आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांनाही लावला होता बाबासाहेबांनी लळा


 

डॉ बाबासाहेब आंबेडकर जेवढे तापट, कठोर करारी वाटत असत तेवढेच अंतकरणाने अतिशय प्रेमळ होते. प्राणी मित्रांशी एक अजोड नाते त्यांनी जोडले होते. कुटुंबातल्या माणसाप्रमाणे ते त्यांची काळजी घेत असत. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ते पाहात असत. त्यांना कुत्रे पाळण्याची फार आवड होती. एखाद्या वेगळ्या वंशाचा कुत्रा त्यांना हवा असल्यास ते देशाच्या कानाकोपर्‍यात चौकशी करत.

बाबासाहेब

टॉबी हा बाबासाहेबांचा एक आवडता कुत्रा होता. टॉबीवर ते मुलांप्रमाणे प्रेम करीत. ऑफिसला किंवा घरी आल्यावर जर टॉबी दिसला नाही तर बाबासाहेब बैचेन होत असत. कारण टॉबी हा त्यांचा एक अत्यंत विश्वासू असा शरीर संरक्षक व सहचारी होता. अहोरात्र टॉबी बाबासाहेबांच्या सहवासात असायचा. ऑफिसमधून बाबासाहेब घरी निघाले तर टॉबी वाटाड्या प्रमाणे त्यांच्यापुढे असायचा.

१९३० साली बाबासाहेबांना एक हरणाचे पाडस धारवाडहून  नेऊन दिले. बाबासाहेबांना ते फार आवडले. बाबासाहेबांच्या वडिलांच्या वेळेपासून त्यांच्या घरी एक पितळेचा पिंजरा होता त्यात ते पोपट ठेवले होते. लहान मुले आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या अंगाखांद्यावर जशी खेळतात त्याप्रमाणे टॉबी आणि हरणांचे पाडस वाटत असे. इतका लळा या दोन प्राण्यांला त्यांनी लावला होता. बाबासाहेब आणि हे दोन जीव यांच्यातील जिव्हाळा, त्यांचा लपंडाव पाहत असताना मन अगदी दर्यार्द्र व्हायचे. त्यांच्याकडे पाहून प्राचीन काळाचा आश्रम उभा राहायचा.

 

बाबासाहेबांचे “टॉबी” कुत्रा आणि हरणाच्या पाडसावर विशेष प्रेम होते. खूप लळा लागला होता त्यांना त्यांचा, दामोदर हॉल वर वस्तीला असताना बागेत ते तासंतास या दोघांसोबत खेळत असत. पावाचे तुकडे, चणे वगरे ते त्यांना भरवत असत. एकदा त्यांचा लाडका कुत्रा टॉबी जेवण करत नव्हता. बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केला पण तो जेवला नाही. बाबासाहेब त्याला विचारायचे “अरे कशासाठी हा सत्याग्रह आणि उपोषण ?” बाबासाहेबांना खूप वाईट वाटायचे ते सुद्धा त्या दिवशी जेवत नसत.

बाबासाहेब

अक्षरश: बाबासाहेब ढसाढसा रडले .

टॉबी बाबासाहेबांचा जणू एक प्रामाणिक सेवक होता. कधीकधी रात्री दामोदर हॉलच्या समोरच्या हिरवळीवर बाबासाहेब झोपत असत. बाबासाहेबांच्या पायथ्याशी टॉबी रात्रभर बसून असायचा. एखाद्या वॉचमन सारखा तो त्यांची राखण करायचा. आजूबाजूला कुठे पालापाचोळ्याचा जरी आवाज आला तरी टॉबी तिकडे धाव घ्यायचा. टॉबीने माणसाला लाजवेल इतक्या इमानाने बाबासाहेबांची सेवा केली. पुढे अॅक्सिडेंटमध्ये टॉबी आणि पाडस स्वत: च्या प्राणाला मुकले. त्यावेळी स्वत:च्या बालकांसाठी एखाद्या पिता जेवढे दु:ख करतो, तेवढे दुःख बाबासाहेबांना झाले हाेते. अक्षरशः बाबासाहेब त्यावेळी ढसाढसा रडले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here