आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

‘मोहितें’नी जोपासला लग्नपत्रिका जमा करण्याचा अनोखा छंद

कौटुंबिक आठवणींचे कोंदण: हजारो लग्नपत्रिकेचा संग्रह


 

सोलापूर : प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय आणि अत्त्युच्च आनंदाचा क्षण म्हणजे दोन जीवांना एकत्र आणणारा विवाह. केवळ दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबे या पवित्र बंधनात बांधली जातात आणि सुखदुःखाची वाटचाल संगतीने करतात. या शुभ प्रसंगांत आमंत्रण पत्रिकांना महत्त्वाचे स्थान असते.

लग्नपत्रिका

new google

लग्नापत्रिका इतरांपेक्षा कशी वेगळी असेल यावर विशेष भर दिला जातो. भविष्यात हीच लग्नपत्रिका एक आठवणींचा अल्बम बनून राहते. या पत्रिका जमविण्याचा छंद तसा आगळावेगळाच म्हणावा लागेल. सोलापुरातील एका अवलियाने लग्नपत्रिका जमा करण्याचा छंद जोपासला आहे.

असंख्य कौटुंबिक आठवणीचे कोंदण जपून ठेवणार्‍या या संग्रहाकाचे नाव अमोल रमेश मोहिते. लग्नपत्रिकेच्या माध्यमातून अनेक कुटुंबाशी एक जवळीक नातं त्यांनी निर्माण केलं आहे.

सोलापूर शहरात दक्षिण कसबा परिसरात राहणारे श्री. मोहिते हे व्यवसायाने ग्राफिक डिझायनर.

१९८४ पासून अशा अनेक पत्रिकांनी हा खजिना सजला असून एक प्रकारे कौटुंबिक सुहृदांचाच संग्रह आहे. इयत्ता चौथीत असल्यापासून त्यांना लग्नपत्रिका जमा करण्यास सुरुवात केली. पत्रिकेवर असलेले विविध प्रकारचे चित्रे आणि फोटो त्यांना बालपणी आकर्षित करु लागले आणि यातूनच संग्रहाची आवड निर्माण झाली.

काकाच्या लग्नपत्रिकेपासून सुरू झालेला हा छंदाचा प्रवास गेल्या ३७ वर्षापासून सुरू आहे. विविध आकारांतल्या आणि रंगसंगतीतल्या आकर्षक लग्नपत्रिका लक्षवेधक आहेत. प्रत्येक लग्नपत्रिकेत ही वैविध्यपूर्णता दिसतेय. मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, उर्दू , संस्कृत आणि इंग्रजी अशा एकूण सात भाषेतल्या लग्नपत्रिका या संग्रहात पाहायला मिळतात. या संग्रहातलं वैशिष्ट्य म्हणजे ‘व्हिजिटिंग कार्ड’ च्या आकारापासून ते कॅलेंडरच्या आकारातल्या पत्रिका आहेत. संग्रहात पुस्तकाच्या स्वरूपातली एक लग्नपत्रिका पाहायला मिळते. यात विवाह सोहळ्याबद्दल माहिती सांगितले आहे.

लग्नपत्रिका
३७ वर्षापासून जोपासला छंद

श्री. मोहिते यांच्या संग्रहाची कल्पना त्यांच्या मित्रांना कळताच त्यांनी काही पत्रिका आणून दिल्या. पुढे हा संग्रह वाढत गेला.
गेल्या ३७ वर्षांत त्यांनी जवळपास सहा हजारहून अधिक लग्नपत्रिकाचा खजिना जमा केला आहे. गतवर्षी त्यांनी आपले घर रंगरंगोटीस काढले होते.

 

या पत्रिकेचा संग्रह त्यांनी घराच्या छतावर ठेवला होता. गेल्या वर्षी जोरदार पाऊस आल्याने यातील बऱ्याच पत्रिका भिजून खराब झाल्या. आता केवळ त्यांच्याकडे दीड हजार च्या आसपास लग्नपत्रिका संग्रहात राहिल्या आहेत. कोरोनामुळे डिजिटल पत्रिका छापण्याचे फॅड सुरू झाले आहे.

त्यामुळे आठवणींचा उलघडा करणारा कागदी पत्रिकेचा हा संग्रह भविष्यात खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

म्हणून हार्दिक पंड्या करत नाही गोलंदाजी; मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सांगितले कारण

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here