम: महेंद्रसिंग धोनीला टाकले पाठीमागे

जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here