आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

रसेल-कमिन्सची वादळी खेळी वाया: चेन्नईच्या सलग तिसरा विजय; कोलकाता 18 धावांनी पराभूत


 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 15 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 220 धावा केल्या. संघासाठी फाफ डुप्लेसिने 95 धावांची नाबाद खेळी साकारली तर ऋतुराज गायकवाडने 64 धावा केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

चेन्नई

221 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पॅट कमिन्स (नाबाद 66) आणि आंद्रे रसेल 54 धावांच्या तुफानी खेळीनंतरही 202 धावांवर बाद झाला. चेन्नईचा हंगामातील हा तिसरा विजय आहे.

221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने आपले पहिले पाच गडी फक्त 31 धावांत गमावले. डावाच्या पहिल्याच षटकात शुभमन गिल (0) बाद झाला, दीपक चहरच्या गोलंदाजीवर एंगेडीने झेलबाद केले. यानंतर नितीश राणा (9) आणि राहुल त्रिपाठी (8) यांनाही काही खास करता आले नाही. दडपणाखाली केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गनही अवघ्या 7 धावा करून दीपक चहरच्या चेंडूवर धोनीला झेल देऊन पॅवेलियनमध्ये परतला. 

यानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक या जोडीने तुफानी फलंदाजी करताना सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली.  रसेल 22 चेंडूत 54 धावांवर बाद झाला. रसेलच्या नंतर दिनेश कार्तिकने काही जोरदार फटकेबाजी केली पण तो लुंगी एनगिडीचा बळी ठरला.

 

दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर असे वाटले होते की, चेन्नई हा सामना सहज जिंकेल, परंतु पॅट कमिन्स ड्रेसिंग रूममधून जणू सेट होऊन आला होता आणि त्याने चौकार व षटकारांचा पाऊस पाडला. कमिन्सने सॅम करनला डावाच्या 16 व्या षटकात 30 धावा ठोकल्या आणि अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.  मात्र, कमिन्सला शेवटच्या फलंदाजांचा पाठिंबा मिळाला नाही आणि 202 धावा करुन संपूर्ण संघ ऑलआऊट झाला.

चेन्नई

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला रितुराज गायकवाड (64), फाफ डुप्ली (न‍ाबाद 95) यांनी जोरदार सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 115 धावा जोडल्या. ऋतुराजला वरुण चक्रवर्तीने बाद केले.  त्यानंतर द्वितीय विकेटसाठी डुप्लीने 50 धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर मोईन अली (25) आणि धावांचा वेग कायम राखला. त्याच षटकात सुनील नरेनला चौकार आणि एक षटकार खेचल्यानंतर मोईनला स्टंप आऊट केले.

या सामन्यात धोनीने स्वत: ला प्रमोट करत चौथ्या क्रमांकावर आला.  सीएसकेच्या कर्णधाराने 8 चेंडूत 17 धावा फटकावल्या आणि तो त्याच्या जुन्या रंगात दिसला. डावाचा शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने एका षटकारासह चेन्नईला एकूण 220 पर्यंत पोहचविले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here