आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना काही विशिष्ट विषयांची आवड होती असे नव्हे. जे चांगले दिसेल आणि जे-जे शिकण्यासारखे असेल ते सर्व काही शिकण्याचा ते प्रयत्न करत असत. एखादा नवीन विषय शिकण्याचे त्यांनी मनावर घेतले तर ते परिपूर्ण  आपले सर्व विचार अन् लक्ष्य त्यादृष्टीनेच केंद्रित करत असत.

बाबासाहेब

१९३७-३८ च्या सुमारास बाबासाहेबांना गायन कला आणि वादन कला शिकण्याची इच्छा झाली. बाबासाहेबांना संगीत विषयात ही खूप गोडी होती. त्यांना संगीतातील काही वाद्ये चांगल्या प्रकारे वाजवता येत होती.

बाबासाहेबांना संगीताची खूप आवड होती. पण बालपण अभ्यासात आणि तरुणपण आंदोलन, लढे, राजकारणात गेल्याने त्यांना आपले छंद दाबून ठेवावे लागले. पण आपल्या उतार वयातही असलेल्या वादळी आयुष्यात ते आपल्या आवडीचे संगीत ऐकायला वेळ काढत असत. ते गाणी ही अगदी तालासुरात म्हणायचे. मोटारीत बसले की गुणगुणायचे. प्र

त्येक व्यक्तीने संगीतामधील मधुरता आणि कलेतील सौंदर्य यावर प्रेम करावे, असे त्यांचे मत होते.

बाबासाहेबांनी दादर भागातून वैद्य नावाच्या गृहस्थाला बोलावून त्यांना गायन आणि वादन कला राजगृह येथे येऊन शिकवण्यास सांगितले. त्याच दिवशी वैद्य यांच्याकडे पैसे देऊन फिडल आणायला सांगितले. ते दररोज सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदर ८ ते ९ या वेळेत फिडल वाजवण्याचे धडे घेत होते.

सकाळी फिडल वाजवत बसले म्हणजे त्यांना कशाचेही भान राहत नसे. ते इतके तल्लीन होत की, त्यांच्याकडे कुणीही आल्या गेल्याचे भान त्यांना राहत नव्हते. राजगृहात वैद्य शिकवण्यास येण्यापूर्वी बाबासाहेब लुंगी, पांढरा शुभ्र शर्ट परिधान करून आपल्या खाेलीत बसायचे.

वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी व्हायोलीन शिकण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ विद्यालयातील ग्रंथालय अधिकारी रेगे यांनी बळवंत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलीन शिकवण्यासाठी पाठवले. त्यांनी मुंबईत दोन वर्ष नाना आणि बाळ साठे या बंधूंकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. तेव्हा ते पहिल्या भारतीय मंत्रिमंडळात होते.

बाबासाहेब

आपल्या फावल्या वेळेत ते वाद्य वाजवायचे. उतरत्या वयात या महामानवाला व्हायोलिन तंतुवाद्य का शिकावं वाटले? याविषयी मानसिकता अभ्यासली तर असे कळते की, तंतुवाद्यातून निघालेले सूर मनुष्याचे ताणतणाव कमी करायला मदत करतात.

२ वर्षात केली कला आत्मसात.

 

साठे यांनी बाबासाहेबांना सांगितले की, व्हायोलीन हे तंतू वाद्य प्रकारातला सर्वात कठीण प्रकार आहे. बाबासाहेबांनी लागलीच व्हायोलीन बद्दलची सर्व साहित्य मागवली आणि रीतसर अभ्यास सुरु केला, “व्हायोलीन : हाऊ टू मास्टर इट” हे पुस्तक स्वतः साठे यांनी बाबासाहेबांना दिले होते. संगीताबद्दलचे त्यांचे प्रेम आणि शिकण्याची प्रबळ इच्छा मी पहिल्यांदा कुणामध्ये पाहत होतो असे साठे सांगत असे. पण त्यांचे शरीर त्यांच्या मेहनतीला साथ देत नव्हते.

व्हायोलीन खूप वेळ ते धरू शकत नव्हते. त्यांचा हात दुखून येई मग ते थोडी विश्रांती घेत आणि पुन्हा सराव करत. थोड्याच कालावधीत बाबासाहेब फार उत्तम व्हायोलीन वाजवू लागले, असे साठे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here