आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या महिला प्रधानाने गिरीडोह गावामध्ये आणली विकासाची गंगा, पीएम मोदी करतील सन्मानित


 

 असं म्हणतात देशासाठी काही चांगलं करण्याचं ठरवलं तर कोणतीही समस्या तुमचा रस्ता रोखू शकत नाही. असंच काही करून दाखवले गिरीडोह मधील पंचायतची प्रमुख इंदु देवीने.

इंदू देवीने गावचा प्रधान होण्याअगोदर  गावाच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते ते आज साकार होताना दिसत आहे. ज्यावेळी ती पंचायत ची प्रमुख बनली होती त्यावेळी गावामध्ये खूप सार्‍या समस्या होत्या. हळूहळू तिच्या समस्या सोडवत गेली आणि मास्टर प्लान बनवून लोकांना सुखी बनत गेली.

इंदू देवी स्वच्छ भारत मिशन, पेजल योजना यांसारख्या सरकार योजना गावांमध्ये राबून गावाचा विकास करत राहिली. गावातल्या प्रत्येक कोपऱ्यात इंदू देवीचे विकास कार्य दिसून येतात. या पंचायत मधील जवळपास 800 परिवारांना सरकारी शौचालयाची सुविधा आहे. आणि जवळपास एक हजार परिवारांना उज्वला योजनेचा फायदा मिळाला आहे. याचबरोबर विधवांना आणि म्हाताऱ्या लोकांना पेन्शन मिळाली आहे तसेच सगळ्यांना राशन कार्डची सुविधा सुद्धा मिळाली आहे. हे सगळ इंदू देवीच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं.

गावामध्ये हैंडपंप, सौर पंप, नळयोजना, मनरेगा, पक्की सडक सार्वजनिक शौचालय यांसारख्या योजना राबवण्यात आल्या  आहेत. या सर्व कार्यांसाठी नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारसाठी भारत सरकारने त्यांच्या पंचायतची निवड केली आहे. यासाठी 21 मार्च 2021 भारत सरकारच्या पंचायत विभागाने पत्र काढले आहे.

हा राष्ट्रीय पुरस्कार पंचायत राज दिवसाच्या मुहूर्तावर भारत सरकार द्वारा सम्मान समारोह यामध्ये 24 एप्रिल 2021 ला प्रदान केला जाईल. या दिवशी स्वतः पंतप्रधान मोदी या महिला प्रधानाला हा पुरस्कार देतील. पूर्ण राज्यामध्ये फक्त याच पंचायत ची निवड झाली आहे.

या अगोदर सुद्धा इंदूच्या पंचायतला हा पुरस्कार २ वेळा मिळाला होता..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here