आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
लोककलाकार कृष्णाई वयाच्या बाराव्या वर्षापासून भारुडाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजप्रबोधन करतेय.
बयो तुला बुरगुंडा होईल गं. . . तुम्हा सांगते वेगळा निघा वेगळं निघून संसार बघा. . . वेडी म्हणता मला. . . दादला नको गं बाई मला नवरा नको बाई. . .हो रा ऐका मायबाप. . . अशी एकापेक्षा एक दर्जेदार संत एकनाथांची भारूडं आपल्या पहाडी आवाजात सादर करते. भारुडाला समाज परिवर्तनाचं माध्यम बनवले. वयाच्या बाराव्या वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्वलंत प्रश्नांवर भारुडातून समाजप्रबोधन करणारी ही नवदुर्गा आहे भारुडकन्या कृष्णाई प्रभाकर उळेकर.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील आरळी गावची ही भारूड कन्या. वय अवघे १८ वर्षं. सध्या कृष्णाई पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयात कला शाखेत बी.ए. च्या पहिल्या वर्गात शिकत आहे. कृष्णाईचे वडील प्रभाकर कोळेकर हे क्रीडा शिक्षक. तिने क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावा असे, त्यांना नेहमी वाटायचे.
यात तिने परिश्रम करून ३०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विभागीय पातळीवर यशदेखील मिळवले. परंतु कृष्णाईला नृत्य, भाषण, एकांकिका या सांस्कृतिक क्षेत्रातक्षेत्रात रुची होती. हे तिच्या वडिलांनी जाणले. पुढे त्यांनी तिला ‘नाथांचं भारूड कर’, असा सल्ला दिला. वडिलांच्या सल्ल्यानंतर ती नाथांचं बुरगुंडा हे भारूड शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केले.
अंगावर दंड घातलेली फाटकी साडी, डोक्यावर गठुडं, हातात काठी व त्याला सुया, कंगवे, पिना, फुगे, काळे मणी बांधून मी प्रेक्षकांमधून मंचावर प्रवेश केला. ‘माझं बयो, तुला बुरगुंडा होईल गं’ ह्या भारूडाचे सादरीकरण उत्तम झाल्याने लोकांनीही तिची खूप वाहवा केली. हे सादरीकरण तिच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. महाराष्ट्राच्या वाड्या वस्तीत, गावागावात अन शहरांमध्ये याचं भारुडाचे कार्यक्रम करत अाहे. एक युवा भारुडकन्या म्हणून तिची ओळख तयार झाली. भारुडाच्या माध्यमातून ती सबंध महाराष्ट्राला परिचित झाली.
शेतकऱ्यांचे वाढविले मनोबल
कृष्णाईने भारूडातून वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केला. स्त्री भूणहत्यासारखा नाजुक विषय समाजासमोर प्रभावीपणे मांडला. उस्मानाबाद जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्या जास्त असल्यामुळे व दुष्काळाची दाहकता पाहून ती भारूडातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढवते. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या तरुणाईमध्ये मतपरिवर्तन करते. समाजव्यवस्थेत घडणाऱ्या अघटित घटनांपासून ते शेतकरी, तरूण पिढी, मुलींच्या शिक्षणापर्यंत ती सगळ्या विषयावर कडक शब्दांत आणि पहाडी आवाजात भारूडातून प्रबोधन करतेय.
भारूड या लोककला प्रकाराच्या माध्यमातून कृष्णाई विविध ज्वलंत प्रश्नावर समाजप्रबोधन करण्याचे काम वयाच्या बाराव्या वर्षांपासून करत आहे. तिने महाराष्ट्रभर भारुडाचे आत्तापर्यंत १६१ प्रयोग केले आहेत. तिची भारूड सादर करण्याची शैली कौतुकास्पद आहे. शासन आणि विविध संस्था यांनी तिची दखल घेत विविध पुरस्कार देऊन तिचे कौतुक केले आहे. असं मत प्रभाकर उळेकर यांनी व्यक्त केले.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
या’ गोलंदाजांच्या फिरकीपुढे रोहित शर्माची बोलती होते बंद; सातव्यांदा झाला बाद…..