आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मोईन अली अन् रवींद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजीपुढे राजस्थानची शरणागती: चेन्नई 45 धावांनी विजयी .


 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 12 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने फिरकी गोलंदाजांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सचा 45 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 20 षटकांत 9 विकेट गमावून 188 धावा केल्या. संघासाठी फाफ डुप्लीने सर्वाधिक 33 आणि अंबाती रायुडूने 27 धावा केल्या.

मोईन अली

189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा फक्त जोस बटलर (49) क्रीझवर थांबून चेन्नईच्या गोलंदाजांना सामना करत होता. बटलर बाद होताच राजस्थानचा डाव पत्त्याप्रमाणे कोसळला. चेन्नईकडून मोईन अलीने तीन आणि रवींद्र जडेजाने 2 गडी बाद केले. या विजयासह महेंद्रसिंग धोनीचा संघ पॉइंट टेबलमध्ये आता दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे.

189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सुरुवात मिळाली नव्हती आणि मनन वोहरा चांगली फटकेबाजी करून सॅम करनच्या चेंडूवर 14 धावांवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कर्णधार संजू सॅमसन काही खास कामगिरी करू शकला नाही आणि तो अवघ्या 1 धावांवरच परतला. त्यानंतर जोस बटलर आणि शिवम दुबे (17) यांनी तिसर्‍या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करुन संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. पण, रवींद्र जडेजाने तिसर्‍या षटकात बटलर आणि शिवम दुबेला बाद करून राजस्थानच्या आशा संपविल्या.

 

पुढच्याच षटकात मोईन अलीने डेव्हिड मिलरला (2) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शेवटच्या सामन्यात षटकार मारुन संघाला विजय मिळवून देणार्‍या ख्रिस मॉरिसला या सामन्यात आपले खातेही उघडता आले नाही.  शेवटच्या षटकांत राहुल तेवतिया (20) यांनी काही जोरदार फटकेबाजी केली पण त्यावेळी खूप उशीर झाला होता.

तत्पूर्वी सुपरकिंग्जचा संघ एका वेळी 13 षटकांत तीन बाद 120 धावा अश्या चांगल्या स्थितीत होता, पण संघ शेवटच्या सात षटकांत 68 धावा जोडू शकला.  नाणेफेक जिंकल्यानंतर सॅमसनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या पहिल्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडचा (10) स्लिपमध्ये सोपा झेल राहुल तेवतियाने सोडला. दुसर्‍या षटकात फाफ डुप्लेसी (33) ने साकारियाच्या गोलंदाजीवर डावातील पहिला षटकार ठोकला.

गायकवाड मात्र आपल्या जीवनाचा फायदा घेऊ शकला नाही आणि त्यांनी मुस्तफिजुर रहमानचा चेंडू हवेत मारला आणि शिवम दुबेने मिड-ऑफवर झेलबाद केले. पाचव्या षटकात डुप्लेसीने   उनाडकटला तीन चौकार आणि एका षटकारासह धावांचा वेग वाढविला, परंतु पुढच्या षटकात मॉरिसचा चेंडू हवेत मारत रियान परागकडून झेलबाद झाला. त्याने 17 चेंडूंचत 4 चौकार आणि दोन षटकार लगावले.

मोईन अली

सुपरकिंग्सचा संघ पॉवरप्लेमध्ये दोन गडी राखून 46 धावा करू शकला. मोईन अलीने मुस्तफिजूर आणि मॉरिस च्या गोलंदाजीवर हल्ला चढवला.  पण वेगवान धावा काढण्याच्या नादात मिडविकेटवर तेवतियाच्या गोलंदाजी वर परागकडून झेलबाद झाला.  पाचव्या चेंडूवर खाते उघडल्यानंतर सुरेश रैनाने परागच्या चेंडूवर षटकार खेचला तर अंबाती रायुडूनेही फिरकी गोलंदाजीवर षटकार ठोकला.

रायुडूनेही तेवतियाला सलग दोन षटकार ठोकले.  सुपरकिंग्सची 100 धावा 12 व्या षटकात पूर्ण झाली.  17 चेंडूत 27 धावा करून साकरियाचा चेंडूवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन षटकार लगावले.  साकरियाकडून त्याच षटकात रैनाही  मॉरिसच्या हातात झेल देऊन बाद झाला. तेव्हा संघाच्या पाच विकेट्सवर 125 धावा झाल्या.  त्याने 15 चेंडूत 18 धावा केल्या.  कर्णधार महेंद्रसिंग धोनीही  17चेंडूत 18 धावा करून साकारियाचा बळी ठरला तर मॉरिसने जडेजाला (08) पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  ब्राव्होने आठ चेंडूंत 20 धावा करून संघाची धावसंख्या 190 पर्यंत नेली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here