आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

‘गब्बर’चा धमाका तर केएल राहुलच्या पदरी निराशा; दिल्ली कॅपिटल्सचा पंजाबवर दणदणीत विजय


 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 11 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 6 गडी राखून पराभव केला. दिल्लीचा हा या मोसमातील सलग दुसरा विजय आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब ने 4 गडी गमावून 195 धावा केल्या. संघासाठी मयंक अग्रवालने 69 धावांची शानदार खेळी साकारली आणि कर्णधार केएल राहुलने 61 धावा केल्या. शाहरुख खान (नाबाद 15) आणि दीपक हूडा (22) यांनीही शेवटच्या षटकात फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

दिल्लीने 18.3 षटकांत 196 धावांचे लक्ष्य ठेवले. सलामीवीर शिखर धवनने 92 धावांची शानदार खेळी केली तर मार्कस स्टॉयनिसने अवघ्या 13 चेंडूत 27 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

दिल्ली कॅपिटल्स

196 धावांचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला पृथ्वी शॉ आणि धवनने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 5.3 षटकांत 59 धावांची भर घातली. शॉ अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर 17 चेंडूत 32 धावांवर बाद झाला.

यानंतर दिल्लीकडून पहिला सामना खेळणारा स्टीव्ह स्मिथ (9) फलंदाजीत काही खास चमक दाखवू शकला नाही. कर्णधार रिषभ पंतदेखील लयीत दिसला नाही. त्याने 16 चेंडूत 15 धावा केल्या. मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव यांच्या जोडीने संघाला आणखी बळी पडू दिले नाहीत. स्टॉयनिसने लूकमन मेरीवाला याला सलग चौकार मारुन संघाला सामना जिंकून दिला.

शिखर धवनच्या स्फोटक डावाने दिल्लीच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तथापि, आयपीएल 2021 मध्ये धवन आपले पहिले शतक झळकावण्याची संधी हुकली. शिखर धवन 92 धावांवर बाद झाला. शिखर धवन 14.5 षटकांत झाय रिचर्डसनलकडून झेलबाद झाला. त्याने 49 चेंडूत दोन षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 92 धावा फटकावल्या.

दिल्ली कॅपिटल्स

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मयांक अगरवाल (69) आणि केएल राहुल (61) यांनी जोरदार सुरुवात केली आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारीसाठी 12.4 षटकांत 122 धावांची मोठी भागीदारी रचली. सलामीच्या या जोडीने मैदानाच्या चारही बाजूने फटके मारत दिल्लीच्या सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
आयपीएलमध्ये पदार्पण करणार्‍या लूकमन मेरीवालाने मयंकला बाद करून दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. मयंकचे यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक होते.

त्यानंतर ख्रिस गेल काही खास कामगिरी करू शकला नाहीत. तो 11 धावा करुन ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. या सामन्यात निकोलस पूरनचा फ्लॉप शॉ देखील कायम राहिला. त्याने 9 धावा केल्या. शेवटच्या षटकात दीपक हूडाने 13 चेंडूंत 22 आणि शाहरुख खानने 5 चेंडूंत 15 धावा करून संघाची धावसंख्या 195 पर्यंत पोहचवली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here