आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

रस्त्याच्या कडेला गाड्यावर अंडे विकणाऱ्या जय कुमार वलेचा ची उदयपूर अंडा किंग बनण्याची कहाणी !


 

नमस्कार मित्रांनो आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कहाणी जय कुमार वलेचा याचा यशाची जो कधीकाळी रस्त्याच्या कडेला गाड्यावर अंडे विकायचा , आज आहे उदयपूर चा अंडा किंग.

जयकुमार वलेचा यांच्या परिवाराची कहाणी

जयकुमार वलेचा यांचा परिवार त्यांच्या लहानपणापासूनच खूप गरीब होता. घरामध्ये आई-वडील दोन लहान बहिणी आणि भाऊ राहत होते. घराचा पूर्ण खर्च वडिलांचा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गाड्यावरील अंडाभुर्जी, उकडलेले अंडे आणि अंडा आमलेट यावर चालत असे.

जय कुमार वलेचा यांच्या लहानपणीच्या संघर्षाची कहाणी

जयकुमार वलेचा यांनी आपल्या घरची आर्थिक परिस्थिती पाहून इयत्ता चौथीमध्ये शाळा सोडून दिली आणि आपल्या वडिलांसोबत गाड्यावर काम कराय सुरु केले.ते त्यांच्या वडिलांसोबत गाड्याला धक्का मारत गाडा रस्त्याच्या कडेला नेत आणि त्यावर अंडे विकण्याचे काम करत. लवकरच त्यांनी वडिलांकडे पाहून अंडाभुर्जी आणि आमलेट बनवण्याचे शिकून घेतले.

त्यांची समस्या तेंव्हा वाढली जेंव्हा त्यांच्या वडिलांना डायबिटीस बरोबर गुडघे दुखण्याची समस्या उद्भवली आणि यामुळे त्यांनी अंथरूण पकडले. आता आईसोबत पूर्ण परिवार सांभाळण्याची जबाबदारी 12 वर्षीय मुलावर येऊन पडली. मग काय त्यांनी एकट्याने अंड्याचा गाडा चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी ते रोज सकाळपासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत उदयपूर मधील रस्त्याच्या कडेला अंड्याचा गाडा चालवत असत.

जयकुमार वलेचा यांच्यामार्फत जीवनामध्ये काहीतरी मोठं करण्याची कहाणी

जय कुमार वलेचा

जयकुमार वलेचा जीवनामध्ये पुढे जाऊन काहीतरी मोठं करण्याचं पाहत होते. त्यांना काही येत होते ते फक्त त्यांच्या वडिलांकडून शिकवण्यात आलेले अंडा बनवणे. आता त्यांचा विचार अंड्या सोबत दुसरं काहीतरी करण्याचा होता त्यासाठी त्यांनी बाजारातून स्वास ची बॉटल आणि काही मसाले सोबत घेतले.

आता ते रोज आपल्या अंड्यांवर प्रयोग करून काहीतरी नवीन बनवायला लागले. लोकांची कधी कधी मजाक उडवत असत पण त्यांनी कशाचाही विचार न करता आपल्या प्रयोगातून बनणारी नवीन डिश ग्राहकांना फ्री मध्ये देऊन त्यांच्याकडून सल्ला घेत असत. असं करता करता ते अंड्यांची नवीन डिश बनवण्यामध्ये पटाईत झाले आणि उदयपूरच्या लोकांनाही त्यांच्या अंड्यांची नवीन नवीन डिश आवडायला लागली.

जय कुमार वलेचा यांच्याद्वारे आपले नवीन रेस्टॉरंट सुरु करण्याची कहाणी

जयकुमार वलेचा यांनी आपल्यावरील ग्राहकांचा विश्वास आणि वाढता व्यापार बघून उदयपूर मध्ये ‘The word Egg’ नावाचे रेस्टॉरंट उघडले. जे आज त्यांच्या मेहनतीने आणि सातत्याने उदयपूर शहरामध्ये प्रसिद्ध आहे. आज त्यांच्या या रेस्टॉरंटमध्ये अंडा भुर्जी सारख्या 100 वेगवेगळ्या प्रकारच्या डिश बनवल्या जातात.

बॉयल्ड अंडा भुर्जी हा त्यांचा ट्रेडमार्क बनला आहे. जी सामान्य लोकांची प्रसिद्ध डिश बनली आहे. आपल्या डिश मध्ये बॉयलर अंडा भुर्जी सोबत ते सॉस, कांदा आणि मसाले यांचा उपयोग करतात.

जयकुमार वलेचा यांची उदयपूर चा अंडा किंग ही उपाधी मिळवण्याची कहाणी.

आज जयकुमार वलेचा यांच्या अंडा भुर्जीची प्रसिद्धी उदयपूर शहरातच नाही तर देश-विदेशात सुद्धा पसरली आहे. ज्यामुळे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये देश-विदेशातील पर्यटक आणि फिल्मी शूटिंगसाठी आलेले सितारे सुद्धा येतात. याच कारणामुळे लोकांनी त्यांना उदय पुरचा अंडा किंग अशी उपाधी दिली.

जयकुमार वलेचा यांच्या मास्टर शेफ ऑफ इंडिया मध्ये भाग घेण्याची कहाणी

जयकुमार वलेचा हे मास्टर शेफ ऑफ इंडिया सीजन 4 मध्ये आपली किस्मत आजमावण्यासाठी भाग घेत होते ज्यामध्ये ते level-2 पर्यंत पोहोचले. या प्रोग्राम मध्ये आल्यानंतर त्यांची प्रसिद्धी खूप वाढली त्यांना खूप समाचार पत्रे आणि टीव्ही शोमध्ये बोलावण्यात आले.

जयकुमार वलेचा यांच्या भविष्यातील योजनांची कहाणी.

जयकुमार वलेचा यांनी उदयपूर सोबतच पूर्ण भारतामध्ये आपले काम विस्तारण्याची योजना बनवली आहे. ज्याद्वारे ते भारतातील जवळपास प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे रेस्टॉरंट खोलणार आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here