आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने केला नवा विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय खेळाडू


 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना झाला. हा सामना चेन्नई सुपरकिंग्जने 18 धावांनी जिंकला. या सामन्यात कोलकाताचा माजी कर्णधार आणि स्टार विकेटकीपर दिनेश कार्तिक आयपीएलचा 200 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

200 सामने खेळणारा कार्तिक हा महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यानंतर तो तिसरे खेळाडू आहे. कार्तिक नंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू अनुक्रमे सुरेश रैना आणि विराट कोहली आहेत.

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिकच्या मागील सामन्यांच्या कामगिरीकडे पाहता तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात लेगस्पिनर युजवेंद्र चहलविरुद्ध फक्त 2 धावा करून पायचीत झाला. या सामन्यात त्याच्या संघाला 38 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.  मुंबई इंडियन्सच्या विरुद्धही तो त्याच परिस्थितीत होता, जेथे तो आंद्रे रसेलबरोबर संघाच्या विजयापर्यंत पोहोचू शकला नाही.  या सामन्यात केकेआर सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता.

या सामन्यात कार्तिकने नाबाद आठ धावा केल्या. तथापि, कार्तिकची बॅट सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चांगली चालली, जिथे त्याने शेवटच्या षटकांत वेगवान फलंदाजी केली आणि संघाला चांगली धावसंख्या गाठण्यास मदत केली.

टीम इंडियाकडून क्रिकेटच्या तीनही स्वरूपात 152 सामने खेळलेला कार्तिक आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याला आतापर्यंत अनेक आयपीएल संघात खेळण्याचा अनुभव आहे. त्यात केकेआर व्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा समावेश आहे.

उजव्या हाताचा फलंदाज कार्तिकने आतापर्यंत 200 आयपीएल सामन्यांमध्ये 26 च्या सरासरीने 3,895 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने विविध संघांसाठी 19 अर्धशतकेही केली आहेत. त्याशिवाय या लीगमध्ये कार्तिकने आतापर्यंत 383 चौकार आणि 108 षटकारही ठोकले आहेत.

 दिनेश कार्तिक

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या काल झालेल्या 15 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 220 धावा केल्या. संघासाठी फाफ डुप्लेसिने 95 धावांची नाबाद खेळी साकारली तर ऋतुराज गायकवाडने 64 धावा केल्या.

कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 221 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पॅट कमिन्स (नाबाद 66) आणि आंद्रे रसेल 54 धावांच्या तुफानी खेळीनंतरही 202 धावांवर बाद झाला. चेन्नईचा हंगामातील हा तिसरा विजय आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here