आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

स्वस्त घर बनवण्यासाठी सुरू केला अनोखा व्यवसाय ! स्ट्राक्चर इको फाउंडर श्रुती पांडे च्या यशाची कहाणी…


 

श्रुती पांडे हिने आपल्या देशाची सेवा करण्यासाठी अमेरिकेतील नोकरी सोडून भारतामध्ये स्वतःचा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला .

श्रुतीने अमेरिकेमध्ये राहून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये आपली पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर न्यूयॉर्कमधील एका कन्सल्टन्सी फार्ममध्ये चांगल्या पॅकेजवर काम करण्यास सुरुवात केली. ती सुरुवातीपासूनच आपल्या देशासाठी काहीतरी करण्याच्या प्रयत्नात होती ज्यामुळे लोकांचा फायदा होईल यासाठी ती २०१६ मध्ये भारतामध्ये वापस आली आणि युथ फाउंडेशनच्या माध्यमातून भारतातील सुंदर गावांमध्ये काम करायला लागली.

A house of bamboo - Anniversary Issue News - Issue Date: Dec 30, 2019

एसबीआय युथ फेलोशिप प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर तिने स्वतःचा स्टार्टअप करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये ती तिची क्षमता आणि कौशल्य वापरू शकेल. यासाठी तिने लोकांना स्वस्त घर मिळावे म्हणून स्ट्राक्चर इको स्टार्टअपची सुरुवात केली.

श्रुती पांडेने आपले स्ट्राक्चर इको स्टार्टअप सुरू करण्यासाठी देशातील कोणतेही मोठे शहर न निवडता आपले शहर गोरखपुरची निवड केली आणि आपल्या जिल्ह्यातील युवकांची टीम बनवली.

तिने लोकांना स्वस्त घर भेटण्यासाठी स्टील चे स्ट्रक्चर आणि धान्याचा भुसा पासून बनवलेली ॲग्री फायबर च्या पॅनल्स चा उपयोग केला .

त्यांची टीम या प्रकारची घरे फक्त चार हप्त्यांमध्ये पूर्ण करते. त्यांचे लक्ष लोकांना कमी किमतीमध्ये पर्यावरणपूरक घर बनवून देण्याचे आहे. तिला हेही वाटत होते की पिकांच्या कचऱ्यापासून असे काही बनवावे  ज्यामुळे लोकांना फायदा होईल. त्यांच्या कंपनीचा युरोपीय कंपनीशी स्टार्टअप संबंधित करार आहे. सुरुवातीला त्यांना गुंतवणूकदारांचा जास्त प्रतिसाद मिळाला नाही परंतु घरच्यांनी तिच्या विश्वास ठेवला आणि तिचे कार्य सुरू ठेवले.

घर

श्रुती पांडे यांचे लक्ष या योजनेशी शेतकऱ्यांना जोडण्याचे आहे. त्यांचे म्हणणे आहे की जर शेतकरी त्यांच्या या प्रोजेक्ट सोबत जोडला गेला तर त्याच्या एक एकरातील भुसा मधून त्याला 25 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. यामधून पर्यावरणही स्वच्छ ठेवल्या जाईल. तिचे लक्ष आहे की ती प्रधानमंत्री आवास योजनेत सहभागी होऊन 2022 पर्यंत लोकांना घरे उपलब्ध करून देईल.

श्रुतीला या स्टार्ट अप साठी युएन द्वारा 22 युथ असेंबली मध्ये इम्पॅक्ट चॅलेंज चा पुरस्कार आणि यूपीच्या स्टार्ट अप कॉन्क्लेव मध्ये दुसरे स्थान मिळाले. तसेच स्टार्ट अपला अटल इन्क्युबेशन सेण्टर, आईआईएम बेंगलोरे वीमेन स्टार्टअप आणि बनस्थली विद्यापीठ पासून सपोर्ट प्राप्त आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here