आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

ज्ञानाच्या बागेबरोबर बाबासाहेबांनी फुलविली खर्‍या फुलांची बाग


 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त पुस्तक प्रेमी नव्हते तर त्यांना फुलझाडांचा व बागेचा सुद्धा छंद होता. ते उत्कृष्ट बागबान होते. त्यांना फुलझाडांचा व बागेचा छंद लहानपणापासून होता. बागेची रचना ते स्वतः करत. निसर्गाच्या सहवासात ते खुप रंगून जात. सायंकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर ते आपल्या बंगल्यापुढील बागेत फिरत असत. माळ्याला हाक मारीत असत. अमक्या ठिकाणी अमके झाड लाव, अशा प्रकारच्या सूचना देत होते.

बाबासाहेब

साताऱ्याचे निवास मुंबईचे राजगृह, पृथ्वीराज मार्गावरील निवास नवी दिल्लीतील कनिका हाऊस, औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातील रमणीय बागेत बाबासाहेबांनी स्वत: फुलझाडे लावली होती. आपली बाग दिल्लीतील कुठल्याही मंत्र्याच्या बागेपेक्षा सरस असावी असे त्यांना वाटत होते. बागेसाठी वाटेल तो खर्च करण्याची त्यांची तयारी होती.

निरनिराळी वृक्षसंपदा पाहून त्यांना पुरातन काळातील आयुर्वेदिक औषधशास्त्राचे स्मरण होई. दिल्लीतील त्यांच्या बागेला उत्कृष्ट भाग म्हणून बक्षीस मिळाल्याचे ते अभिमानाने सांगत होते.

त्यावेळी दिल्लीतील बाबासाहेबांची बाग म्हणजे एक प्रेक्षणीय स्थळ असे इतरांना वाटत होते. बागेची मांडणी बाबासाहेब स्वत: आपल्या इच्छेप्रमाणे व मनासारखी करून घेत असत. बंगल्यापासून कम्पाऊंडपर्यंत सुमारे १०० यार्डचे अंतर होते.

या विस्तीर्ण आवारात बाबासाहेबांची बाग उभी होती. ही बाग पाहून रस्त्याने जाणार्‍या- येणार्‍यांना मोह होत होता. रस्त्याने जाणारी-येणारी माणसे बागेकडे टक लावून पाहात. काही जण काही वेळ थांबून जात. बंगल्याच्या दरवाजाच्या आत काही जण डोकावून जात. कोणालाही मोह वाटावा अशीच बाबासाहेबांची बाग विलोभनीय होती.

मिलिंद महाविद्यालयासमोर बागेची आखणी सुरु होती.

त्यावेळचा एक गमतीदार किस्सा आपण पाहूयात. बाबासाहेब स्वत: या बागेची रचना तयार करत होते. कोणती झाडे कुठे लावायची याचे मार्गदर्शन करत हाेते. बागेत त्यांना एक वर्तुळ काढायचा होता. यासाठी त्यांनी १० फूट लांबीचा कंपास मिस्त्री कुप्पूरस्वामी यांच्याकडून तयार करून घेतला होता. बाबासाहेबांनी त्यांच्या मित्राला वर्तुळ काढायला सांगितले हाेते  कंपासाच्या साह्याने वर्तुळ काढणे शक्य नव्हते, तरीसुद्धा बाबासाहेबांनी ते काढण्यास सांगितले होते. बाबासाहेबांनी एखादी गोष्ट सांगितली आणि कुणी नाही ऐकले की त्यांना राग यायचा. म्हणून बाबासाहेबांचा शब्द पाळला जायचा.

बाबासाहेब

बागेतील माळ्याने काढून दाखवला वर्तुळ.

बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तसा वर्तुळ कुणालाच काढता येईना. त्यावेळी बागेतील माळ्याने सांगितले की, बागेत वर्तुळ काढण्यासाठी कंपासाची गरज नाही. एक खिळा मध्यभागी ठेवून त्याला दोर बांधून तो गोल फिरवला की वर्तुळ तयार होते. तसेच त्याने लहान मोठ्या आकाराचे वर्तुळही काढून दाखवले.   कंपासने वर्तुळ काढता येणं शक्य नसल्याचे सांगितले. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की, दोरीने वर्तुळ काढतात याची मला कल्पनाच नव्हती. हे ऐकूण सारेजण हसू लागले. दहा फूट लांब  कंपासची आवश्यकता नसतानाही त्यांनी तो तयार करून घेतला होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here