आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

कैकईने का मागितला होता रामाचा वनवास ?


 

राजा दशरथाचा तीन राणी पैकी एक कैकई होती. आपण खूप वेळेस हे ऐकले आहे की काही काही कारणामुळे भगवान रामास 14 वर्षे वनवासाला जावे लागले रामायणामध्ये तिचे पात्र नकारात्मक आहे.

कैकई एक अत्यंत कुशल राणी होती, ती भगवान रामावर आपल्या पुत्रांपेक्षा जास्त प्रेम करत होती. तर कोणामुळे कैकईचे विचार भगवान रामा प्रती बदलले ? चला तर जाणून घेऊया राणी कैकई विषयी काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीत.

कैकई

कैकई चा जन्म काया कैकईया नावाच्या राज्या मध्ये राजा अश्वपति च्या पुत्रीच्या रूपात झाला. राजाने तिच्या लहानपणीच आपल्या पत्नीला काही कारणांमुळे महालाच्या बाहेर काढले होते. मंथरा नावाची दासी कैकेईची देखभाल करत असे. मंथरा महालांत बसून मोठमोठ्या योजना बनवत असे.

एकदा राजा दशरथ कैकईचे राजा अश्वपती त्यांच्या निमंत्रणावरुन त्यांच्या महालात पोहोचले. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यामध्ये कैकयी सुद्धा सहभागी होती. राजा दशरथ कैकईमुळे प्रभावित झाले आणि तिच्या सोबत विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु या विवाहासाठी एक अट ठेवण्यात आली की राणी कैकईचा पुत्र आयोध्येचा उत्तराधिकारी बनेल.

तेव्हा राणी कौसल्यास कोणतेही अपत्य नसल्याकारणाने राजा दशरथाने ही अट मान्य केली. परंतु राणी कैकईला सुद्धा पुत्र झाला नाही. राजा दशरथाची तिसरी राणी सुमित्रा सुद्धा नीपुत्र राहिली. यामुळे राजा दशरथ बाप बनू शकले नाही ते खूप दुखी राहू लागले.

यावर उपाय म्हणून एक यज्ञ करण्यात आले त्याचे फळ स्वरूप राणी कौशल्यास भगवान राम राणी कैकईस भरत आणि राणी सुमित्रा ला लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे पुत्र झाले.

राणी कैकई सर्वात सुंदर होती आणि राजा दशरथ त्याची प्रिय होती. तिला युद्धकौशल्य सुद्धा अवघत होते. इंद्रदेव आणि समरासुर राक्षसा मध्ये युद्ध सुरू होते, त्यावेळी राजा दशरथ यांनी युद्धामध्ये इंद्रदेवाची मदत केली. या युद्धामध्ये कैकईने राजा दशरथयांचे प्राण वाचवले होते. त्यामुळे राजा दशरथाने तिला दोन वरदान मागण्यास सांगितले, तेव्हा तिला काहीच न सुचल्यामुळे तिने जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा मागू असे म्हणाली.

कैकई

राम दशरथ राजाचा प्रिय पुत्र होता. कैकई सुद्धा रामावर खूप प्रेम करत असे. जेव्हा रामाचा विवाह सितेशी झाला तेव्हा राजा दशरथाने रामाला आपले उत्तराधिकारी घोषित केले. रामाच्या राज्याभिषेक प्रसंगी कैकईची दासी मंथराने कैकईला तिच्या लग्नाच्या वेळेस ची अट आठवण करून दिली आणि तिला राजा दशरथाने दिलेले दोन वचन सुद्धा आठवण करून दिले.

यामुळे कैकईचे विचार बदलले आणि तिने राजा दशरथपाशी हट्ट करून आपल्या लग्नाच्या वेळीच्या अटींची आठवण करून दिली आणि राजा दशरथाने दिलेले दोन वचन मागितले. त्यामध्ये पहिले होते की भरताला अयोध्येचा राजा बनवावे आणि दुसरे होते रामास 14 वर्षाचा वनवासाला पाठवावे.

आपली इच्छा नसूनही राजा दशरथ यास या गोष्टी मान्य कराव्या लागल्या. राजा दशरथाने आपल्या इच्छेविरुद्ध रामास 14 वर्षाच्या वनवासास पाठवले आणि भरताला आयोध्येचा राजा घोषित केले. हा धक्का राजा दशरथ यास सहन झाला नाही.तो आतून खूप दुखी होता यातच त्याचे निधन झाले.

ही गोष्ट जेव्हा भरताला कळाली तेव्हा त्याने माता कैकईचा त्याग केला आणि भगवान राम यास भेटण्यासाठी आणि आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी सांगण्यासाठी चित्रकुट येथे गेला. तेथे त्याने राम यास आयोध्या वापस येण्यासाठी विनंती केली परंतु भगवान राम यांनी आपल्या वडिलांची आज्ञा मोडली नाही आणि 14 वर्षाच्या वनवासासाठी निघून गेले.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here