आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

साडेपाच हजार नागरिकांनी घेतली रोपे; ६ क्विंटल प्लास्टिक पिशव्या झाल्या गोळा


दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नाही. या पिशव्या जाळल्यास प्रदूषणात भर पडते. एरव्ही या पिशव्या लोक कचऱ्याच्या कुंडीत फेकून देतात आणि जनावरे ती खातात असे बहुतांश वेळा चित्र दिसतंय. पर्यावरणास हानिकारक ठरलेल्या या पिशव्यांवर युवकांनी एक उपाय शोधला आहे.

नागरिकांकडून दुधाच्या रिकाम्या पिशव्या घेऊन त्याऐवजी हवे ते आयुर्वेदाचे एक रोप देण्याचा पर्यावरणपूरक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला पर्यावरणप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रीकोस गार्डन्स यांच्या सहयोगाने आणि दीपक सोनवणे, ज्ञानेश्वर भंडारे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. नागरिकांकडून जमा केलेल्या दुधाच्या या रिकाम्या पिशव्यांचा उपयोग नर्सरीतील झाडांच्या रोपांसाठी वापरला जात आहे. पिंपरी चिंचवड येथून सुरू झालेल्या या उपक्रमास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय.

या उपक्रमातून आतापर्यंत सहा क्विंटल दुधाच्या प्लास्टिक पिशव्या जमा केल्या आहेत. पुण्यात १९ ठिकाणी सुरू झालेल्या या उपक्रमातून जवळपास साडेपाच हजारांहून अधिक आयुर्वेदिक रोपे लोकांना देण्यात आली आहेत.

रोपाने भरलेली नर्सरीची व्हॅन नागरिकांच्या दारापर्यंत येऊन दुधाच्या रिकाम्या पिशव्या गोळा करते. या दुधाच्या पिशवी प्रति नग ४० पैसे देऊन खरेदी केली आणि त्याऐवजी नागरिकांना हवी ती रोपे दिली. रोपांच्या किंमतीतून पिशव्यांचे पैसे वजा केले व उरलेली रक्कम अदा केली. प्रत्येक रोपाची किंमत ही २५ रुपये होती.

दुध

फुल झाडे, सुगंधी, आयुर्वेदीक आदी प्रकारातील निवडक झाडांची रोपे देण्यात आली. गोकर्ण पांढरा/ निळा, आंबेमोहोर बासमती, गवती चहा, कढीपत्ता, कृष्ण तुळस, पुदिना, बोगनवेल, गुलाब देशी/ काश्मिरी, रातराणी, मोगरा, निशिंगन्ध, शेवंती, कापूर तुळस, सब्जा, कोरफड, लसूण, अडूळसा यांच्यासह ४० वेगवेगळ्या जातींची रोपे पिशवीच्या मोबदल्यात देण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील निगडी प्राधिकरण- आकुर्डी, कोथरूड (मयुरी कॉलनी), रावेत किवळे डी मार्ट जवळ, पर्वती, सहकार नगर, सिंहगड रोड, (पु.ल.देशपांडे उद्यान जवळ), बाणेर, पाषाण (गणराज चौक, साई चौक), वाकड, चिंचवड, पिंपरी , सांगवी (पीडब्ल्यू मैदान), आंबेगाव, चिखली, मोशी, शुक्रवार पेठ, पिंपळे सौदागर (कोकणे चौक), औंध (श्री शिवाजी विद्यामंदिर समोर) कर्वेनगर, वारजे माळवाडी, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, कात्रज, नऱ्हे या ठिकाणाहून रिकाम्या दुधाच्या पिशव्या गोळा करण्यात आल्या.

निनाद सोनवणे सांगतात, “गेल्या दहा वर्षांपासून आम्ही नर्सरी चालवितो. जमा झालेल्या पिशव्या रिसायकल करण्याकरीता नर्सरीत पाठविण्यात आल्या आहेत. झाडांची रोपे तयार करण्यासाठी या पिशव्यांचा उपयोग होणार आहे. या उपक्रमातुन दुधाच्या पिशव्या कचऱ्यात जाण्याचे प्रमाणे कमी होईल तसेच नागरीकांना वृक्षरोपणा करीता विविध रोपे उपलब्ध करुन दिली. या उपक्रमामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.”

रोपे तयार करण्यासाठी पिशवीचा वापर

ज्ञानेश्वर भंडारे सांगतात, “लॉकडाऊन काळात झाडांची रोपे तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या कमी अाणि महाग मिळत होत्या. नर्सरीत रोपे तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या गरजेच्या होत्या. पिशव्या अभावी अनेक रोपे जळून जात होती. त्यावर उपाय म्हणून आम्हाला दुधाच्या रिकाम्या पिशव्या गोळा करण्याची ही संकल्पना सुचली.

प्रत्येकाच्या घरी दुधाची पिशवी घेतली जाते. मात्र, दूध भांड्यात ओतून घेतल्यानंतर दुधाची पिशवी कचऱ्यात फेकली जाते. त्यातून पर्यवरणाचा ऱ्हास अटळ आहे. प्लास्टिक नष्ट होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. परंतु, तीच पिशवी पुन्हा वापरात आणल्यास निसर्गाचा ऱ्हास होण्यापासून वाचवू शकतो.”

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here