आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

जगभरात गाजतोय ‘यावली’चा कलाकार कॉमेडी व्हिडिओने नेटिझन्सला घातली भुरळ ‘सूळ’ यांच्या व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यूज…


 

चेहऱ्यावरील भावातुनच विनोद, विनोदाचे अत्यंत अचूक टायमिंग, खेळकर स्वभाव व भन्नाट बोलण्याची पद्धत यामुळे सोलापुरातील एका कलाकाराच्या कॉमेडी व्हिडिओने नेटिझन्सना भुरळ घातली आहे. त्यांचे विनोदी शैलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विनोदी शैली आणि चौकटीबाहेरील अभिनयाने अनेकांची मने जिंकणार्‍या या कलाकाराचे नाव जस्ट सूळ असे आहे.

कलाकार

जस्ट सूळ हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या यावली गावचे रहिवासी आहेत. अल्पावधीत जगभरात फेमस झालेले जस्ट सूळ यांचे मूळ नाव शांतिनाथ सूळ असे आहे. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. अभ्यासात प्रचंड हुशार असलेल्या सूळ यांनी सोलापुरातून डिप्लोमा इंजिनीअरिंग तर सरदार पटेल महाविद्यालयांमधून मेकॅनिकल इंजिनीयरची पदवी पूर्ण केली. पुढे त्यांनी नोकरीसाठी परदेशात गेले. यूएईमध्ये चांगल्या पगारावर काम करू लागले.

 

सूळ पुढे नोकरीनिमित्त दक्षिण आफ्रिका खंडांतील झांबिया येथे स्थायिक झाले. ते ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या बॉसच्या मुलाशी त्यांचे चांगले पटत होते. विनोदी शैलीच्या सूळ यांचे कलात्मकतेचे गुण बॉसच्या मुलाने हेरले. तेथून त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. सईद अहमद यांनी सूळ यांचे विनोदी शैलीत चे व्हिडिओ चित्रित करून ते इंटरनेटवर अपलोड करून दिले. हिपहॉप कल्चर आणि भारतीय माणूस या थीमवर ते व्हिडीओ बनवायला सुरुवात केली.

 

नेटिझन्सला खळखळून हसवायला लावणार्‍या विनोदी शैलीचे हे व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरू लागले. यातून सूळ प्रचंड फेमस झाले. आज जस्टिन बिबर पासून ते पोगबा सारखा फुटबॉलपटू जगतातला स्टार खेळाडू त्यांची भेट घेतो आणि त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवतो. यावरूनच सूळ यांची प्रसिद्धीचे वलय लक्षात येते. तसेच ज्या सईद अहमद च्या वडिलांकडे त्यांनी वीस वर्ष काम केलं तो सईद आता त्यांचा मीडिया मॅनेजर बनला आहे.

 

सूळ यांचे चाहते अभिजित दळवी सांगतात, विनोदी अभिनयाद्वारे सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी प्रसिद्धीची एक वेगळी उंची गाठली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स वर त्यांचे मिलियनमध्ये फॅन्स आहेत. अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेकांच्या मनात घर केले आहे. ते संपूर्ण जगात लोकप्रिय ठरत आहेत. लहानांपासून ते थोरा मोठय़ांपर्यंत सर्वांचा त्यांच्या चाहत्यांमध्ये समावेश आहे.

स्टाईल हो तो ऐसी!

सुळ यांची स्टाईलदेखील हटके आहे. गळ्यात सोन्याचे लॉकेट, चेहऱ्यावर काळा गॉगल, कलरफुल हेअर स्टाईल, पाश्चिमात्य देशातला ड्रेसकोड, हाताच्या बोटात अंगठ्या, त्याचे भारतीय शैलीतील इंग्रजी संभाषण हे सारं काही सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. सध्या ते झांबिया येथे शेती देखील करतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here