आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

बिहार : कधी लाल आतंकाच्या सावलीत राहणारा हा परिसर आज पसरवत आहे केशरची सुगंध


 

बिहार मधील गया जिल्ह्यातील बारा चट्टी प्रखंड या गावात कधीकाळी बंदुकीच्या गोळ्यांचा फडफडाट ऐकू यायचा. येथील जंगलातील नक्षली आणि पोलीस यांचा रोजच सामना होत असे. येथील हवेमध्ये बारूद चा वास पसरला होता. परिसरातील लोक लाल आतंकाच्या सावलीमध्ये जगण्यास मजबुर होते. परंतु आज येथील हवेमध्ये केसर चा सुगंध दरवळत आहे.

केशर

आम्ही बोलत आहोत प्रखंड मधील देऊनिया पंचायतीच्या चांदो गावाबद्दल. गावातील अनुसूचित जाती मधून येणारी कमल देव मांझीने केसर चा शेतीची एक नवीन सुरुवात केली. केसर चे फुले बघून तेथून जाणारेही थांबतात. दुसऱ्या गावातील शेतकरी येऊनही कमल देवीकडून केशरच्या शेतीची माहिती घेत होते.

खरेतर कमलादेव मांझी यांना चतरा मधील शेतकऱ्याकडून या शेतीची प्रेरणा मिळाली. कमल देव मांझी सांगतात की केशरचा शेतीशी आमचा काहीही संबंध नव्हता. याविषयी मला माहित सुद्धा नव्हते. परंतु योगायोगाने ते झारखंड मधील चतरा जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांकडे गेलते आणि तिथेच त्यांनी केसरची शेती पाहिली होती.

त्यांनी नातेवाईकांसोबत गप्पा गोष्टी केल्या. त्यांनी सांगितले की ही पलवल केशरची शेती आहे. ज्याची शेती तुम्ही करा. कमल देवला त्या शेतकऱ्यांनी बीज पुरवले. त्यांनी ते बीज घेऊन आपल्या गावी त्याची शेती करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. कमल देव सांगतात की आपल्या घराच्या पाठीमागे अडीच एकर शेतावर त्यांनी केसरची शेती केली आहे. त्यांना चांगले पीक झाले आहे. याच्या फुलांना वाळू घालून एका पॅकेट मध्ये भरून ठेवतात.

केशर

परंतु दुखद गोष्ट ही आहे की केशरचा बाजार भाव काय आहे हे त्यांना माहीत नाही. सध्यातरी कमल देव आणि त्यांची पत्नी जयंती देवी केशरच्या फुलांना सांभाळून ठेवत आहेत कारण यामुळे पुढे चालून बाजार भाव मिळाल्यावर चार पैसे मिळतील.

केशर पोटांच्या आजारांसाठी खूप फायद्याचे ठरते. पोटामध्ये गॅस ऍसिडिटी यासारख्या त्रासांसाठी केशर खूप उपयुक्त ठरते. केशरचा उपयोग जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. तसेच त्याचा उपयोग ब्युटी प्रॉडक्ट आणि मेडिसिनमध्ये सुद्धा केला जातो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here