आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

एका चिमणीने रागाच्याभरात समुद्र आटवला.


 

मित्रांनो आज आम्ही भगवद्गीतेशी जोडलेल्या एका छोट्याशा चिमणीची रोचक कहानी घेऊन आलो आहोत. खूप वेळा अगोदरची गोष्ट आहे एक चिमणी समुद्राच्या किनारी आपला खड्ड्यामध्ये खोपा बनून राहत होती. त्या खोप्यामध्ये तिने दोन अंडी दिली होती.सकाळ झाल्यानंतर ती चिमणी त्या दोन्ही अंड्यांना खोप्यामध्ये ठेवूनच दाणापाणी मिळविण्‍यासाठी दूर जात असे.

जेव्हा ती सायंकाळी वापस आली तिथे अंडे दिसली नाही त्यामुळे ती घाबरून गेली तिथे आजूबाजूला कोणी दिसले नाही. तेव्हा ती समुद्राला विचारते मी माझे दोन अंडी ठेवले होते, तू पाहिले का? त्यावर समुद्र हसला आणि म्हणाला तुझ्या अंड्या विषयी मला काय माहिती. त्याच्या हसण्याच्या अंदाजावरून चिमणीला कळाले की आपल्या अंडे समुद्राने चोरले आहेत. चिमणी त्याला म्हणाली तुझ्याशिवाय कुणीच नाही माझ्या अंडे तू चोरले असणार ते मला वापस कर.

 चिमणी

चिमणीच्या या म्हणण्यावर समुद्राला हसू आले आणि तो अहंकारा मध्ये बोलला की मी तुझे अंडे मी नाही घेतली शोधू शकत असतील तर शोध.

हे ऐकून चिमणी रागात म्हणाली माझे अंडे मला वापस दे नाहीतर मी तुझं पूर्ण पाणी संपवून टाकील यावर समुद्र हसू लागला. चिमणी रागाचा नजरेने या समुद्राला सारखी बघत राहिली समुद्राच्या लाटा येत होत्या आणि जात होत्या. चिमणी म्हणाली समुद्र असा नाही मानणारा मी तुझं संपूर्ण पाणी संपवून टाकते.

असे म्हणून चिमणी आपल्या छोट्याशा चोचीमध्ये समुद्रातील पाणी घेऊन ते किनाऱ्यावर आणून टाकू लागली. असे करता करता तिला सकाळ पासून सायंकाळ झाली, इतर पक्षी जे दाना पाणी पाहण्यासाठी बाहेर गेले होते तेही वापस आले त्यांनी चिमणीला विचारले तू आज का आली नाहीस आमच्या सोबत. परंतु चिमणी काहीच बोलली नाही आणि रागाच्याभरात समुद्रातील पाणी चोचीमध्ये घेऊन किनाऱ्यावर टाकत राहिली.

सगळ्या पक्षांनी चिमणीला समजावून सांगितले की समुद्रातील पाणी संपवणे असंभव आहे परंतु चिमणी ऐकत नव्हती आणि म्हणाली मी पण केला आहे की मी हा समुद्रातील पाणी संपवून टाकणार. ज्यामुळे माझी अंडे मला परत मिळतील.
चिमणी आपल्या दृढ इच्छा सोबत आपले काम करत राहिली. जेव्हा ती थकून जायची तेव्हा थोडा वेळ किनाऱ्यावर आराम करायची आणि लगेच कामाला लागायची यामुळे तीन-चार दिवसांमध्ये चिमणीचे स्वास्थ्य बिघडले.

हे बघून सगळे पक्षी हैराण झाले सगळ्यांना तिची काळजी वाटू लागली. तेव्हा सगळे पक्षी मिळून पक्षीराज गरुड कडे गेले आणि त्यांना म्हणाले महाराज ही छोटीशी चिमणी समुद्रातील पाणी संपवून टाकण्याचा निश्चय करून बसली आहे जे असंभव आहे.

हे ऐकून गरुड देव समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि त्या छोट्याशा चिमणीला म्हणाले मी तुमची काही मदत करू का माझी चोच थोडी मोठी आहे. तेव्हा चिमणी रागाच्या भरात म्हणाली हे काम माझे आहे मला कोणाची मदत नको. जेव्हा गरुड देव समजून गेली चिमणी आपल्या पिलांच्या काळजीपोटी असं बोलत आहे. तेव्हा गरुड देव मदतीसाठी भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना म्हणाले प्रभू आता तुम्हीच काहीतरी मदत करू शकता. ही छोटीशी चिमणी समुद्राचे पाणी संपवून टाकण्याच्या कार्यास लागली आहे जेकी असंभव आहे.

चिमणी

भगवान विष्णूने पहिले ती छोटीशी चिमणी सातत्याने आपल्या कार्यास लागली आहे. त्यामुळे भगवान विष्णू ने चिमणीवर प्रसन्न होऊन समुद्र देवाला आज्ञा दिली तुम्ही मागे व्हा आणि चिमणी चे अंडे परत करा. यावर समुद्र देवाने भगवान विष्णूचे आज्ञा मानून माघार घेतली आणि चिमणीने दोन अंडे परत काढून घेतले. यामुळे चिमणी खुश झाली आणि म्हणाली पहा मी करून दाखवल.

मित्रांनो या गोष्टींमधून आपल्याला कळते की कोणतीही कार्य छोटी असो वा मोठी आपल्या सातत्याने आणि ईश्वराच्या मदतीने पूर्ण होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here