आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

रोहित-विराटसारख्या महारथींना मागे टाकत केएल राहुलने गाठला ‘हा’ नवा पल्ला


 

भारतीय संघाचा यष्टिरक्षक के.एल. राहुल सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे. मागील वर्षी आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या केएल राहुलच्या बॅटमधून यंदाही धावांची बरसात होत आहे. नेतृत्वात फेल ठरलेला राहुल फलंदाजी मात्र दमदार कामगिरी करतोय. राहुलने आतापर्यंत भारतीय संघात बर्‍याच मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

सलामीवीर असो किंवा खालच्या क्रमात फलंदाजी असो, राहुलने सर्वत्र स्वत: ला सिद्ध केले आहे. एकापाठोपाठ एक अनेक विक्रम करणार्‍या राहुलने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे.

केएल राहुल

टी -20 क्रिकेटमधील सर्वात कमी डावांमध्ये वेगवान पाच हजार धावा पूर्ण करण्यात ख्रिस गेलनंतर केएल राहुल दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांना मागे ठेवून केएल राहुलने भारतीय फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी करत हा विक्रम पूर्ण केला.

टी -20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 5000 धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे, तर केएल राहुल दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. गेलने 132 डावांमध्ये 5000 धावा केल्या आहेत, तर केएल राहुलने 143 डावात हे कामगिरी बजावली आहे.

तिसर्‍या क्रमांकावर केएल राहुल नंतर शॉन मार्श आहे ज्याने 144 डावात 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा बाबर आजम आहे ज्याने 145 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरोन फिंच आहे ज्याने 159 डावात पाच हजार धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, क्रिकेटच्या या छोट्या प्रकारात वेगवान 5 हजार धावा ठोकणार्‍या भारतीय खेळाडूंबद्दल जर आपण चर्चा केली तर केएल राहुल अव्वल आहे. या प्रकरणात केएल राहुलने विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या क्रिकेटच्या महारथींना मागे सोडले आहे. त्याच्यासाठी ही खरोखर मोठी कामगिरी आहे.

केएल राहुल

केएल राहुलने 143 डावात हे कामगिरी बजावली आहे, तर दुसर्‍या क्रमांकावर विराट कोहली आहे. ज्याने टी -20 क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 167 डाव खेळला आहे.

केएल राहुल आणि विराट कोहलीनंतर सुरेश रैना तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने 181 डावात 5 हजार धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन असून त्याने 181 डावात ही कामगिरी बजावली आहे. पाचव्या क्रमांकावर रोहित शर्मा असून, त्याने 188 डावात 5 हजार टी 20 धावा करण्याचा विक्रम केला आहे.

केएल राहुल भारतीय संघाकडून खेळताना आतापर्यंत एकूण 48 टी -20 सामने खेळला आहे. त्याचा येथे विक्रमही उत्कृष्ट आहे. राहुलने 39.92 च्या सरासरीने 2 शतके आणि 12 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 1हजार 557 धावा केल्या आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here