आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

मसाल्यांच्या सुगंधा पोटी भारतात आले होते युरोपियन!


 

भारताला अगोदर कधी सोने की चिडिया असं म्हणत होते. सोने की चिडिया याचा अर्थ फक्त असा नव्हता की इथे फक्त सोनं-चांदी होते. येथे वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती होती त्यामधील एक मसाले होते. मसाल्याचा सुगंध हजारो किलोमीटर दूर अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले पोर्तुगीज तसेच आणि युरोपीय देशांमध्ये पसरला होता.

हा मसाल्यांचा आस्वादच युरोपियन लोकांना भारताकडे आकर्षित करत असे यामुळेच ते भारताकडे आले.

new google

मसाल्या

हा ही गोष्ट वेगळी आहे की ज्या मुकुटावर इंग्लंडची महाराणी गर्व करते त्या मुकुटा मध्ये लागलेला कोहिनूर हिरा हा सुद्धा भारतातील गोवळकोंडाच्या खाणी मधील आहे.

सिकंदरने  भारतावर आक्रमण का केले ?

वास्को-द-गामा ती पहिली व्यक्ती होती जो   भारतातील मसाल्यांच्या स्वादाने पहिल्यांदा आकर्षित झाला.
तसे तर युरोपाच्या पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीज याच गोष्टीची वाट बघून होता की त्यांना कसे मसाले स्वस्तात भेटतील.

असं नाही की प्राचीन काळात भारत आणि युरोपमध्ये मसाल्यांचा वापर होत नसे.

इसवी सन पूर्व शेकडो वर्षापूर्वी भारत आणि युरोपांमध्ये व्यापार होता. याचेच एक उदाहरण इसवीसनपूर्व 327 मध्ये सिकंदर चे भारतावर आक्रमण होय. सिकंदरला भारतातील संपत्ती बद्दल माहिती होती. त्याने ते आक्रमण केले परंतु त्याला विजय मिळाला नाही आणि हारही मिळाली नाही परंतु त्याचा मृत्यू शेवटी येथेच झाला.

यावरून एक गोष्ट कळते की विदेशी लोक भारताकडे आकर्षक होते. त्याचे कारण मसाले होते की येथील साधन संपत्ती हे माहीत नाही.

इटली होते युरोपातील सगळ्यात मोठे व्यापारी केंद्र.

प्राचीन काळामध्ये युरोपमध्ये सगळ्यात वर्चस्व असणारा देश  इटली होता. या काळापर्यंत भारतीय व्यापारी आपला माल लाल सागराच्या माध्यमातून इटली पर्यंत पोहोचवत असत. जास्त व्यापार सडक मार्गे पारसी देशांमधून अरबांकडे समुद्रमार्गे होत असे.

या व्यापारामध्ये इटलीचे शेजारी स्पेन, फ्रान्स आणि पोर्तुगाल हिस्सेदार नव्हते.

याप्रकारे जोमाने भारतामधून इटली फारस आणि अरब देशांमध्ये पोहोचत होता, तोच माल तेथील व्यापारी शेजारी राष्ट्रांमध्ये विकत असत त्यामुळे त्या मालाची किंमत खूप जास्त होत असे. याला असे समजले जाऊ शकते, समजा इटलीने भारताकडून काळी मिरची एक हजार रुपये प्रति किलो घेतली. त्यातील काही मिरची इटलीमध्ये विकून बाकीची दोन हजार रुपये प्रतिकिलोने स्पेनमध्ये विकली. पुढे त्यांनी हीच मिरची पाच हजार रुपये प्रति किलोने विकली. म्हणजे शेवटी शेवटी पोर्तुगालपर्यंत मिरची पोहोचेपर्यंत तिचा भाव खूप वाढला जात असे.

 

हे भाव पोर्तुगाली व्यापाऱ्यांना परवडणारे नव्हते आणि कारण की पोर्तुगालच्या चारही बाजूंनी समुद्र होता, त्यामुळे त्यांच्याकडेही काही कमतरता नव्हती. त्यातीलच नाविकां पैकी एक होते वास्को-द-गामा मसाल्याच्या व्यापारासाठी भारतात जाऊ इच्छित होते.

मालाबार मधे मसाल्यांचे उत्पादन

भारतीय मसाले यांची गोष्ट केली तर गंगा किनाऱ्यावरील मैदानामध्ये मसाल्यांचे उत्पादन चांगले होते. दक्षिण भारत आपल्या मसाल्यांच्या शेतीसाठी प्रसिद्ध होता. बंगालची सुती कपडे आणि हक्काचे मलमल सर्व दुनियेत प्रसिद्ध होते.

 

वास्को-द-गामा 4 जुलै 1497 ला 4 जहाजासोबत आपल्या पहिल्या समुद्र यात्रेस निघाला. एका खूप लांबलचक आणि कंटाळवाण्या प्रवासामधून तो आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप या मार्गे भारतात पोहोचला.

मसाल्या
28 मे 1498 ला वास्को-द-गामा च्या नेतृत्वाखाली पोर्तुगालचे व्यापारी केरळच्या कालिकत मध्ये पोहोचले. तेथील राजा सोबत त्यांनी मसाल्यांसाठी करार केला आणि मसाल्यांची एक खेप घेऊन पोर्तुगालला वापस पोहोचला.वापस पोहोचल्यानंतर त्याचे स्वागत करण्यात आले.

आपले चार महिन्याच्या आशिया भारत प्रवासामध्ये त्याला भारतातील संपत्तीबद्दल खूप काही माहिती झाली होती. येथील सर्व समृद्धीबद्दल त्याने तेथील राजास सांगितले आणि पंधराशे दोन मध्ये 20 जहाजासोबत काही लुटेरे आणि सैनिक घेऊन भारतात परत आला. परत आल्यानंतर त्यांनी स्थानिक राजा वर दबाव टाकून मसाल्यांचा व्यवहार आपल्या ताब्यात घेतला. नंतर त्यांनी पूर्ण समुद्र मार्गावर कब्जा केला एवढेच नाही तर मुघलांना सुद्धा आपली जहाजे बाहेर पाठवण्यास त्यांची परमिशन घ्यावी लागत असे.

भारतीय मसाल्यांमध्ये डुबलेला आहे युरोपचा इतिहास

भारतीय मसाल्यांच्या व्यापारावर कब्जा करण्यासाठी युरोपीय देशांमध्ये सतत संघर्ष होत असे. पोर्तुगिजांच्या नंतर ब्रिटिश ,फ्रेंच,डॅनिश असे व्यापारी सुद्धा भारतात आले.  या सगळ्यांचे ध्येय भारताचा व्यापार व आपले नियंत्रण ठेवणे होते.
भारतीय मसाले खूप काळापासून युरोपचा इतिहास नवी दिशा देत आहेत. भारताच्या वेगवेगळ्या बंदरांमधून मसाले प्राकृतिक औषधी मूल्यवान वस्तू यांची निर्यात युरोपीय देशांमध्ये होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here