कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. बऱ्याच राज्यात पुन्हा लॉकडाऊन केले गेले आहे तरं महाराष्ट्र सरकार सुद्धा संपूर्ण लॉकडाऊनच्या तयारीत आहे.

यादरम्यन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:45 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पुन्हा एकदा पंतप्रधान नेमक काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.

दिल्ली,महाराष्ट्रात ऑक्सिजनची मोठी कमतरता

राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रमध्ये कोरोनारुग्ण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी करण्यात येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालने यांनी म्हटले होते की ऑक्सिजन अभावी परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे त्यामुळे यावर आता पंतप्रधान काय बोलणार आहेत आणि देशात काही निर्बंध लावले जातील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here