आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

ऐतिहासिक स्थळांना भेटी देत या ‘इतिहासप्रेमीने’ 52 शिलालेखाचे संशोधन केलंय…!


 

सोलापूर जिल्ह्यास समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. येथील ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना भुरळ घालतात. कारण या स्थळांना भेट दिल्यामुळे त्यांना कधी काळी घडून गेलेला इतिहास पुन्हा नव्याने अनुभवता येऊ शकतो. हा इतिहास जाणून घेण्यासाठी सोलापुरातला एक युवक गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हय़ातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतो. नितीन अणवेकर असं या इतिहासप्रेमींचे नाव आहे.

 शिलालेख

व्यवसायाने सराफ असलेल्या नितीनने आतापर्यंत जिल्ह्यांतील 290 गावाचा संशोधनात्मक सर्व्हे करून 52 शिलालेखाचे नवीन संशोधन केले आहे. यात मोहळ तालुक्यातील सौदाणे या गावात शिलालेख असलेला वीरगळ याच संशोधनातून उजेडात आला. असे इतिहासातील महत्वपूर्ण 1हजार हून जास्त विखरलेल्या मूर्ती व वीरगळांचे नोंद संग्रह केल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक खुणा अनेक वर्षांपूर्वीच्या आठवणींचा नकळत मागोवा घेऊ लागतात.

सोलापूरातील जेष्ठ संशोधन आनंद कुंभार यांच्यामुळे नितीनला शिलालेख संशोधनाची आवड निर्माण झाली. आपण ही सोलापूरच्या संशोधनासाठी काहीतर करावे असे त्याला सतत वाटत होते. कुंभार यांनी नितीनची आवड पाहून संशोधन कसे करावे हे प्रत्यक्ष फिल्डवर्क करून दाखवले. व्यवसायांमधील साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ते कुंभार यांच्याबरोबर सर्वेक्षणासाठी जायचे. गावात शिलालेख सापडला की तो कुंभार यांना दाखवून त्याचे ठसे घेऊन वाचन झाल्यावर ते प्रसिद्ध करायचा.

नितीन आपल्या पूर्वजाकडून मिळालेल्या वारसाचे जतन संवर्धन व्हावे, या उद्देशाने प्रत्येक गावात जाऊन स्थानिकांना शिल्पाची माहिती व महत्व समजावून सांगतो. आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान अश्या विविध राज्यात जावून 50 हून जास्त किल्ले आणि 400 हून अधिक लेणीस भेट देऊन अभ्यास केला आहे.

नितीनने भुईकोट सोलापूरचा हे समग्र माहिती व चित्रमय असलेल्या पुस्तकाचे लेखन केले. तसेच नितीनला जुनी नाणी, नोटा, हस्तलिखित पत्रे संग्रह करण्याचा छंद आहे.

शिलालेख

सिध्दापूरच्या गावातील द्वारपालाची मूर्ती विद्यापीठात

नितीन यास क्षेत्रभेटी दरम्यान सिद्धापूर या गावात द्वारपालांची एक जुनी मूर्ती निदर्शनास आली. त्यानंतर त्याने या गावातील सरपंच संतोष सोनगे यांना या द्वारापालाची माहिती आणि महत्त्व समजून सांगितले. त्यानंतर सरपंच सोनगे यांनी या मूर्तीची झीज व हानी टाळण्यासाठी तसेच संशोधकांच्या अभ्यासासाठी ही मूर्ती अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संग्रहालयास आणून दिली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here