आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात धोनीचा धमाका: ठोकले अनोखे द्विशतक


 

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात एक विशेष विक्रम केला आहे. चेन्नईकडून खेळताना धोनीने 200 सामन्यांत संघाचे नेतृत्व करण्याचा नवा विक्रम केला आहे. एकाच संघाकडून खेळताना सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे,अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीने काही दिवसांपूर्वी सीएसकेसाठी 200 सामने पूर्ण केले आणि आता कर्णधार म्हणून त्याने विशेष ‘डबल शतक’ पूर्ण केले आहे.

आयपीएलमध्ये एका फ्रँचायझीसाठी सर्वाधिक सामन्यांत कर्णधार म्हणून नेतृत्व करण्यात विराट कोहलीचे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने 128 सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे नेतृत्व केलं आहे. या यादीमध्ये पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने 124 सामन्यात संघाचे नेतृत्व करुन तो यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. एकाच संघाकडून खेळताना सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या तीन स्थानावर भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

राजस्थान रॉयल्सधोनी

चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीने आतापर्यंत एकूण 201 सामने खेळले आहेत. या एका सामन्यात तो सुरेश रैनाच्या नेतृत्वातही खेळला आहे आणि तो चॅम्पियन्स लीग टी 20 स्पर्धेचा सामना होता. त्याच्याशिवाय विराट कोहली अलीकडेच आयपीएलच्या फ्रँचायझीसाठी 200 सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. कर्णधार म्हणून आयपीएलमध्येच नव्हे तर सर्व टी 20 स्वरूपातही सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघ, चेन्नई सुपर किंग्ज आणि राइझिंग पुणे सुपरगिजंट्सकडून 287 सामने खेळले आहेत. या यादीत वेस्ट इंडीजचा डॅरेन सॅमी दुसर्‍या क्रमांकावर आहे, ज्याने टी 20 क्रिकेटमध्ये 208 सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here