आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

फेसबुक फाउंडर मार्क ज़ुकेरबर्गच्या यशाची कहाणी


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्ती बद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या लहान वयापासूनच आपल्या दुरगामी विचारांनी फेसबुक सारख्या सोशल वेबसाईटचे  निर्माण केले. आणि संपूर्ण जगातील लोकांना एकत्र जोडण्याचे काम केले. ती व्यक्ती म्हणजे फेसबुक फाउंडर  मार्क ज़ुकेरबर्ग होय.

फेसबुक फाउंडर मार्क ज़ुकेरबर्ग यांच्या लहानपणीची आणि प्रारंभिक जीवन.

जुकेरबर्ग

new google

मार्क ज़ुकेरबर्ग यांचा जन्म यूएसए मध्ये 14 मे 1984 ला न्यूयॉर्कमधील डॉब्स फेरी मध्ये झाला. त्यांच्या परिवारामध्ये आई-वडील आणि तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील एडवर्ड ज़ुकेरबर्ग एकदम तज्ञ होते आणि आई मनोचिकित्सक होती. मार्क झुकरबर्ग लहानपणापासूनच खूप चिकित्सक आणि हुशार होते. आपल्या मुलाची हुशारी बघून त्यांच्या वडिलांनी लहानपणीच प्रोग्रामिंग शिकवणारा एक शिक्षक त्यांच्या घरी ठेवला होता.

फेसबूक फाउंडर मार्क ज़ुकेरबर्ग यांच्या लहानपणी च्या आविष्कारांची कहाणी.

त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी एक सॉफ्टवेअर बनवले त्याचे नाव झुकनेट होते ज्याच्या मदतीने सगळे कॅम्पुटर एकत्र जोडून घरातील संदेश क्लिनिक पर्यंत आणि तेथील संदेश घरात पोहोचवत असत. एवढेच नाही तर त्यांच्या वडिलांनी हे सॉफ्टवेअर त्यांच्या क्लिनिक मधील कॅम्पुटर मध्ये इन्स्टॉल केले होते ज्याच्या सहाय्याने घरात असते वेळी आपल्या क्लिनिक मधील येणारा जाणाऱ्यांची आपल्या स्टाफ द्वारे माहिती घेत.

यानंतर त्यांनी हायस्कूलचे शिक्षण घेत असताना Synapse media player नावाचा MP3 बनवला जो तीच प्लेलिस्ट बनवत असे जी ऐकणाऱ्याने त्याला सांगितली असेल. छोट्याशा वयामध्ये त्यांनी खूप सारे व्हिडिओ गेम बनवले होते.

मार्क ज़ुकेरबर्ग यांनी शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हावार्ड विद्यापीठामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांनी 2003 मध्ये काही सहकार्‍यांना सोबत घेऊन फेशमॅश नावाच्या वेबसाईटचे निर्माण केले यासाठी त्यांनी हॉवर्ड विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून तेथील सर्व विद्यार्थ्यांचे फोटो घेऊन आपल्या वेबसाईट वर टाकले होते आणि तिथे कोणत्याही दोन मुलं किंवा मुलींचे फोटो टाकून हॉट /नोट असे वोट करत होते.

फेशमॅश तेथील विद्यार्थ्यांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली. पण काही मुलींनी ही वेबसाईट आपत्तीजनक आहे असे म्हणून तिचा विरोध केला. अचानक एके दिवशी या वेबसाईटवर खूप जास्त स्ट्राइक आल्या यामुळे हॉवर्ड विद्यापीठाचे सर्वर  बंद पडले. यामुळे त्यांना तेथे स्टाफच्या खूप प्रश्नांना सामोरे जावे लागले आणि आपली वेबसाइट बंद करावी लागली.

फेशमॅशच्या incident अगोदर काही दिवसापूर्वी हॉवर्ड विद्यापीठाचा एक विद्यार्थी दिव्या नरेंद्र मार्क एका सोशल वेबसाईट चा निर्माणाची तर्कीब घेऊन मार्क ज़ुकेरबर्ग कडे आला होता. ही वेबसाईट हॉवर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी होती आणि तिचे नाव हॉवर्ड कनेक्शन असे होते.

दिव्या नरेंद्र मार्क च्या म्हणण्यानुसार या वेबसाईटशी जोडलेले सगळे विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून आपले फोटोज स्वतःची माहिती आणि लिंक एक दुसऱ्यांना पाठवू शकत होते. त्यांना त्या विद्यार्थ्यांची आयडिया लक्षात आली आणि लगेच त्यांनी त्या सोबत काम करण्यास सुरुवात केली.

बस येथूनच त्यांच्या डोक्यामध्ये अशीच एक वेबसाईट निर्माण करण्याचा विचार आला. जो त्यांनी फेस मेष ला मिळालेल्या प्रसिद्धीनंतर आपल्या सहकाऱ्यांना सांगितले.

त्यांनी वर्ष 2004 मध्ये द फेसबुक.कॉम नावाचे डोमेन खरेदी केले आणि त्याला वस्तीगृहाच्या रूममधून चालवण्यास सुरुवात केली. त्याला शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असे बनवण्यात आले होते की ते विद्यार्थी आपला टेलिफोन नंबर वर्ग एकमेकांना सांगू शकतील.

वर्ष 2005 पर्यंत त्यांनी ही वेबसाईट देशातील सगळ्यात विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे काम केले आणि यामुळे यु एस ए मधील सगळ्यात विद्यापीठांचे विद्यार्थी यांच्याशी जोडले गेले. त्याची वाढती लोकप्रियता बघून त्यांनी याला पूर्ण विश्वामध्ये पसरवण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी आपली पदवी शिक्षण अर्ध्यातच सोडून दिले. आणि आपल्या टीम सोबत यावर लक्ष केंद्रित केले.

मार्क ज़ुकेरबर्ग
सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी द फेसबुक.कॉम हे नाव बदलून फेसबुक.कॉम असे केले. वर्ष 2006 पर्यंत फेसबुक.कॉम पन्नास करोड ट्राफिक पूर्ण झाल्यावर याहूने एक अरब डॉलर मध्ये घेण्याचा प्रस्ताव मार्क ज़ुकेरबर्ग यांच्याकडे दिला परंतु त्यांनी यास साफ नकार दिला.

त्याच वर्षी ते कॅलिफोर्नियाला गेले आणि तिथे एक घर किरायाने घेतले आणि आपले ऑफिस बनवले. शेवटी 24 मे 2007 ला लाखो बिजनेस पेज आणि प्रोफाईल सोबत फेसबुक.कॉम अधिकारीकरित्या पूर्णजगभर पसरले . यानंतर त्यांनी मे 2008 मध्ये फेसबुक कनेक्टची घोषणा केली. ज्यामुळे लोक फेसबुकवर एकमेकांशी जोडल्या गेले.

शेवटी त्यांच्या दिवस-रात्र मेहनतीने आणि सातत्याने फेसबुक.कॉम ही  जगातील सर्वात मोठी वेबसाईट बनली. वर्ष 2015 मध्ये फेसबुक.कॉमचे अधिकृत वापरकर्ते दोन बिलियन पेक्षा जास्त होते. आज फेसबुक.कॉम विश्वातील प्रत्येक देश ,प्रत्येक शहर ,प्रत्येक गाव, प्रत्येक व्यक्ती वापरत आहे

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here